ऑक्टोबर १०
Appearance
<< | ऑक्टोबर २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
ऑक्टोबर १० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २८३ वा किंवा लीप वर्षात २८४ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]अठरावे शतक
[संपादन]एकोणिसावे शतक
[संपादन]विसावे शतक
[संपादन]- १९११ - चीनमध्ये किंग वंशाचा शेवट.
- १९१३ - पनामा कालव्याचे बांधकाम पूर्ण.
- १९२० - कारिंथियाच्या जनतेने कारिंथियाला ऑस्ट्रियाचा प्रांत करण्याचे ठरवले.
- १९३३ - युनायटेड एरलाइन्सचे बोईंग २४७ प्रकारचे विमान घातपातामुळे कोसळले. घातपाताने विमान कोसळण्याची (सिद्ध झालेली) ही प्रथम घटना होती.
- १९३८ - पोर्ट ह्युरोन, मिशिगन व सार्निया, ओंटारियोला जोडणारा ब्लू वॉटर ब्रिज खुला झाला.
- १९३८ - दुसरे महायुद्ध-म्युनिकचा करार - सुडेटेनलॅंड जर्मनीच्या ताब्यात.
- १९४४ - ज्यूंचे शिरकाण - ८०० जिप्सी बालकांना ऑश्विझ तुरुंगात मारण्यात आले.
- १९५७ - श्वेतवर्णीय नसल्यामुळे घानाच्या अर्थमंत्री कोम्ला अग्बेली ग्ब्डमाहला डेलावेरमधील डोव्हर शहरातल्या रेस्टॉरंटमध्ये मालकाने प्रवेश नाकारला. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष ड्वाईट डी. आयझेनहोवरने याबद्दल ग्ब्डमाहची जाहीर माफी मागितली.
- १९६३ - फ्रांसने आपला बिझर्ते आरमारी तळ ट्युनिसीयाच्या हवाली केला.
- १९७० - फिजीला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- १९७३ - करचुकवेगिरी केल्याचे सिद्ध झाल्यामुळे अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष स्पिरो ऍग्न्यूने राजीनामा दिला.
- १९८६ - एल साल्वाडोरची राजधानी सान साल्वाडोरमध्ये रिश्टर मापनपद्धतीनुसार ७.५ तीव्रतेचा भूकंप. अंदाजे १,५०० ठार.
- १९९७ - ऑस्ट्राल एरलाइन्सचे डी.सी. ९-३२ प्रकारचे विमान उरुग्वेतील नुएव्हो बर्लिन शहराजवळ कोसळले. ७४ ठार.
एकविसावे शतक
[संपादन]जन्म
[संपादन]- १८३० - इसाबेला दुसरी, स्पेनची राणी.
- १८३७ - रॉबर्ट गुल्ड शॉ, अमेरिकन सेनाधिकारी.
- १८६१ - फ्रिट्यॉफ नानसेन, नॉर्वेचा शोधक, संशोधक, मुत्सद्दी.
- १८८४ - नेव्हिल नॉक्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८८४ - चार्ल्स पीयर्स, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १८९५ - भक्ती रक्षक श्रीधर देव गोस्वामी महाराज, भारतीय गुरू.
- १८९५ - जॉनी टेलर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९०६ - आर.के. नारायण, भारतीय इंग्लिश लेखक.
- १९१९ - जेरी गोमेझ, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९२२ - हॅरी केव्ह, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- १९२७ - क्लेरमॉॅंट डेपेइझा, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९३३ - सदाशिव पाटील, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९३६ - आर्टी डिक, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- १९४९ - लान्स केर्न्स, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- १९८३ - वुसिमुझी सिबंदा, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
[संपादन]- १९ - जर्मॅनिकस, रोमन सेनापती.
- ८३३ - अल-मामुन, खलिफा.
- १३५९ - ह्यु चौथा, सायप्रसचा राजा.
- १९१३ - कात्सुरा तारो, जपानी पंतप्रधान.
- १९१४ - चार्ल्स पहिला, रोमेनियाचा राजा.
- २००० - सिरिमावो भंडारनायके, श्रीलंकेची पंतप्रधान.
- २००५ - मिल्टन ओबोटे, युगांडाचा राष्ट्राध्यक्ष.
- २००६ - सरस्वतीबाई राणे, भारतीय - मराठी गायिका.
- २००८ - रोहिणी भाटे, मराठी कथकनर्तिका.
- २०११ - जगजीतसिंह, भारतीय गझलगायक, संगीतकार.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]- जागतिक मानसिक आरोग्य दिन
- दोन-दहा दिन - तैवान.
- राष्ट्र दिन - फिजी.
- स्वास्थ्य दिन - जपान.
- कोरियन कामगार पक्ष स्थापना दिन - उत्तर कोरिया.
बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर ऑक्टोबर १० च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
ऑक्टोबर ८ - ऑक्टोबर ९ - ऑक्टोबर १० - ऑक्टोबर ११ - ऑक्टोबर १२ - ऑक्टोबर महिना