एप्रिल ५
Appearance
<< | एप्रिल २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | |||||
३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ |
१० | ११ | १२ | १३ | १४ | १५ | १६ |
१७ | १८ | १९ | २० | २१ | २२ | २३ |
२४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
एप्रिल ५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ९५ वा किंवा लीप वर्षात ९६ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]सतरावे शतक
[संपादन]- १६६३ - दहा हजार फौजेसह पुण्याच्या लाल महालात तळ देऊन राहिलेला मोगल सुभेदार शाहिस्तेखान याच्यावर शिवाजी महाराजांनी दोनशे स्वारांसह अकस्मात छापा घातला. शाहिस्तेखान खिडकीतुन पळून गेल्याने बचावला; मात्र पळुन जाण्याच्या प्रयत्नात त्याची तीन बोटे तुटली. या प्रसंगापासून मराठीत ’’जिवावरचे बोटावर निभावले’’ हा शब्दप्रयोग रुढ झाला.
- १६७९ - छत्रपती राजाराम यांना पकडण्यासाठी झुल्फिकारखानाने रायगडास वेढा दिला असता राजाराम रायगडावरून प्रतापगडास गेले. पुढे प्रतापगडासही शत्रूने वेढा दिल्यावर छत्रपती राजाराम यांना पन्हाळगडावर जावे लागले. [चैत्र व. १०]
अठरावे शतक
[संपादन]- १७९४ - फ्रेंच राज्यक्रांती-क्रांतीचा एक नेता जॉर्ज दॉंतों यावर सरकार उलथवण्याच्या कटाचा आरोप ठेवून त्याचा गिलोटीनवर शिरच्छेद.
एकोणिसावे शतक
[संपादन]- १८०४ - नोंद झालेला पहिला अशनी स्कॉटलंडमधे पडला.
विसावे शतक
[संपादन]- १९२२ - अमेरिकन बर्थ कंट्रोल लीग (पुढे प्लॅन्ड पेरेंटहूड)ची सुरुवात.
- १९३० - २४१ मैल प्रवास करून महात्मा गांधी यांनी दांडीयात्रा संपविली.
- १९४९ - भारतात स्काऊट, गाईडची स्थापना.
- १९५७ - भारतात कम्युनिस्टांचा राज्यस्तरावर प्रथम विजय, केरळ विधानसभेत बहुमत आणि इ.एम.एस. नंबुद्रीपाद मुख्यमंत्रीपदी.
- १९७९ - भारतातल्या पहिल्या नाविक वस्तुसंग्रहालयाचे मुंबईत उद्घाटन
एकविसावे शतक
[संपादन]- २००० - अभिनेत्री सुलोचना यांच्या हस्ते डी.डी.- ० या मराठी उपग्रह वाहिनीचे सह्याद्री असे नामकरण करण्यात आले.
- २००० - जळगाव नगरपालिकेच्या १७ मजली इमारतीचे उद्घाटन.
- २०१३ - ठाण्याजवळील मुंब्रा येथे अनधिकृत इमारत कोसळून ६० ठार. पन्नासपेक्षा अधिक जखमी.
जन्म
[संपादन]- १२८८ - गो-फुशिमी, जपानी सम्राट.
- १६२२ - व्हिंसेंझो व्हिवियानी, इटालियन गणितज्ञ.
- १८२७ - सर जोसेफ लिस्टर, निर्जंतुकीकरणामुळे जखमा लवकर बऱ्या होतात हे सिद्ध करणारा ब्रिटिश शल्यविशारद.
- १८५६ - बुकर टी. वॉशिंग्टन, कृष्णवर्णीय अमेरिकनांसाठी कार्य करणारे समाजसेवक, लेखक, वक्ते व शिक्षणतज्ञ.
- १९०८ - जगजीवनराम, भारतीय राजकारणी.
- १९०९ - आल्बर्ट आर. ब्रॉक्कोली, अमेरिकन चित्रपटनिर्माता.
- १९१६ - ग्रेगोरी पेक, अमेरिकन चित्रपट अभिनेता.
- १९२० - आर्थर हेली, अमेरिकन लेखक.
- १९२० - रफिक झकेरिया, भारतीय लेखक.
- १९२३ - न्विन व्हान थियू, दक्षिण व्हियेतनामचा राष्ट्राध्यक्ष.
- १९२९ - इव्हार गियाएव्हेर, नॉर्वेचा भौतिकशास्त्रज्ञ.
- १९२९ - नायजेल हॉथॉर्न, इंग्लिश चित्रपट अभिनेता.
- १९३७ - कॉलिन पॉवेल, अमेरिकेचा परराष्ट्रसचिव.
- १९४७ - ग्लोरिया मॅकापगाल-अरोयो, फिलिपाईन्सची राष्ट्राध्यक्ष.
- १९६६ - आसिफ मांडवी, भारतीय-ब्रिटिश अभिनेता.
मृत्यू
[संपादन]- १९१७ - स्वातंत्र्यशाहीर शंकरराव निकम.
- १९२२ - पंडिता रमाबाई, आर्य महिला समाजच्या संस्थापिका.
- १९४० - चार्लस फ्रिअरी तथा दीनबंधू अॅन्ड्र्यूज, इंग्लिश मिशनरी, महात्मा गांधींचे जवळचे मित्र, समाजसेवक आणि भारताच्या स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते.
- १९९३ - दिव्या भारती, हिंदी, तमिळ आणि तेलुगु चित्रपट अभिनेत्री.
- १९९६ - भालचंद्र नीळकंठ तथा बाबा पटवर्धन, बालगंधर्वांना पंधरा वर्षे साथ करणारे ऑर्गनवादक,
- १९९८ - रुही बेर्डे, मराठीचित्रपट व नाट्य अभिनेत्री.
- २००२ - मनोहर राजाराम तथा मनू छाब्रिया, दुबईस्थित वादग्रस्त भारतीय उद्योगपती, जम्बो ग्रुपचे संचालक.
- २००७ - लीला मजुमदार, मराठी लेखिका.
- २००७ - पूर्णचंद्र तेजस्वी, साहित्यिक, लेखन, छायाचित्रकार, चित्रकार, पर्यावरणवादी.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]- राष्ट्रीय नौकानयन दिन
- राष्ट्रीय समुद्र संपत्ती दिवस
बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर एप्रिल ५ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
एप्रिल ३ - एप्रिल ४ - एप्रिल ५ - एप्रिल ६ - एप्रिल ७ - (एप्रिल महिना)