माढा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

भारतीय न्यायक्षेत्र प्रकार = तालुका स्थानिक नाव = माढा इतर नाव = माढे राज्य नाव = महाराष्ट्र स्थान व विस्तार -: अक्षांश = १७ अक्षांशमिनिटे = ५९ अक्षांशसेकंद = ०४ रेखांश= ७५ रेखांशमिनिटे= ३१ रेखांशसेकंद= २२


नकाशा शीर्षक = क्षेत्रफळ एकूण = क्षेत्रफळ आकारमान = क्षेत्रफळ क्रमांक = क्षेत्रफळ एकूण संदर्भ =

उंची = उंची संदर्भ = समुद्री किनारा = हवामान = वर्षाव = तापमान वार्षिक = तापमान हिवाळा =

तापमान उन्हाळा             = 

मुख्यालय = मोठे शहर = कूर्डुवाडी जवळचे शहर = सोलापूर व पंढरपूर प्रांत = कूर्डुवाडी विभाग = पुणे जिल्हा = सोलापूर लोकसंख्या एकूण = लोकसंख्या वर्ष = लोकसंख्या एकूण संदर्भ = लोकसंख्या घनता = लिंग गुणोत्तर = साक्षरता = साक्षरता पुरुष = साक्षरता स्त्री = अधिकृत भाषा = मराठी नेता पद = संसदीय मतदारसंघ = माढा विधानसभा मतदारसंघ = माढा न्यायक्षेत्र शीर्षक १ = तहसील न्यायक्षेत्र शीर्षक २ = पंचायत समिती, कूर्डुवाडी एसटीडी कोड = ०२१८३ पिन कोड = ४१३२०९ आर. टी. ओ. कोड = महा.१३ (सोलापूर) आणि महा.४५ (अकलूज) 'माढा' हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे.

    माढेश्वरी देवीच्या नावापासून माढा या नावाची व्युत्पती झाली आहे. आश्विन महिन्यातील नवरात्रामधे या देवीची नऊ दिवसाची यात्रा असते. देवीचे मंदिर हेमाडपंथी आहे.माढा शहर मनकर्णा नदीच्या तीरावर वसलेले आहे.माढा तालुक्यातील अरण या गावचे संत सावता माळी (जन्म:इ.स. १२५०; समाधी इ.स.१२९५) हे एक मराठी संतकवी होते.

त्यांचे गाजलेले अभंग - ‘आमची माळियाची जात,शेत लावू बागाईत’ 'कांदा मुळा भाजी, अवघी विठाबाई माझी’ 'लसण मिरची कोथंबिरी, अवघा झाला माझा हरि’

उजनी धरण-:

   माढा तालुक्यात टेंभुर्णी​ जवळील भीमानगर या गावाजवळ,सोलापूर जिल्ह्याचे वरदायिनी ठरलेले भीमा नदीवरचे उजनी​ हे एक मोठे धरण आहे.याचे पाणी पुढे नीरा-नरसिंहपूर येथे नीरा नदीला जाऊन मिळते. सोलापूर जिल्ह्यातील एकमेव व एकच धरण उजनी धरणाला'यशवंतसागर'असेही संबोधले जाते.

क्षमता -: या धरणाची पाणी साठविण्याची क्षमता १५१७ गिगालिटर्स (Gigalitres) एवढी प्रचंड आहे.११७ टि.एम.सी (१००%) क्षमतेच्या बाबतीत या धरणाचा क्रमांक कोयना व जायकवाडी यांच्याआधी पहिला लागतो. या धरणात पोहचणारे पाणी थेट पुण्याच्या मुळामुठा सारख्या अनेक नद्यांमधून येते. एवढी मोठी जलक्षमता असलेला हा तलाव असल्याने येथे मत्स्यपालनाचा व्यवसाय ही मोठ्या प्रमाणात चालतो.या धरणाच्या जलाशयास यशवंतसागर म्हणतात.फ्लेमिंगो (रोहित) हा परदेशी पक्षी हिवाळ्यात या जलाशयावर येतो.

गढी[संपादन]

येथे जहागीरदार राव रंभा निंबाळकर यांची गढी आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

प्राचीन भुईकोट किल्ला - माढ्यामध्ये प्राचीन भुईकोट किल्ला आहे. याची निर्मिती राव रंभाजी निंबाळकर राजे यांनी केली. माढा शहराची लोकसंख्या ११००० आहे. माढ्यातील प्राचीन भुईकोट किल्ल्याची अवस्था अत्यंत दयनीय झालेली अाहे. किल्ल्याची पडझड झाली आहे.पुरातत्व खात्याचे दुर्लक्ष झाले आहे.