सह्याद्री (वाहिनी)
Jump to navigation
Jump to search
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल. |
हा लेख भारतातील दूरचित्रवाहिनी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, सह्याद्री (नि:संदिग्धीकरण).
सह्याद्री वाहिनी | |
---|---|
![]() | |
सुरुवात | इ.स. १९९४ |
मालक | प्रसार भारती |
ब्रीदवाक्य | सत्यम शिवम सुंदरम् |
देश | भारत |
प्रसारण क्षेत्र | भारत, चीन, आखाती देश, इतर जगातील बहुसंख्य देश |
मुख्यालय | मुंबई |
जुने नाव | दुरदर्शन केंद्र मुंबई |
भगिनी वाहिनी | दूरदर्शनच्या इतर प्रादेशिक वाहिन्या आणि दिल्ली दूरदर्शन केंद्र |
प्रसारण वेळ | २४ तास प्रक्षेपण |
संकेतस्थळ | www.ddkSahyadri.tv |
सह्याद्री ही दूरदर्शनची मुख्यत्वेकरून महाराष्ट्रात प्रसारित होणाही उपग्रह व प्रादेशिक वाहिनी आहे. ही महाराष्ट्रातील दूरदर्शनची सर्वात जुनी वाहिनी आहे. याचे २४ तास प्रक्षेपण सुरू असते. मराठी बातम्या व मालिकांसाठी या वाहिनीस बराच मोठा प्रेक्षकवर्ग आहे. दूरदर्शन हे स्वतःचे कार्यक्रम स्वतःच निर्माण करते. काही कार्यक्रम, विशेषतः मालिका, ह्या खाजगी निर्मात्यांकडून पण तयार केल्या जातात.
त्याचे मुख्यालय हे वरळी, मुंबई येथे आहे. सह्याद्रीस त्याचे स्वतःचे निर्माण-कक्ष आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असलेली बाह्य-प्रक्षेपण वाहने (Outdoor Broadcasting vans), सर्व निर्मितींसाठी अद्ययावत संपादनाच्या सुविधा इत्यादीने ते परिपूर्ण आहे.