Jump to content

१९८४ आशिया चषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९८४ आशिया चषक
तारीख ६ – १३ एप्रिल १९८४
व्यवस्थापक आशिया क्रिकेट संघटन
क्रिकेट प्रकार एकदिवसीय सामने
स्पर्धा प्रकार साखळी फेरी
यजमान संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती
विजेते भारतचा ध्वज भारत (१ वेळा)
सहभाग
सामने
मालिकावीर भारत सुरिंदर खन्ना
सर्वात जास्त धावा भारत सुरिंदर खन्ना (१०७)
सर्वात जास्त बळी भारत रवी शास्त्री (४)
(नंतर) १९८६

१९८४ आशिया चषक ही आशिया क्रिकेट संघटन ने आयोजित केलेली एकदिवसीय स्पर्धा होती. आशिया चषक मालिकेतील ही प्रथम स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये एप्रिल १९८४ मध्ये झाली. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका या आशिया खंडातील ३ कसोटी खेळणाऱ्या देशांनी सहभाग घेतला. सर्व सामने शारजाहमधील शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळविण्यात आले. या मैदानावर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला होता.

स्पर्धा साखळी पद्धतीने खेळविण्यात आली. प्रत्येक संघ विरुद्ध संघाशी एक सामना खेळला. अंतिम समयी भारताने दोनी सामने जिंकत पहिल्या आशिया चषकावर नाव कोरले तर श्रीलंका १ विजय आणि १ पराभवासह दुसऱ्या स्थानावर (उपविजेता) राहिला. पाकिस्तानला एकही सामना जिंकण्यात यश आले नाही. भारताच्या सुरिंदर खन्नाला मालिकावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

सहभागी देश[संपादन]

देश/संघ पात्रतेचा मार्ग सद्य धरून एकूण विश्वचषकांमध्ये सहभाग संख्या मागील सहभाग स्पर्धा मागील स्पर्धांमधील उच्च कामगिरी
भारतचा ध्वज भारत आयसीसी संपूर्ण सदस्य पदार्पण पदार्पण
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान पदार्पण पदार्पण
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका पदार्पण पदार्पण

मैदाने[संपादन]

संयुक्त अरब अमिराती
शारजाह
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम
प्रेक्षक क्षमता: १७,०००
सामने: ३

गुणफलक[संपादन]

संघ
सा वि गुण धावगती
भारतचा ध्वज भारत +४.२१२
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका +३.०५९
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान +३.४८९

सामने[संपादन]

६ एप्रिल १९८४
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१८७/९ (४६ षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१९०/५ (४३.३ षटके)
झहीर अब्बास ४७ (६८)
अर्जुन रणतुंगा ३/३८ (१० षटके)
रॉय डायस ५७ (९८)
अब्दुल कादिर २/४२ (९ षटके)
श्रीलंका ५ गडी राखून विजयी
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
सामनावीर: रॉय डायस (श्रीलंका)
  • नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी
  • संयुक्त अरब अमिरातीच्या भूमीवर खेळवला गेलेला पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन्ही देशांचा संयुक्त अरब अमिरातीच्या भूमीवरचा पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.

८ एप्रिल १९८४
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
९६ (४१ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
९७/० (२१.४ षटके)
रंजन मदुगले ३८ (७६)
मदनलाल ३/११ (८ षटके)
भारत १० गडी राखून विजयी
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
सामनावीर: सुरिंदर खन्ना (भारत)
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी
  • मनोज प्रभाकर (भा) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • भारताचा संयुक्त अरब अमिरातीच्या भूमीवरचा पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.

१३ एप्रिल १९८४
धावफलक
भारत Flag of भारत
१८८/४ (४६ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१३४ (३९.४ षटके)
सुरिंदर खन्ना ५६ (७२)
शाहिद महबूब १/२३ (१० षटके)
मोहसीन खान ३५ (६५)
रॉजर बिन्नी ३/३३ (९.४ षटके)
भारत ५४ धावांनी विजयी
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
सामनावीर: सुरिंदर खन्ना (भारत)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी