माण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


  ?माण
माणदेश
महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
मोठे शहर म्हसवड
जवळचे शहर म्हसवड
विभाग पुणे
जिल्हा सातारा
भाषा मराठी
आमदार जयकुमार गोरे
खासदार रणजितसिंह निंबाळकर
संसदीय मतदारसंघ माढा
विधानसभा मतदारसंघ माण खटाव
तहसील माण माण
पंचायत समिती
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४१५५०८
• +०२१६५
• महा ११
संकेतस्थळ: [http://माणदेश डॉट् कॉम ]

माण हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील एक तालुका आहे. तालुक्याचे मुख्य ठिकाण दहिवडी आहे मात्र "म्हसवड" हे तालुक्यातील मोठे शहर आहे

पार्श्वभूमी[संपादन]

या तालुक्याचे मुख्य ठिकाण शहर दहिवडी हे आहे. माण हे शहर अथवा गाव तालुक्यात कुठेही अस्तित्वात नाही, खरे म्हणजे माण हे नदीचे नाव तालुक्याला देण्यात आले आहे, माण म्हणजेच "दहिवडी".तालुक्याचे मुख्य ठिकाण दहिवडी आहे मात्र "म्हसवड" हे मोठे शहर आहे आणि इतर नगरपरिषद आहे. दहिवडी शहर हे नगरपंचायतचे शहर आहे. कायम दुष्काळ असलेला हा तालुका असल्यामुळे पाण्याला महत्त्व देतो, त्यामुळे तालुक्याला दहिवडी नाव न देता नदीचे नाव "माण" आहे तसेच ऐतिहासिक तसेच भौगोलिक पण आहे त्यासाठी जमिनीतून एक प्रकारची माती निघते खोदल्यावर तिला म्हणतात त्यावरून ही देण्यात आले आहे. दहिवडी शहर ऐतिहासिक असून शहरात जुने महादेव मंदिर, सिद्धनाथ मंदिर आहे. महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्यांत या तालुक्याची गणना होते. माण तालुक्यातचे शिखर शिंगणापूरचे महादेवाचे प्राचीन मंदिर प्रसिद्ध आहे. तसेच शंभू महादेवाचे शिखर. श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे समाधि मंदिर गोंदवले तसेच म्हावड येथे सिद्धनाथ-जोगेश्वरी मंदिर आहे इथे दिवाळी नंतर 1 महिन्याने मोठी रथयात्रा असते त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र तसेच कर्नाटक तसेच इतर राज्यातून लोक येतात. या ठिकाणी कष्टाळू वृत्तीचे लोक आहेत. परंतु हाताला पुरेसे काम व रोजगार नसल्याने, तसेच पाण्याचा अभावामुळे येथील जनता त्रस्त आहे.

माणच्या आसपासची ठिकाणे[संपादन]

माण तालुक्यात अतिशय प्रसिद्ध तीर्थक्षेत्र शिखर शिंगणापूर (महाराष्ट्राचे कुलदैवत),म्हसवड सिद्धनाथ-जोगेश्वरी मंदिर, दहिवडी (श्री काशीपाते निलकंठ महाराज), जांभूळणी येथील श्री भोजलिंग व जोगेश्वरी मदिंर मोही (श्री महालक्ष्मी मंदिर), भवानी आई मंदिर (मार्डी), गोंदवले (श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज), वारुगड, म्हसवड (श्री सिद्धनाथ व जोगेश्वरी मंदिर ) मलवडी (खंडोबा, श्री महंत शांतिगिरीजी महाराज), पांगरी (बिरोबा, सतोबा),बिजवडी ( ) , कुलकजाई (सीताबाई मंदिर), किरकसल (श्री नाथ मंदिर), कुकुडवाड (महादेव मंदिर), मंकलेश्वर (धुलोबा) मंदिर धुळदेव, नागोबा मंदिर विरकरवाडी इत्यादी. आसपास वारुळगड, महिमानगड व वर्धनगड हे काही किल्ले आहेत.

