Jump to content

युनायटेड एरलाइन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
युनायटेड एरलाइन्स
आय.ए.टी.ए.
UA
आय.सी.ए.ओ.
UAL
कॉलसाईन
युनायटेड
स्थापना एप्रिल ६, इ.स. १९२६
हब ओ'हेर विमानतळ, ह्युस्टन आंतरखंडीय विमानतळ, डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळ, वॉशिंग्टन डलेस आंतरराष्ट्रीय विमानतळ
मुख्य शहरे लॉस एंजेल्स, टोक्यो, न्युअर्क आंतरराष्ट्रीय विमानतळ, सान फ्रांसिस्को
फ्रिक्वेंट फ्लायर मायलेज प्लस
अलायन्स स्टार अलायन्स
उपकंपन्या चेल्सी फूड सर्व्हिस, युनायटेड व्हेकेशन्स इंक, मायलेज प्लस इंक
विमान संख्या ७०३
मुख्यालय शिकागो
प्रमुख व्यक्ती स्कॉट कर्बी (मुख्य कार्याधिकारी)
संकेतस्थळ http://www.united.com/

युनायटेड एरलाइन्स जगातील सगळ्यात मोठी विमानवाहतूक कंपनी आहे. अमेरिकेतील या कंपनीत ४८,००० कर्मचारी[] व ३६० विमाने[] आहेत.

युनायटेड कॉन्टिनेन्टल होल्डिंग्ज या कंपनीची उपकंपनी असलेल्या युनायटेड एरलाइन्सचे मुख्यालय शिकागो येथे आहे तर डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळ, शिकागो आंतरराष्ट्रीय विमानतळ, वॉशिंग्टन डल्लेस आंतरराष्ट्रीय विमानतळ, सान फ्रांसिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळ, लॉस एंजेल्स आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नरिता आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून मोठ्या प्रमाणात उड्डाणे होतात.[] युनायटेड एरलाइन्स स्टार अलायन्स या विमानवाहतूक कंपनीगटाचा पहिल्यापासून भाग आहे व त्यांतर्गत १७० देशांत १,०००पेक्षा जास्त ठिकाणांहून प्रवाशांची ने-आण करते.[]

विमानताफा

[संपादन]

युनायटेड एरलाइन्सचा ताफा हा जगातील सर्वात मोठ्या विमान ताफ्यांपैकी एक आहे. कंपनी प्रामुख्याने बोईंग आणि एरबस या कंपन्यांच्या विमानांचा वापर करते. []

फेब्रुवारी २०२६ च्या सुमारास युनायटेड एरलाइन्सकडे ५६३ विमाने होती. याअधिक ५४४ विमानांची मागणी विमानउत्पादकांकडे नोंदवलेल्या होत्या.

विमान प्रकारताफ्यात सक्रियऑर्डरवरप्रवासी क्षमता (सरासरी)नोंदी
एरबस ए३२१ निओ१८१६२२००नवीन तंत्रज्ञानाचा वापर []
एरबस ए३१९-१००८११२६लहान पल्ल्याच्या प्रवासासाठी
एरबस ए३२०-२००८७१५०मुख्यत्वे देशांतर्गत सेवा
बोईंग ७३७-७००३८१२६
बोईंग ७३७-८००१४११६६
बोईंग ७३७-९००१४८१७९
बोईंग ७३७ मॅक्स ८१०५३३१६६[]
बोईंग ७३७ मॅक्स ९८२५११७९
बोईंग ७३७ मॅक्स १०१६७१८८-१९५डिलिव्हरी अद्याप प्रलंबित
बोईंग ७५७-२००/३००६११७६-२३४टप्प्याटप्प्याने निवृत्त केले जाणार
बोईंग ७६७-३००/४००५३२०३-२३१
बोईंग ७७७-२००/३००९६२७६-३६४आंतरराष्ट्रीय लांब पल्ल्याचे प्रवास
बोईंग ७८७-८/९/१०७११५०२४३-३१८"ड्रीमलायनर" - अत्याधुनिक इंधन बचत []
एकूण९८१५६३

युती आणि कोडशेअर करार

[संपादन]

युनायटेड एरलाइन्स ही स्टार अलायन्सची सदस्य आहे. या युतीमध्ये २५ सदस्य विमान कंपन्यांचा समावेश असून त्यांचा एकत्रित ताफा ५,००० पेक्षा जास्त विमानांचा आहे. ही युती १९,००० पेक्षा अधिक उड्डाणांद्वारे १९५ देशांतील १,३०० हून अधिक विमानतळांवर सेवा देते आणि प्रवाशांना १,००० पेक्षा जास्त विश्रामगृहांत प्रवेश मिळतो.[][१०]

युनायटेडचे खालील विमान कंपन्यांशी कोडशेर करार आहेत:[११]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. United Airlines press release (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर) August 6, 2009.
  2. "Federal Aviation Administration– Airline Certificate Information– Detail View". 2011-07-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-12-15 रोजी पाहिले.
  3. (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  4. "UAL Corporation – Investor Relations – Company Information". Ir.united.com. 2010-01-01. 2011-07-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-05-03 रोजी पाहिले.
  5. "United Airlines Fleet Information". युनायटेड.कॉम. 2026-02-17 रोजी पाहिले.[permanent dead link]
  6. "United Airlines takes delivery of its first A321neo". ch-aviation.com. 2026-02-17 रोजी पाहिले.
  7. "United Airlines Orders and Deliveries". boeing.com. 2026-02-17 रोजी पाहिले.
  8. "United Airlines orders 100 Boeing 787 Dreamliners". reuters.com. 2026-02-17 रोजी पाहिले.
  9. Doherty, Patricia (July 23, 2024). "Everything You Need to Know About Star Alliance, One of the World's Largest Airline Alliances". Travel + Leisure. २०२५-०२-१३ रोजी पाहिले.
  10. "Facts & Figures". Star Alliance. May 2019. p. 1. February 11, 2025 रोजी पाहिले.
  11. "Airline mileage partners". June 8, 2024 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  12. "Italy and the USA even more connected: new codeshare agreement between ITA Airways and United Airlines takes off" (PDF). ita-airways.com (English भाषेत). 9 September 2025. 2025-10-06 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2026-02-17 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]