अजोय घोष
अजोय कुमार घोष (बांग्ला: অজয়কুমার ঘোষ) (जन्म : २० फेब्रुवारी १९०९ मृत्यू ; जानेवारी १९६२) हा भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातला एक क्रांतिकारक होता.[१]) [२]
सुरुवातीचे जीवन
[संपादन]घोषचा जन्म पश्चिम बंगालमधील येथील वर्धमान जिल्ह्यातील मिहिजाम या गावी झाला. पुढे त्याचे वडील शचीन्द्रनाथ ह्यांच्याबरोबर तो कानपूरला राहायला गेला.[३]
राजनैतिक जीवन
[संपादन]१९२६ साली अलाहाबाद विद्यापीठात प्रवेश घेण्याअगोदर अजयकुमार घोष हा भगतसिंग व बटुकेश्वर दत्त ह्यांना भेटला होता. नंतर तो हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मीचा सदस्य झाला. त्याला १९२९ च्या लाहोर कट खटल्यात अटक करण्यात आली व तुरुंगवासही झाला. पण पुराव्याअभावी त्याला सोडण्यात आले.
१९३१ साली घोषला पुन्हा अटक झाली व तो तुरुंगात श्रीनिवास सरदेसाई ह्याच्या संपर्कात आला. तुरुंगातून बाहेर पडल्यावर तो भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा सदस्य झाला.[३] १९३४ साली तो पक्षाच्या केंद्रीय समितीमध्ये व १९३६मध्ये पक्षाच्या पॉलिट ब्युरोमध्ये नेमला गेला. १९३८ साली तो पक्षाच्या 'नॅशनल फ्रन्ट' ह्या नावाच्या मुखपत्राच्या संपादकीय समितीमध्ये दाखल झाला.
अजयकुमार घोष हा १९५१ पासून ते १९६२ साली त्याच्या म्रुृत्यूपर्यंत तो भारतीय कम्यनिस्ट पक्षाचा (भाकपचा) राष्ट्रीय अध्यक्ष होता. १९६२ च्या भारत-चीन युद्ध सुरू असताना तो भाकपचा अध्यक्ष होता. युद्धाच्या वेळेस य्याने कम्युनिस्ट चीनच्या बाजूचा नव्हता, तर त्याने भारताच्या बाजूचे समर्थन केले.
१९६४ च्या भारतीय कम्यनिस्ट पक्ष व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांच्या फुटीच्याअगोदर, तो भाकपच्या मध्यस्त भागाचा सदस्य होता.