हवामान[संपादन]

माण तालुक्याचे तापमान साधारणपणे १५ अंश सेल्सियस ते ४० अंश सेल्सियस दरम्यान तुलनेने उच्च श्रेणी आहे. शेजारच्या शहरांच्या तुलनेत माणमधील उन्हाळा तुलनेने गरम आणि कोरडा असतो. दर उन्हाळ्यात कमाल तापमान ४० डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असते आणि सामान्यत: ते ३८ ते ४५ डिग्री सेल्सिअस दरम्यान असते. इतर हंगामात कमी तापमान २५ अंश सेल्सियस ते २८ अंश सेल्सियसपर्यंत असते. तालुक्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत अत्यल्प पाऊस पडतो आणि सरकार तालुका दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करते. तालुक्यात काही वेळा पावसाळ्यात पाऊस पडत नाही. माण तालुक्यात हिवाळ्याचा अनुभव नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान असतो. पुणे आणि नाशिकसारख्या महाराष्ट्रातील इतर शहरांच्या तुलनेत हिवाळ्यातील तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. निचतम तापमान १४ ते १६ अंश सेल्सियस पर्यंत असते तर उच्चतम तापमान २९ ते ३२ अंश सेल्सियसपर्यंत असते. या हंगामात आर्द्रता कमी आहे आणि हवामान अधिक आनंददायी असते. माण अवर्षण प्रवण क्षेत्रात येतो आणि माणच्या दक्षिण आणि दक्षिण-पश्चिम दिशेने जात असताना कोरडवाहू क्षेत्र सुरू होते. माण तालुका हद्दीत माणगंगा नदीवर आंधळी धरणातून पाण्यासाठी व सिंचनासाठी पाणीपुरवठा केला जातो.

संस्कृती[संपादन]

माण तालुक्यात गोंदवले येथील श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज शिखर शिंगणापूर येथील श्री महादेव मंदिर आहे. नरवणे येथील सर्वेश्वर मंदिर, जांभुळनी येथील जोगेश्वरी मंदिर, श्री महालक्ष्मी मंदिर (मोही), तुळजा भवानी मंदिर (मार्डी) सिद्धनाथ व जोगेश्वरी मंदिर (म्हसवड), श्री नाथसाहेब मंदिर (किरकसाल), श्री. जानूबाई मंदिर (विरळी), श्री नाथ महस्कोबा मंदिर (शेनवडी), विरळीतील गणेश मंदिर इत्यादी देवस्थाने प्रसिद्द आहेत. गुढीपाडवा, हनुमानजयंती, अक्षत्रुतीया, नागपंचमी, गणेश चतुर्थी, गणेश जयंती, विजयादशमी- दसरा, दिवाळी असे सण येथे साजरे केले जातात. शिखर शिंगणापूर विषयी माहिती: शिंगणापूरची स्थापना शिंगणराजे यादव (सन १२१० - ४७) या राजाने केली म्हणून यास शिंगणापूर हे नाव दिले आहे. इथल्या डोंगरमाथ्यावर एखाद्या शिरपेचाप्रमाणे शोभणारे शंभू महादेवाचे मंदिर हे माणदेशात वसलेले तीर्थक्षेत्र आहे असे मानले जाते. हे देवस्थान अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत मानले जाते[१]. शंभू महादेव हे छत्रपती शिवाजी महाराजांचेदेखील कुलदैवत होते.

बाजारपेठा (आठवडे बाजार)[संपादन]

 1. दहिवडी व शिंगणापूर - (सोमवार),
 2. म्हसवड - (बुधवार)सर्वात मोठा बाजार तालुक्यातील आहे तसेच शेळ्या मेंढ्या मोठा बाजार सुद्धा असतो आणि इथे मार्केट कमिटी माण तालुका चे ऑफिस आहे.
 3. गोंदवले बु. / नरवणे - (गुरुवार),
 4. बिदाल - (गुरुवार),
 5. मार्डी / बिजवडी - (शुक्रवार),
 6. पळशी / वावरहिरे - (शनिवार),
 7. मोही / मलवडी - (रविवार),
 8. इंजबाव - (रविवार),
 9. विरळी - (शनिवार),
 10. पुसेगाव - (रविवार),
 11. वरकुटे मलवडी - (शुक्रवार),
 12. गोंदवले खुर्द / मोही - (रविवारी),
 13. राणंद - (रविवार),
 14. कुकुडवाड - (शुक्रवार).

