Jump to content

यादव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

यदु राजाचे वंशज ते यदुवंशी.

  • यादव / राजे जाधवराव या मराठा क्षत्रिय घराण्याचा वंशविस्तार.

प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास ३ टप्प्यात करावी लागेल.

  1. श्रीमन्नारायण ते भगवान श्रीकृष्णापर्यंत
  2. श्रीकृष्णापासून ते देवगिरीचे यादव
  3. देवगिरीचे यादव ते सिंदखेडकर राजे जाधवराव यांचे पर्यंत..
  • पहिल्या २ टप्प्यातील वंशविस्तार हा हेमाद्रीकृत वृतखंडातील राजप्रशस्तीत दिलेले आहेत. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील वंशविस्तार हा किनगाव(राजा) येथील राजे जाधवरावांजवळील ई.स. १७२० च्या सुरत-मजलीसच्या न्यायनिवाड्यावेळची शिक्यांसह उपलब्ध वंशावळीत आणि गो.दा.दळवीकृत "जाधव घराण्याची कैफियत" या पुस्तकात दिलेला आहे.

!! वंशावळी !! श्रीमन्नारायण - ब्रह्मा-अञि - समुद्र -सोम/चंद्र - ब्रुहष्पती-बुध - पुरुरवा - आयु-नहुष{सोमवंश येथुन सुरू झाला} - ययाति -यदु{याच्या वंशजाना यदुवंशी/यादव म्हणतात}-क्रुस्थ/क्रोष्ट{याच्या वंशजांचे haihaya kingdom} - व्रुजिॅंस्व -स्वाप/स्वाहित-उर्भॅंग/न्रुशंकु-चिञरथ -प्रुथुश्रवा - सुयद्न्य-उशना-स्थितेयु/तितेकी-मुरित - विक्रम-कबंलबर्हि - वरिश्व-रुक्माव - रुक्मेव-प्रुथुक्म - हविष्मन-पराजित - जामुग-सव्यपी-जामाघ - विदर्भ{vidarbh kingdom}-रुक्मीन- क्रंथ -कुंति - व्रुष्णि -केशुक - निव्रुत्ति - लोमपाद /व्योमाच्छ - ध्रुति-जीमुत - ऋषभ-भीमरथ - नवरथ-दशरथ/दिध्रुत -शकुंत - करंभि - कर-देवरात - देवक्षेञ - माधि/मधु-कुरुबल - दुर्वसु-पुरुहोम - गुणी-पादुप-आयु-यंतु-सात्वत{सात्वत किॅंगडम}-भिमा-अंधक{अंधक किॅंगडम}-टांक- भुजमान-विदुरथ-शुरा -सेनी-स्वयंभोज-ह्यदिक-ईढुष-देवमीढ{याचे वंशज मार्तिकावर्तीचे भोज} -शुरा-वसुदेव-भगवान श्रीक्रुष्ण{भगवतगितेचे कर्ता}-प्रद्युम्न-अनिरुद्ध{काठेवाडात गिरनार/जुनागड येते राज्य स्थापले}-यक्ष-वज्र{याने सुरतपर्यंत राज्य पसरवले}-प्रतिबाहु{गुजरात व खानदेशपर्येंत राज्य वाढवले}-सुबाहु{याने आपले राज्य4 पुत्रात वाटणी केली}-द्रुढप्रहार{सर्वप्रथम दक्षिणेत राज्य स्थापिले व राजधानी चंद्रादित्यपुर/चांदोर (जि.नाशिक) बनवली.

काळ इस 860 ते 880}-सेऊनचंद्र 1ला{याने राजधानी सिॅंदिनेर/श्रीनगर-हल्लीचे सिन्नर येथे हालवली. याच्याच नावाने या भागास सेऊनदेश म्हणले गेले. (काळ इस 880 ते 900}-धाडियप्पा प्रथम-भिल्लम प्रथम-श्रीराज/राजगी-वडिॅंग/वद्दिॅंग प्रथम{इस 950ते 970}-धाडियप्पा द्वितिय-भिल्लम द्वितिय{ इस 975 ते 1005}-वेसुगि प्रथम-अर्जुन-भिल्लम त्रुतिय{इस 1020ते1045}-वडिॅंग 2रे-वेसुगी द्वितिय-भिल्लम 4था- सेऊनचंद्र द्वितिय{इस 1050 ते 1080}-सिॅंघणदेव प्रथम{इस 1105 ते 1120}-मलुगी-भिल्लम पाचवा{याने देवगिरी येथे सार्वभौम राज्याची स्थापना केली. (इस 1185 ते 1193)

