१९९०-९१ आशिया चषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९९०-९१ आशिया चषक
तारीख २५ डिसेंबर १९९० – ४ जानेवारी १९९१
व्यवस्थापक आशिया क्रिकेट संघटन
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने
स्पर्धा प्रकार साखळी सामने आणि अंतिम सामना
यजमान भारत भारत
विजेते भारतचा ध्वज भारत (३ वेळा)
सहभाग
सामने
सर्वात जास्त धावा श्रीलंका अर्जुन रणतुंगा (१६६)
सर्वात जास्त बळी भारत कपिल देव (९)
१९८८ (आधी) (नंतर) १९९५

१९९०-९१ आशिया चषक ही आशिया क्रिकेट संघटन ने आयोजित केलेली एकदिवसीय स्पर्धा होती. आशिया चषक मालिकेतील ही चौथी स्पर्धा भारतामध्ये २५ डिसेंबर १९९० ते ४ जानेवारी १९९१ दरम्यान झाली. स्पर्धेत भारत, श्रीलंका आणि बांगलादेश हे तीन संघ सहभागी झाले होते. भारतासोबत ताणल्या गेलेल्या राजकीय संबंधांमुळे पाकिस्तानने स्पर्धेतून अंग काढून घेतले होते.

सदर स्पर्धा साखळी पद्धतीने खेळवली गेली, ज्यामध्ये प्रत्येक संघ इतर संघांबरोबर प्रत्येकी एकदा खेळा आणि दोन सर्वोत्तम संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले. भारत आणि श्रीलंकेदरम्यान झालेल्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा ७ गडी राखून पराभव केला आणि सलग दुसऱ्यांदा (एकूण तिसऱ्यांदा) आशिया चषकावर आपले नाव कोरले.

गुणफलक[संपादन]

संघ सा वि गुण धा
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ४.९०८
भारतचा ध्वज भारत ४.२२२
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ३.६६३

सामने[संपादन]

साखळी सामने[संपादन]

२५ डिसेंबर १९९०
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१७०/६ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१७१/१ (३६.५ षटके)
फारुक अहमद ५७ (१२६)
कपिल देव २/१७ (८ षटके)
नवज्योतसिंग सिद्धू १०४ (१०९)
अथर अली खान १/२३ (६ षटके)
भारत ९ गडी राखून विजयी.
सेक्टर १६ स्टेडियम, चंदिगढ
सामनावीर: नवज्योतसिंग सिद्धू (भारत)
  • नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी.
  • बांगलादेशने भारतात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
  • सरदिंदू मुखर्जी (भा) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

२८ डिसेंबर १९९०
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२१४ (४९.२ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१७८ (४५.५ षटके)
अर्जुन रणतुंगा ५३ (१०५)
अतुल वासन ३/२८ (१० षटके)
श्रीलंका ३६ धावांनी विजयी.
बाराबती स्टेडियम, कटक
सामनावीर: अर्जुन रणतुंगा (श्रीलंका)
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.

३१ डिसेंबर १९९०
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२४९/४ (४५ षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१७८/९ (४५ षटके)
अथर अली खान ७८ (९५)
सनथ जयसुर्या ३/३९ (९ षटके)
श्रीलंका ७१ धावांनी विजयी.
ईडन गार्डन्स, कोलकाता
सामनावीर: अथर अली खान (बांगलादेश)
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.
  • धुक्यामुळे सामना उशीरा सुरू करण्यात आला आणि प्रत्येकी ४५ षटकांचा खेळवला गेला.
  • सैफुल इस्लाम (बां) आणि प्रमोद्य विक्रमसिंगे (श्री) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • बांगलादेशची एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट धावसंख्या.


अंतिम सामना[संपादन]

४ जानेवारी १९९१
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२०४/९ (४५ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२०५/३ (४२.१ षटके)
अर्जुन रणतुंगा ४९ (५७)
कपिल देव ४/३१ (९ षटके)
भारत ७ गडी राखून विजयी.
इडन गार्डन्स, कोलकाता
सामनावीर: मोहम्मद अझरूद्दीन (भारत)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे सामना ३ जानेवारी ऐवजी ४ जानेवारी रोजी खेळवला गेला आणि प्रत्येकी ४५ षटकांचा केला गेला.


संदर्भ आणि नोंदी[संपादन]

बाह्यदुवे[संपादन]

मालिका मुख्यपान – इएसपीएन क्रिकइन्फो विस्तृत माहिती – क्रिकइन्फो