सांगोला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?सांगोला

महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
Map

१७° २६′ २२″ N, ७५° ११′ ३८″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर पंढरपूर
जिल्हा सोलापूर
लोकसंख्या २८,११६ (२०११)
भाषा मराठी
खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर
आमदार शहाजी पाटील
संसदीय मतदारसंघ माढा
तहसील सांगोला
पंचायत समिती सांगोला
कोड
पिन कोड
दूरध्वनी

• ४१३३०७
• +२२०
सांगोला येथील प्रसिद्ध अंबिका मंदिर (२०२१)
सांगोला is located in भारत
सांगोला
सांगोला
सांगोला (भारत)

सांगोला किंवा सांगोले हे महाराष्ट्र राज्याच्या सोलापूर जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे ठिकाण आहे.[१] दक्षिणमध्य रेल्वेच्या कुर्डवाडी-मिरज लोह-मार्गावरील हे एक स्थानक आहे. पंढरपूर या तीर्थक्षेत्रापासून हे जवळ आहे. राज्य महामार्ग SH-161, SH-3, SH-71 सांगोल्यातून जातात.

पूर्वी हा सांगोले फार संपन्न होते, म्हणून 'सांगोले सोन्याचे' म्हणून हा भाग ओळखला जायचा. हे नाव सहा - इंगोले आडनावाच्या - लोकांवरून पडले अशी आख्यायिका आहे.

येथील सहकारी सूत गिरणी उत्तम धाग्यासाठी प्रसिद्घ आहे. उच्च प्रतीच्या डाळिंबांच्या उत्पन्नासाठी हे ख्यातनाम असून त्यांची परदेशांतही निर्यात होते.[२][३][४] दर रविवारी येथे जनावरांचा मोठा बाजार भरतो.[५] येथील खिलार जातीचे बैल प्रसिद्घ आहेत. येथील प्राचीन अंबिकादेवी मंदिर प्रसिद्ध आहे. दरवर्षी रथसप्तमीला फार मोठी यात्रा भरत असते.[६]

आमदार गणपतराव देशमुख हे याच महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघातून सर्वात जास्त वेळा निवडून आले होते. हा त्यांचा विश्वविक्रम होता, जो गिनीज बुकात नोंदवला गेला.[७][८][९][१०]

लोकसंख्या[संपादन]

२०११ जनगणनेनुसार सांगोल्याची लोकसंख्या ३४,३२१ आहे. यामध्ये पुरुष ५१% तर महिला ४८% आहेत. साक्षरता दर ८२% आहे. यामध्ये ८८% पुरुष आणि ७७% महिला साक्षर आहेत.[११]

तसेच लोकसंख्यमध्ये १२% हे सहा वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत.

इतिहास[संपादन]

सांगोला हे किल्ल्याच्या पायथ्याशी वसले आहे. येथील किल्ला [१२][१३]आदिलशाही काळात (१४८९–१६८६) बांधला गेला असून तत्कालीन कागदोपत्री सांगोला एक भरभराटीचे स्थान मानले जाई. त्यामुळे त्याची ख्याती 'सोन्याचे सांगोला' अशी होती. आदिलशाहीच्या पतनानंतर (१६८६) मोगलांच्या आधिपत्याखाली किल्ला आला व औरंगजेबाच्या मृत्यूनंतर (१७०७) छ. शाहूंनी (१७०७–४९) यांच्या अखत्यारीत हे शहर आले. छ. शाहूंनी मरतेसमयी दोन सनदांद्वारे राज्याचा कारभार पेशवे बाळाजी बाजीराव यांकडे सोपविला. त्यानंतर १७५० मध्ये महाराणी ताराबाईंच्या यमाजी शिवदेव नावाच्या सेवकाने सांगोल्याचा किल्ला हस्तगत करून बाळाजींच्या विरूद्घ बंड केले. ते सदाशिवराव भाऊने नेस्तानाबूत करून त्यावर पुन्हा पेशव्यांची सत्ता प्रस्थापित केली. दुसऱ्या बाजीरावाच्या कारकिर्दीत (१७९५–१८१८) होळकरांच्या पठाण पलटणीने १८०२ मध्ये सांगोला शहरावर हल्ला करून ते उद्ध्वस्त केले. त्यात शहराचे अतोनात नुकसान झाले. पेशवाईच्या अस्तानंतर ते इंग्रजी अंमलाखाली भारतीय स्वातंत्र्यापर्यंत होते.

शिक्षणव्यवस्था[संपादन]

अनेक शाळा, महाविद्यालये सांगोल्यात कार्यरत आहेत, ज्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण देतात. पुढील उच्च शिक्षण आणि अभियांत्रिकी, औषधी, शिक्षण इत्यादी अभ्यासक्रमांसाठीही स्वतंत्र संस्था आहेत.

माध्यमिक

शहरात सांगोला विद्यामंदिर प्रशाला आणि न्यू इंग्लिश स्कूल ह्या माध्यमिक शिक्षण देणाऱ्या दोन प्रमुख शाळा आहेत.

