फेब्रुवारी २०
Appearance
(२० फेब्रुवारी या पानावरून पुनर्निर्देशित)
<< | फेब्रुवारी २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ |
फेब्रुवारी २० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ५१ वा किंवा लीप वर्षात ५१ वा दिवस असतो.
ठळक घटना
[संपादन]पंधरावे शतक
[संपादन]- १४७२ - शेटलंड व ओर्कने हे द्वीपसमूह स्कॉटलंडने बळकावले.
अठरावे शतक
[संपादन]- १७९२ - जॉर्ज वॉशिंग्टनने टपाल सेवा कायद्यावर सही केली. अमेरिकन टपाल खाते अस्तित्वात.
एकोणिसावे शतक
[संपादन]- १८३५ - तीव्र भूकंपात चिलीतील कन्सेप्शन हे गाव नेस्तनाबूद.
- १८३५ - कलकत्ता मेडिकल कॉलेज अधिकृतरीत्या खुले झाले.
- १८४६ - इंग्रजांनी लाहोर जिंकले
- १८४७ - रॉयल कलकत्ता टर्फ क्लबची स्थापना
विसावे शतक
[संपादन]- १९१३ - ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेराची स्थापना.
- १९६२ - जॉन ग्लेनने फ्रेंडशिप ७ या उपग्रहातून पृथ्वीप्रदक्षिणा केली व हे करणारा प्रथम अमेरिकन ठरला.
- १९६८ - मुंबईच्या के.इ.एम. हॉस्पिटलमध्ये डॉ. पी.के. सेन भारतातील ह्रदय प्रत्यारोपणाची पहिली शस्त्रक्रिया केली.
- १९७६ - मुंबई हायमधून व्यावसायिक रीत्या खनिज तेलाचे उत्पादन सुरू झाले.
- १९८७ - मिझोरम आणि अरुणाचल प्रदेश भारताची राज्ये झाली.
एकविसावे शतक
[संपादन]- २००३ - अमेरिकेच्या ऱ्होड आयलंड राज्यातील नाइटक्लबला आग. १०० ठार, २०० जखमी.
- २०१४ - तेलंगणा हे भारताचे २९वे राज्य झाले.
जन्म
[संपादन]- १९०१ - मुहम्मद नाग्विब, इजिप्तचा राष्ट्राध्यक्ष.
- १९०२ - ऍन्सेल ऍडम्स, अमेरिकन छायाचित्रकार.
- १९०४ - अलेक्सेइ कोसिजिन, सोवियेत राष्ट्राध्यक्ष.
- १९०९ - अजोय घोष, भारतीय साम्यवादी नेता.
- १९२३ - फोर्ब्स बर्नहॅम, गुयानाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९२७ - सिडनी पोईटिये, अमेरिकन अभिनेता.
- १९३२ – के.व्ही. सुबण्णा कन्नड नाटककार.
- १९४५ - अन्नू कपूर, हिंदी चित्रपट अभिनेता.
- १९७६ - रोहन गावस्कर, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९८८ – जिया खान, भारतीय अभिनेत्री
- १९९२ - रमेश औटी, चित्रपट संपादक
मृत्यू
[संपादन]- ७०२ - चान बाह्लुम दुसरा, मेक्सिकोतील पालेन्क या माया राज्याचा राजा.
- ११९४ - टॅन्क्रेड, सिसिलीचा राजा.
- १२५८ - अल मुस्तसिम, बगदादचा खलिफा.
- १४३१ - पोप मार्टिन पाचवा.
- १५१३ - क्रिस्चियन दुसरा, डेन्मार्कचा राजा.
- १७०७ - औरंगझेब, मुघल सम्राट.
- १९०५ - विष्णूपंत छत्रे, भारतीय सर्कस मालक
- १९५० - शरत चन्द्र बोस, भारतीय स्वातंत्र्यसैनिक.
- १९७२ - शिवनारायण श्रीवास्तव, हिंदी साहित्यिक.
- १७७३ - चार्ल्स इमॅन्युएल तिसरा, सार्डिनीयाचा राजा.
- १९८५ - भवानी प्रसाद मिश्र, हिंदी कवी.
- १७९० - जोसेफ दुसरा, पवित्र रोमन सम्राट.
- १९२० - रॉबर्ट पियरी, अमेरिकन शोधक.
- १९६६ - चेस्टर निमित्झ, अमेरिकन दर्यासारंग (ॲडमिरल).
- १९८५ - क्लॅरेन्स नॅश, अमेरिकन अभिनेता, डोनाल्ड डकचा आवाज.
- १९९९ - जीन सिस्केल, अमेरिकन चित्रपट समीक्षक, एबर्ट आणि सिस्केलचा अर्धा भाग.
- २००५ - हंटर एस. थॉम्पसन, अमेरिकन पत्रकार, लेखक.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]- अरुणाचल प्रदेश दिवस
- मिझोरम दिवस
- विश्व सामाजिक न्याय दिवस
बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर फेब्रुवारी २० च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
फेब्रुवारी १८ - फेब्रुवारी १९ - फेब्रुवारी २० - फेब्रुवारी २१ - फेब्रुवारी २२ - (फेब्रुवारी महिना)