Jump to content

रोहिणी भाटे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Rohini Bhate (es); রোহিণী ভাটে (bn); Rohini Bhate (fr); રોહીની ભાટે (gu); Rohini Bhate (ast); Rohini Bhate (ca); रोहिणी भाटे (mr); रोहिणी भाटे (mai); ରୋହିଣୀ ଭାଟେ (or); Rohini Bhate (ga); روہینی بھاٹے (pnb); روہینی بھاٹے (ur); Rohini Bhate (sq); Rohini Bhate (de); ロヒニ・バーテ (ja); Rohini Bhate (en); ರೋಹಿಣಿ ಭಾಟೆ (kn); रोहिणी भाटे (hi); రోహిణి భాటే (te); ਰੋਹਿਣੀ ਭਾਤੇ (pa); ৰোহিনী ভাটে (as); Rohini Bhate (sl); ᱨᱳᱦᱤᱱᱤ ᱵᱷᱟᱴᱮ (sat); ரோகிணி பாட் (ta) ભારતીય નૃત્યકાર (gu); baillarina india (1924–2008) (ast); Indian dancer (en); ভাৰতীয় নৃত্যশিল্পী (as); ଭାରତୀୟ ନର୍ତ୍ତକୀ (or); Indian dancer (en); damhsóir Indiach (ga); भारतीय नर्तक (hi); இந்திய நடனக் கலைஞர் (ta)
रोहिणी भाटे 
Indian dancer
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
उच्चारणाचा श्राव्य
जन्म तारीखनोव्हेंबर १४, इ.स. १९२४
पाटणा
मृत्यू तारीखऑक्टोबर १०, इ.स. २००८
पुणे
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
व्यवसाय
  • नर्तक / नर्तकी
  • नृत्यदिग्दर्शक
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

रोहिणी भाटे (जन्म : पाटणा, १४ नोव्हेंबर १९२४; - पुणे, १० ऑक्टोबर २००८) या मराठी कथक नर्तकी होत्या.

ज्या काळात भारतात पांढरपेशा घरातील मुलींनी स्टेजवर नृत्य करणे ही प्रथा समाजमान्य नव्हती, त्या काळात एका मराठी मुलीने नृत्य करणे ही गोष्ट धारिष्ट्याचीच होती. पण एकदा घेतलेला निर्णय रोहिणी भाटे यांनी मरेपर्यंत निभावला. त्या बुद्धिमान तर होत्याच शिवाय त्या कविताही करीत. गाण्याचेही त्यांना अंग होते. या सर्वांचा उपयोग त्यांना नृत्यसाधनेसाठी झाला.

रोहिणी भाटे यांनी लखनौ घराण्याचे कथक नर्तक लच्छूमहाराज व जयपूर घराण्याचे नर्तक मोहनराव कल्याणपूरकर यांच्याकडे कथक नृत्याचे शिक्षण घेतले होते.[]. त्यांनी इ.स. १९७२ च्या सुमारास पुण्यात नृत्यभारती नावाची कथक नृत्यप्रशिक्षण अकादमी स्थापली. नृत्यकलेतील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाने इ.स. १९७७ साली महाराष्ट्र राज्य पुरस्काराने, तर इ.स. १९९० साली महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन गौरवले गेले.[]. नवी दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीने इ.स. १९७९ साली त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान केला. [].

रोहिणी भाटे यांनी लिहिलेले लहेजा या नावाचे आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे. त्यांच्या शिष्यांमध्ये प्राजक्ता अत्रे, ऋजुता सोमण, मराठी चित्रपट अभिनेत्री शर्वरी जमेनीस यांचा समावेश आहे.

पुढील पिढीतील नर्तकी शमा भाटे या रोहिणीबाईंच्या स्नुषा (सूनबाई) आहेत.

गायक प्रभाकर जठार हे रोहिणी भाटे यांचे द्वितीय पती.

पुरस्कार

[संपादन]

पुणे महापालिका रोहिणी भाटे यांच्या नावाने ’स्वर्गीय गुरू पंडिता रोहिणी भाटे पुरस्कार’ देते. सन्मानचिन्ह, शाल आणि ५० हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मुख्य पुरस्कारासह आणखी पाच सहपुरस्कार दिले जातात. १०,००० रुपये रोख, सन्मानचिन्ह व शाल असे या सहपुरस्कारांचे स्वरूप आहे.

२०१५ साली मुख्य पुरस्कार सुचेता भिडे चापेकर यांना प्रदान झाला. मंजिरी कारूळकर व आभा आवटी यांना कथ्थक नृत्यप्रावीण्यासाठी आणि शीतल ओक, शेखर कुंभोजकर व हर्षवर्धन पाठक यांना अनुक्रमे, वेशभूषा, गायन आणि प्रकाश योजना यांच्यातील नैपुण्याबद्दल त्या वर्षीचे सहपुरस्कार दिले गेले.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b "ज्येष्ठ कथ्थक नृत्यांगना रोहिणी भाटे यांचे निधन". २३ ऑक्टोबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link]
  2. ^ "संगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेते". रोजी मूळ पानापासून संग्रहित2011-10-02. २३ ऑक्टोबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: BOT: original-url status unknown (link)