जैत्रपाळ प्रथम-सिॅंघणदेव द्वितिय{इस 1200 ते 1246याने शिखर सिॅंघणापुरचे महादेवाचे मंदिर बांधले. जैत्रपाळ 2रा-क्रुष्णदेव-महादेव-रामदेवराय (खिलजी कडुन पराभव) -शंकरदेव-गोविॅंददेव {याच्यापासून जाधव हे आडनाव सुरू झाले}

ठाकुरजी-भुकणदेव/भुतजी-अचलकर्ण/अचलोजी-विठ्ठलदेव-राजेलखुजीराव. (इस 1550 ते 1629) घराण्यास उर्जितावस्था मिळवुन दिली. राजे लखुजीराव यांना 4 पुत्र व एक कन्या.

  1. राजेदत्ताजीराव- यांचे वंशज जवळखेडा , ऊमरद{देशमुख}, करवंड व भुईंज येथील जाधवराव आहेत.
  2. राजे अचलोजी- यांचे वंशज मेहुणाराजा, आडगावराजा, माळेगाव बुद्रुक, उब्रंज व मांडवे येथील जाधवराव आहेत.
  3. राजेबहादुरजी- यांचे वंशज देऊळगावराजा, सिॅंदखेडराजा व महेगाव देशमुख येथील जाधवराव आहेत.
  4. राजेराघोजी यांचा पुत्र राजेबहादुरजी यानी दत्तक घेतला होता तीच पुढे देऊळगावराजा शाखा होय.
  5. राजमाता जिजाऊ आऊसाहेब या भावंडात सर्वात कनिष्ठ होत्या. यांचा विवाह शहाजी राजे भोसले यांच्यासोबत झाला.

राजेलखुजीराव यांचे कनिष्ठ बंधु राजेभुतजी उर्फ जगदेवराव होत त्यांची वंशज शाखा किनगाव राजा , पाटेवडी व दिल्ली येथे आहेत. तसेच, देऊळगावराजा, किनगावराजा, जवळखेडा, ऊमरद देशमुख, मेहुणाराजा, आडगावराजा व सिंदखेडराजा येथील जाधवरावांचे विवाह देऊळगावराजा येथील श्री. बालाजी मंदिराच्या गाभाऱ्यात लावण्याचा मान इस 1693 पासून आजपर्यंत चालु आहे. तसेच जरासंधाच्या पराक्रमामुळे यादव-जाधव क्षञियाना आपली राजधानी मथुरा येथुन द्वारका येथे स्थलांतरीत करावी लागली आणि पुढे यादव क्षञीयांची द्वारकासह आणखी 11 राज्य निर्माण झाली ती पुढिलप्रमाणे= द्वारका, चेदी, शूरसेनी, दशरन, करुशा, कुंती, अवंती, माळवा, गुर्जरा, हैयय, सौराष्ट्र आणि विदर्भ.

¶तसेच यादव-जाधव मराठा क्षञियांची 12 कुळे आहेत असे वर्णन आढळते आणी ती 12 कुळे म्हणजे शिर्केॅंचे 6 कुळे,तोॅंवर-तौर यांचे 5 कुळे व यादव-जाधव यांचे 1 कूळ होत.

तसेच महाराष्ट्रातील जी देवगिरी यादव-जाधव मराठा व्यतिरिक्त जी यादव-जाधव यांची जी मराठा कुळे आहेत ती यादव क्षत्रियांच्या 11 राज्यातुन आले असले पाहिजेत कारण या 12 राज्यातील यादवांना/ क्षञिय यांना महारथ-महारठ्ठ-MAHARATHA असेच संबोधले जात असे.

संदर्भ= 1] हेमाद्रीक्रुत व्रतखॅंडातील राजप्रशस्ती 2] सिॅंदखेडकर राजे जाधवरावांची मोडी बखर 3] किनगावराजा येथिल राजे जाधवरावांजवळील सुरतमजलीसवेळची वंशावळी 4] गो दा दळवी क्रुत जाधव घराण्याची कैफियत 5] देवगिरीचे यादव - ब्रह्मानंद देशपांडे 6] जाधवरावांकडील उपलब्ध वंशावळी