तालुक्यातील गावे[संपादन]

 1. आगसवाडी
 2. अंधाळी
 3. अनुभुळेवाडी
 4. बांगरवाडी
 5. भालावडी
 6. भंडावळी (माण)
 7. भाटकी
 8. बिडळ
 9. बिजावडी
 10. बोडके
 11. बोथे
 12. चिल्लारवाडी
 13. दहिवडी
 14. दाणावळेवाडी
 15. डंगिरेवाडी
 16. देवापूर (माण)
 17. ढाकणी
 18. धामणी (माण)#धूळदेव
 19. दिडवाघवाडी
 20. दिवाड
 21. दिवाडी
 22. डोरगेवाडी
 23. गाडेवाडी (माण)
 24. गंगोटी
 25. गरडाचीवाडी
 26. गाटेवाडी
 27. घेरेवाडी
 28. गोंदवळे बुद्रुक
 29. गोंदवळे खुर्द
 30. हवालदारवाडी
 31. हिंगणी (माण)
 32. इंजाबाव
 33. जाधववाडी (माण)
 34. जांभुळणी (माण)
 35. जाशी
 36. काळसकरवाडी
 37. काळचोंडी
 38. काळेवाडी (माण)
 39. कारखेल
 40. कासारवाडी (माण)
 41. खडकी (माण)
 42. खंड्याचीवाडी
 43. खोकडे
 44. खुटबाव
 45. किरकसाळ
 46. कोळेवाडी
 47. कुकुडवाड
 48. कुळकजाई
 49. कुरणवाडी (माण)
 50. लोधावडे
 51. महाबळेश्वर वाडी
 52. महिमानगड (माण)
 53. माळवडी
 54. मानकर्णावाडी
 55. मारडी
 56. मोगराळे
 57. मोही (माण)
 58. नरवणे
 59. पाचवड (माण)
 60. पळशी (माण)
 61. पळसावडे (माण)
 62. पाणवन
 63. पांढरवाडी
 64. पांगारी (माण)
 65. पारखंडी (माण)
 66. पर्यांती
 67. पिंपरी (माण)
 68. पिंगळी बुद्रुक
 69. पिंगळी खुर्द
 70. पुकाळेवाडी
 71. पुळकोटी
 72. राजावाडी (माण)
 73. राणंद
 74. रांजणी (माण)
 75. संभुखेड
 76. सात्रेवाडी
 77. शेणवाडी
 78. शेवरी
 79. शिंदी बुद्रुक
 80. शिंदी खुर्द
 81. शिंगणापूर (माण)
 82. शिरवळी (माण)
 83. शिरताव
 84. श्रीपानवण
 85. सोकसण
 86. स्वरूपखानवाडी
 87. ताकेवाडी
 88. थडाळे
 89. तोंडले (माण)
 90. उगल्याचीवाडी
 91. उकिरडे
 92. वडगाव (माण)
 93. वळई
 94. वरकुटे माळवाडी
 95. वारूगड (माण)
 96. विराळी
 97. विरोबानगर
 98. वाडजाळ
 99. वाकी (माण)
 100. वरकुटे म्हासवड
 101. वावरहिरे
 102. येळेगाव (माण)

संदर्भ[संपादन]

 1. www.mandeshi.com
 2. http://www.mandesh.com/marathi/man_taluka_home.php
 3. https://villageinfo.in/
 4. https://www.census2011.co.in/
 5. http://tourism.gov.in/
 6. https://www.incredibleindia.org/
 7. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
 8. https://www.mapsofindia.com/
 9. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
 10. https://www.weather-atlas.com/en/india-climate
 1. ^ "https://www.ishtadevata.com/data/uploads/2016/11/Pid-339304Shikhar-Shinganapur-Mahadev-Mandir_1.jpg साठी Google इमेज परिणाम". www.google.com. 2019-10-05 रोजी पाहिले. External link in |title= (सहाय्य)