करमाळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?करमाळा
महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
गुणक: (शोधा गुणक)
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
भाषा मराठी
तहसील करमाळा
पंचायत समिती करमाळा


करमाळा is located in India
करमाळा
करमाळा
करमाळा (India)

करमाळा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. करमाळा गाव हे त्या तालुक्याचे ठिकाण आहे.

ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व[संपादन]

करमाळा हे कमालादेवीच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे.[१]

हे मंदिर राऊराजे निंबाळकर यांनी इ.स. १७२७ साली बांधले. या देवीस तुळजापूरच्या तुळजा भवानीचा अवतार मानले जाते. या मंदिरात ९६ या अंकाचे खूप महत्त्व आहे. हेमाडपंती स्थापत्यशैलीने बांधलेल्या या मंदिराचे एक प्रवेशद्वार आग्नेय दिशेला तर दुसरे उत्तर दिशेला आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे यास ९६ खांब व ९६ खिडक्या आहेत. मंदिरात ९६ चित्रे आहेत व मंदिरातील विहिरीस ९६ पायऱ्या आहेत. येथे नवरात्रीचा सण खूप भक्तिभावाने साजरा केला जातो. कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेपासून चतुर्थीपर्यंत येथे वार्षिक यात्रा असते.

भौगोलिक: या तालुक्यातून भीमा नदी गेली आहे.त्यामूळे नदीकडचा भाग बागायत आहे.या भागात ऊसाची जास्त लागवड केली जाते.तसेच या तालुक्यातून रेल्वेमार्ग जातो.

तालुक्यातील गावे[संपादन]

करमाळा तालुक्यातील काही गावे (वर्णानुक्रमे):
बाळेवाडीबाळेवाडी ग्रामपंचायत वीट,अंजनडोह, कामोणे, कुंभेज, केम, कोंढेज, गुळसडी, खडकी(करमाळा), खडकेवाडी, जेऊर, तरटगाव, देवळाली, पांगरे, पांडे, पुनवर, भोसे, मांगी, वरकटणे, शेलगाव, सर्पडोह, साडे, सालसे, हिंगणी,पारेवाडी,सौंदे,ravgoan, BORGAON, KHAMBEWADI, PADLI, GHARGAON, NILAJ, POTHRE,Wangi Jinti, bhilarwadi delwadi

संदर्भ[संपादन]

  1. "सोलापूर जिल्ह्याच्या संकेतस्थळावरील करमाळ्याबद्दलचे पान" (मराठी मजकूर). एन.आय.सी. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक १९ ऑगस्ट २०१४ रोजी मिळविली). २००७-०९-३० रोजी पाहिले. 


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

ANJANDOH Traditionol Village & SHRI DHARMADEVI &TUKAIDEVI NAVRATRA UTSAV VIJAYDSMI DSARA

FROM SHRI DHARMADEVI CHARITABLE SANSTA ANJANDOH