सोलापूर विद्यापीठ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

ब्रीदवाक्य = "विद्यया संपन्नता"
स्थापना इ.स. २००४
प्रकार शासकीय शैक्षणिक आस्थापना
कुलपती महाराष्ट्राचे राज्यपाल
कुलगुरू डॉ.मृणालिनी फडणवीस
विद्यार्थी ६५,०००
ठिकाण सोलापूर, महाराष्ट्र, भारत
परिसर ४८२ एकर
नियंत्रक नॅक, यु.जी.सी.
संकेतस्थळ सोलापूर विद्यापीठ


Unbalanced scales.svg
या लेख/विभागाच्या नि:पक्षपातीपणाबद्दल वाद आहे.
कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहा.


सोलापूर विद्यापीठ हे भारत देशातल्या महाराष्ट्र राज्यातील एक विद्यापीठ आहे. याच्या अखत्यारीत फक्त सोलापूर जिल्हा येतो. हा जिल्हा या पूर्वी कोल्हापूर विद्यापीठाअंतर्गत होता.सोलापूर विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू मा.डॉ.इरेश स्वामी होते. त्यांनी हिंदी विषयाचे ख्यातनाम प्राध्यापक म्हणून ज्ञान दानाचे कार्य केले.

स्थापना[संपादन]

सोलापूर विद्यापीठाची स्थापना १ ऑगस्ट २००४ रोजी झाली. विद्यापीठाचे उद्‌घाटन तत्कालीन राज्यपाल माननीय श्रीयुत डॉ. मोहम्मद फजल यांच्या हस्ते झाले. डॉ. इरेश स्वामी हे सोलापूर विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होत. सोलपुर् विद्यापीठ हे डिजिटल युनिवर्सिटि आहे. सोलापूर विद्यापीठ हे सोलापूर या एकमेव जिल्ह्यासाठी स्थापन झालेले विद्यापीठ आहे.सोलापूर विद्यापीठ मध्ये एकूण सहा विभाग आहेत. त्यात सामाजिक शास्त्रे संकुल, रसायनशास्त्र संकुल, पदार्थ विज्ञान संकुल, पर्यावरण संकुल, शिक्षण शास्त्रे संकुल, गणीत शास्त्रे संकुल इत्यादी

पत्रकारिता शिक्षण[संपादन]

सध्या आपल्या जीवनामध्ये पत्रकारितेचे महत्व वाढत चाललेले आहे आणि माध्यमांचे आपल्या जीवनातले स्थानही उंचावत आहे. या स्थानामुळे पत्रकारिता हे एक चांगले करिअर म्हणून बुद्धीमान तरुणांना आकर्षित करत आहे. बर्‍याच विद्यार्थ्यांना विविध विद्यापीठातील पत्रकारितेचे पूर्णवेळचे अभ्यासक्रम करणे परवडते. असे विद्यार्थी पत्रकारितेचे अल्पवेळचे अभ्यासक्रम शोधत असतात. त्यांचा हा शोध विचारात घेऊन भारतामध्ये शेकडो संस्थांनी पत्रद्वारा किंवा अर्धवेळचे अभ्यासक्रम सुरू केलेले आहेत. सन २००४ साली सुरु झालेल्या सोलापूर विद्यापीठात जनसंज्ञापन विषयाचा अभ्यासक्रम सुरु आहे सदर अभ्यासक्रम चार सत्रांचा असून या जनसंज्ञापन विभागात डॉक्टर रवींद्र चिंचोलकर हे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. या अभ्यासक्रमासाठी असणारी सर्व अध्ययन साहित्य विद्यापीठाच्या ग्रंथालयात हिंदी आणि इंग्रजीत उपलब्ध आहेत. तसेच आंतरजाल सहित संगणक प्रयोग शाळा ही उपलब्ध आहे . पत्रकारिता विभागातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अशी मिडिया लॅब आहे. तसेच पत्रकारिता करीत असताना विद्यार्थ्यांना नव-नव गोष्टींची माहिती व्हावी तसेच त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून विविध विषयांवरील कार्यशाळांचे आयोजन हि वेळोवेळी केले जाते. ११ जानेवारी २०१९ रोजी आयोजित विकीपिडिया कार्यशाळेत विध्यार्थ्यांना या विषयीचे महत्व व माहिती वेळोवेळी देण्यात येते.

विद्यापीठ मधील शिक्षण विभाग[संपादन]

सोलापूर विद्यापीठ, सोलापूर. मध्ये सामाजिक शास्त्रे विभाग (जनसंज्ञापन विभाग, पुरातन शास्त्र विभाग, अर्थशास्त्र विभाग, नागरी विभाग) रसायनशास्त्र विभाग भौतिक शास्त्र विभाग भूगोल विभाग. इत्यादी विभागात शिक्षण घेताना दिसतात विद्यार्थ्त्याना दिली जाणारी सेवा outsanding आहे धन्यवाद ......!

रा से यो विभाग[संपादन]

विद्यापीठाचे रा से यो विभाग प्रत्येक उपक्रमात अग्रेसर असते. २०११ साली आव्हान आपत्ति व्यवस्थापन शिबिर पहिल्यान्दा सोलापुर विद्यापीठाचे कर्यक्रम् समन्वयक डॉ. तुकाराम शिन्दे यान्च्या मर्गदर्शनाखाली भरवली होती. शैक्शणिक् वर्श् २०१५-१६ चे इन्दिरा गान्धि ऊत्क्रुश्ट् स्वयम्सेवक् पुरस्कार याच विद्यापीठाचे आफ्ताब शेख यान्ना मिळाला.

बाह्य दुवा[संपादन]

सोलापूर विद्यापीठाचे संकेतस्थळ