उच्च शिक्षण

सांगोला महाविद्यालय आणि विज्ञान महाविद्यालय ही उच्चशिक्षण देणारी दोन प्रमुख पदवी महाविद्यालये आहेत

अभियांत्रिकी

शिवाजी पॉलीटेक्नीकल आणि फॅबटेक कॉलेज ही महाविद्यालये पदविका आणि पदवीचे शिक्षण देतात.

अर्थव्यवस्था[संपादन]

प्रमुख व्यवसाय शेती आहे. डाळिंबाच्या उत्पादनात हा भाग अग्रेसर आहे. येथील डाळींबाची निर्यात अमेरिका, इंग्लंड आणि मध्यपूर्वेच्या देशांत केली जाते. [२][४]

येथील सूतगिरणी प्रसिद्ध आहे. या गिरणीला आशियातील पहिल्या क्रमांकाची सूतगिरणी म्हणून पूर्वी नावाजलं गेलं होतं.[१४] खिलारी जातीच्या बैलांसाठीही हा भाग प्रसिद्ध आहे. राज्यातील सर्वात मोठा बैलांचा बाजार येथे दर रविवारी भरतो.

वाहतूक[संपादन]

महामार्ग

सांगोला हे इतर शहरांशी महत्त्वाच्या मार्गांजोनी जोडले गेले आहे. रत्‍नागिरी-नागपूर महामार्ग, म्हणजेच MSH-3, हा सांगोल्यातून जातो. हा रस्ता कोल्हापूर, सांगली, सोलापूर, तुळजापूर, औसा, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर या शहरांना जोडतो.

तसेच MSH 71 आणि MSH 161 हे दोन राज्य महामार्गही आहेत. पहिला अकलूज आणि जतला जोडतो, तर दुसरा पंढरपूर-मिरज जोडतो. तसेच नव्याने तयार झालेला सांगोला-पंढरपूर, MSH 161 हासुद्धा महत्त्वाचा चौपदरी महामार्ग आहे.

रेल्वे

सांगोला रेल्वे स्थानक हे दक्षिणमध्य रेल्वेच्या कुर्डवाडी-मिरज लोह-मार्गावरील हे महत्त्वाचे स्थानक आहे. सुरुवातीला हा रेल्वेमार्ग narrow-gaugeचा होता. २००९ आणि २०११ च्या कालावधीत हा मार्ग broad-gauge मध्ये रूपांतरित केला गेला.[१५]

सांगोला तालुक्यातील प्रसिद्ध व्यक्ती[संपादन]

जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण[संपादन]

महूद बु[संपादन]

 • महूद बु - महूद बु., ढाळेवाडी, खिलारवाडी
 • चिकमहुद - चिकमहुद, महीम, कटफळ, इटकी

एकतपूर[संपादन]

 • एकतपूर - एकतपूर, बागलवाडी, शिवणे, हलदहिवडी, चिंचोली, गायगव्हाण
 • वाकी शिवणे - वाकी शिवणे, लक्ष्मीनगर, अचकदाणी, लोटेवाडी, खवासपूर

वाढेगाव[संपादन]

 • वाढेगाव
 • धायटी

कडलास[संपादन]

 • कडलास
 • जवळा

अकोला[संपादन]

 • अकोला
 • वाटंबरे

चोपडी[संपादन]

 • चोपडी
 • नाझरे

कोळा[संपादन]

 • कोळा
 • जुनोनी

घेरडी[संपादन]

 • घेरडी - घेरडी, हंगिरके, नराळे
 • सोनंद - सोनंद, गळवेवाडी, डोंगरगाव, आगलावेवाडी, भोपसेवाडी, पारे, डिकसळ

तालुक्यातील गावे[संपादन]

