कथक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
कथक नृत्य सादर करणा-या युवती

कथक किंवा कथ्थक ही एक भारतीय नृत्यशैली आहे. ती भारतातील आठ शास्त्रीय नृत्य प्रकारांपैकी एक आहे. (इतर प्रकार - ओडिसी, कथकली, कुचिपुडी, भरतनाट्यम्, मणिपुरी, मोहिनीअट्ट्म आणि सत्त्रिया).

कथ्थक हा उत्तर भारतातील प्रमुख नृत्यप्रकार असून भावप्रधान आणि चमत्कारप्रधान तत्त्वाचा समावेश हे या शैलीचे वैशिष्ट्य आहे. शास्रीयदृष्ट्या या शैलीत गत, तोडे, नायक नायिका भेद, तत्कार, घुंगुरांचा आवाज, तालवादकासह नर्तकाची जुगलबंदी अशा प्रकारांचा समावेश होतो. या गोष्टीमुळे लोकरंजनही होते.

==कथक शब्दाचे

इतिहास[संपादन]

कथावाचन करणाऱ्यांकडून मंदिरांमधे पौराणिक कथा सांगितल्या जात. त्यानंतर होणाऱ्या कीर्तनात नट मंडळी नृत्य करीत असत. काही सामाजिक कारणांमुळे या नटमंडळींवर तत्कालीन परिस्थितीत बहिष्कार टाकला गेला, त्यामुळे यांनी स्वतःच कथा सांगून नृत्य करण्यास प्रारंभ केला, म्हणून त्यांना 'कत्थक' असे संबोधण्यात येऊ लागले. आचार्यांच्या मार्गदर्शनाखाली या नटमंडळींनी नृत्याची शास्त्रीय पद्धती व परिभाषा आत्मसात केली आणि नृत्यप्रधान अंगाने त्यांनी कृष्णाच्या लीलांचे सादरीकरण करण्यास सुरुवात केली, आणि कथक नृत्यशैलीचा जन्म झाला.

घराणे परंपरा[संपादन]

कथकची तीन प्रमुख घराणी आहेत -

१. जयपूर घराणे - भानुजी हे मुख्य प्रवर्तक. याच्या चार शाखांचे नायक नत्थूलाल, शंकरलाल, गिरिधारीलाल व भानजी. हे अन्य प्रवर्तक होत.

२. लखनौ घराणे - प्रवर्तक : ईश्वरीप्रसाद.

३. बनारस घराणे - प्रवर्तक : जानकीप्रसाद

४. रायगड घराणे - हे फारसे प्रचलित नाही.

इतर शास्त्रीय नृत्य प्रकारांच्या तुलनेत कथकमध्ये पाय ताठ ठेवले जातात. हा कथकवरील मोगल प्रभावामुळे झालेला बदल आहे असे मानले जाते.[१]

प्रसिद्ध कलाकार[संपादन]

पंडित बिरजू महाराज

अच्छन महाराज, बिरजू महाराज, रोहिणी भाटे, मंजिरी देव, रोशनकुमारी, हजारी प्रसाद हे कथ्थक नृत्यप्रकारातील प्रसिद्ध कलावंत आहेत. महाराष्ट्रात कथ्थक नृत्यप्रकारातील प्रमुख कलावंत आहेत मनीषा साठे, शमा भाटे, उमा डोगरा, माधुरी दीक्षित,टीना तांबे, अदिती भागवत आणि नंदकिशोर कपोते.   

चित्रदालन[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ डॉ. गर्ग सत्यनारायण, संगीत विशारद, १९९४