 1. अचकडणी
 2. आगलावेवाडी
 3. आजनाळे
 4. अकोला (सांगोला)
 5. आळेगाव
 6. अंकढाळ
 7. बागलवाडी
 8. बालवाडी (सांगोला)
 9. बामणी
 10. बंडगरवाडी
 11. भोपसेवाडी
 12. बुद्धेहाळ
 13. बुरळेवाडी
 14. बुरंगेवाडी
 15. चिकमाहुड
 16. चिनके
 17. चिंचोळी (सांगोला)
 18. चोपडी (सांगोला)
 19. देवळे (सांगोला)
 20. देवकातेवाडी
 21. ढालेवाडी
 22. धायटी (सांगोला)
 23. डिकसळ (सांगोला)
 24. डोंगरगाव (सांगोला)
 25. एकहातपूर
 26. गाळवेवाडी
 27. गावडेवाडी (सांगोला)
 28. गायगव्हाण
 29. घेराडी
 30. गोडसेवाडी (सांगोला)
 31. गौडवाडी (सांगोला)
 32. गुणप्पावाडी
 33. हबिसेवाडी
 34. हळदहिवडी
 35. हंगीरगे
 36. हणमंतगाव
 37. हातीड
 38. हाटकरमांगेवाडी
 39. इटकी (सांगोला)
 40. जाधववाडी (सांगोला)
 41. जावळा (सांगोला)
 42. जुजारपूर
 43. जुनी लोटेवाडी
 44. जुनोणी (सांगोला)
 45. कडळस
 46. काळुबाळूवाडी
 47. कमळापूर
 48. कराडवाडी (सांगोला)
 49. करंदेवाडी
 50. कटफळ
 51. केदारवाडी (सांगोला)
 52. खवसपूर
 53. खिलारवाडी
 54. किडाबिसारी
 55. कोळा
 56. कोंबडवाडी (सांगोला)
 57. लक्ष्मीनगर (सांगोला)
 58. लिगडेवाडी
 59. लोणविरे
 60. लोटेवाडी
 61. माहिम (सांगोला)
 62. माहुड बुद्रुक
 63. माणेगाव (सांगोला)
 64. मांजरी (सांगोला)
 65. मेडाशिंगी
 66. मेटकरवाडी (सांगोला)
 67. मेथवडे
 68. मिसाळवाडी
 69. नलवडेवाडी
 70. नराळे
 71. नारळेवाडी
 72. नाझरे (सांगोला)
 73. निजामपूर (सांगोला)
 74. पाचेगाव बुद्रुक
 75. पारे
 76. राजापूर (सांगोला)
 77. राजुरी
 78. सांगेवाडी
 79. सारंगरवाडी
 80. सातारकरवस्ती
 81. सावे (सांगोला)
 82. शिरबावी
 83. शिवणे (सांगोला)
 84. सोनलवाडी
 85. सोनंद
 86. सोनेवाडी
 87. तरंगेवाडी
 88. टिप्पेहाळी
 89. उडानवाडी
 90. वासुड
 91. वाझरे
 92. वाडेगाव (सांगोला)
 93. वाकीघेरडी
 94. वाकीशिवणे
 95. वणीचिंचोळ
 96. वाटांबरे
 97. येळमार मांगेवाडी
 98. झापाचीवाडी

हे सुद्धा पाहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

 1. ^ "सांगोला तहसील कार्यालय | जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र शासन, भारत | India". 2021-12-29 रोजी पाहिले.
 2. ^ a b "महाराष्ट्रात एक गाव आहे 'डाळिंबाचं कॅलिफोर्निया' | महाराष्ट्र News in Marathi". zeenews.india.com. 2021-12-30 रोजी पाहिले.
 3. ^ "सांगोल्यातील डाळिंब का आहे समस्यांच्या विळख्यात | Sakal". www.esakal.com. 2021-12-30 रोजी पाहिले.
 4. ^ a b "Our soil Our people are Sangola - Arun Bottre | आमची माती आमची माणसं सांगोला - अरुण बोत्रे | Lokmat.com". LOKMAT. 2015-04-11. 2021-12-30 रोजी पाहिले.
 5. ^ "Start the famous Sangola Animal Week Market in Western Maharashtra | पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध सांगोल्याचा जनावरांचा आठवडा बाजार सुरू करा | Lokmat.com". LOKMAT. 2020-12-05. 2021-12-30 रोजी पाहिले.
 6. ^ "कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सांगोल्यातील अंबिकादेवी यात्रेसह जनावरांचा बाजारही रद्द ! | Sakal". www.esakal.com. 2021-12-31 रोजी पाहिले.
 7. ^ "Ganpatrao Deshmukh: Longest-serving MLA in Maharashtra scores a record 11th win".
 8. ^ Jul 31, IANS /; 2021; Ist, 15:40. "Maharashtra: 11-time MLA Ganpatrao Deshmukh cremated with full state honours | Mumbai News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-12-30 रोजी पाहिले.CS1 maint: numeric names: authors list (link)
 9. ^ PTI (2021-07-31). "Maharashtra's 11-term MLA and former minister Ganpatrao Deshmukh dead" (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X.
 10. ^ "अकरावेळा आमदार, एसटीनेच प्रवास... जाणून घ्या ग्रेट गणपतरावांचा जीवनप्रवास". Maharashtra Times. 2021-12-30 रोजी पाहिले.
 11. ^ "Sangole Municipal Council City Population Census 2011-2021 | Maharashtra". www.census2011.co.in. 2021-12-30 रोजी पाहिले.
 12. ^ Maharashtra, Discover (2021-02-23). "%%title%% %%sep%% %%sitename%% | Sangola Fort". Discover Maharashtra (इंग्रजी भाषेत). 2021-12-30 रोजी पाहिले.
 13. ^ "vikaspedia Domains". mr.vikaspedia.in. 2021-12-30 रोजी पाहिले.
 14. ^ "स्मरण : सहकारातील महामेरू गणपतराव देशमुख | Sakal". www.esakal.com. 2021-12-30 रोजी पाहिले.
 15. ^ "Sangola Railway Station Forum/Discussion - Railway Enquiry". indiarailinfo.com. 2022-01-30 रोजी पाहिले.
 16. ^ epaper.lokmat.com http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_PULK_20220906_12_6. 2022-09-07 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
 1. https://villageinfo.in/
 2. https://www.census2011.co.in/
 3. http://tourism.gov.in/
 4. https://www.incredibleindia.org/
 5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
 6. https://www.mapsofindia.com/
 7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
 8. https://www.weather-atlas.com/en/india-climate