Jump to content

औसा तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हा लेख औसा तालुका विषयी आहे. औसा शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या
औसा तालुका

राज्य महाराष्ट्र, भारत ध्वज भारत
जिल्हा लातूर जिल्हा
मुख्यालय औसा

क्षेत्रफळ १२२४.४१ कि.मी.²
लोकसंख्या ३,०९,५७१ (२०११)
लोकसंख्या घनता २५३/किमी²
साक्षरता दर ६५.९१%
लिंग गुणोत्तर १०००/९२६ /

प्रमुख शहरे/खेडी १).औसा २).भादा ३).लामजना ४).मातोळा ५).किल्लारी
विधानसभा मतदारसंघ औसा

लातूर जिल्हा आणि तालुका
औसा किल्ला मुख्य प्रवेशद्वार
खरोसा लेणी

औसा तालुका (Ausa Taluka) हा एक महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील एक तालुका आहे. तालुक्याचे प्रशासकीय केंद्र औसा शहर आहे.

भूगोल[संपादन]

औसा तालुक्याचे क्षेत्रफळ १२२४.४१ चौरस किलोमीटर (४७२.७५ चौरस मैल) आहे. लातूर जिल्ह्यातील लातूर, निलंगा आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद, उमरगा आणि लोहारा ही औसा तालुक्याला लागुन असलेली तालुके आहेत.[१] लातूर आणि औसा तालुक्याच्या सीमा तावरजा नदीने अधोरेखीत होतात. तर लोहारा आणि औसा तालुक्याच्या सीमा देखील तेरणा नदीने अधोरेखीत होतात.[१]

१९९३ चा भूकंप[संपादन]

३० सप्टेंबर १९९३ ला पहाटे ३:५६ वाजता किल्लारी परिसरात ६.२ रिश्टर एवढ्या तिव्रतेचा भूकंप झाला. भूकंपाने मुख्य प्रभावित क्षेत्र लातूर जिल्ह्यातील औसा तालुका आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुका हे होते. या इंट्राप्लेट भूकंपात बावन्न गावे उद्ध्वस्त झाली. अंदाजे १०,००० लोक मरण पावले, तर आणखी ३०,००० जखमी झाले. किल्लारी हा भूकंपाचा केंद्रबिंदु होता.[२][३]

लोकसंख्या[संपादन]

२०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार, सध्याच्या औसा तालुक्याची लोकसंख्या ३,०९,५७१ आहे, ज्यात १,६०,७७१ पुरुष तर १,४८,८०० महिला आहेत. लोकसंख्येचे लिंग गुणोत्तर दर १००० पुरुषांमागे ९२६ स्त्रिया असे आहे. तालुक्याचा एकूण साक्षरता दर ६५.९१% आहे. लोकसंख्येची घनता २५३ प्रति चौरस किमी एवढी आहे.[१]

जनगणना वर्ष एकूण लोकसंख्या
२०११ ३,०९,५७१
२००१ २,७५,२४७

तालुक्यात १).भादा २).औसा ३).लामजना ४).मातोळा ५).किल्लारी हा पाच महसूल मंडळे आहेत. २०११ च्या भारताच्या जनगणनेत तालुक्यात १३० गावांची नोंद आहे, त्यापैकी १२६ वस्ती असलेली गावे आहेत, तर १०७ ग्राम पंचायती होत्या. फक्त औशाला नगर परिषद आहे.[१]

तालुक्यातील गावे[संपादन]

औसा तालुक्यातील गावांची यादी[४][५][६]

१). अंधोरा ५१). तळणी लमान टांडा १०१). लोहटा
२). आनंदवाडी ५२). तांबरवाडी १०२). वडजी
३). आपचुंदा ५३). तावशी ताड १०३). वरवडा
४). आलमला ५४). तुंगी (खुर्द) १०४). वांगजी
५). आशिव ५५). तुंगी (बुद्रूक) १०५). वांगजेवाडी
६). उंबडगा (खुर्द) ५६). तोंडोळी १०६). वाघोली
७). उंबडगा (बुद्रूक) ५७). दापेगाव १०७). वानवडा
८). उजनी ५८). दावतपुर १०८). शिंदाळवाडी
९). उटी (बुद्रूक) ५९). देवंग्रा १०९). शिंदाळा जहागिर
१०). उत्का ६०). धानोरा ११०). शिंदाळा लोहारा
११). एकंबी ६१). नांदुर्गा १११). शिवणी (बुद्रूक)
१२). एकंबी लमान तांडा ६२). नागरसोगा ११२). शिवणी (लख)
१३). एकंबी वाडी ६३). नाहोली ११३). शिवली
१४). एरंडी ६४). पारधेवाडी ११४). संक्राळ
१५). कन्हेरी ६५). पिरमगजवाडी ११५). सत्तरधरवाडी
१६). करजगांव ६६). फत्तेपुर ११६). सत्तरधरवाडी लमान तांडा
१७). कवठा केज ६७). बऱ्हाणपूर ११७). समदर्गा
१८). कवठा लातूर ६८). बानेगांव ११८). सारणी
१९). कवळी ६९). बिरवली ११९). सारोळा
२०). कार्ला ७०). बुधोडा १२०). सिरसल
२१). काळमाथा ७१). बेलकुंड १२१). सेलु
२२). किनीथोट ७२). बोरगांव (नकुलेश्वर) १२२). हाटकरवाडी
२३). किनीनवरे ७३). बोरफळ १२३). हळदुर्ग
२४). किल्लारी ७४). भंगेवाडी १२४). हारेगांव
२५). किल्लारी वाडी ७५). भादा १२५). हासलगण
२६). कुमठा ७६). भुसणी १२६). हासाळा
२७). कोरंगळा ७७). भेटा १२७). हासेगांव
२८). खरोसा ७८). मंगरुळ १२८). हासेगांव वाडी
२९). खानापुर ७९). मसलगा (बुद्रूक) १२९). हिप्परगा
३०). खुंटेगाव ८०). मसलगा खुर्द १३०). हिप्परसोगा
३१). खुर्दवाडी ८१). महादेववाडीz १३१). होळी
३२). गांजण खेडा ८२). मातोळा
३३). गाढवेवाडी ८३). माळकोंडजी
३४). गुबाळ ८४). माळूंब्रा
३५). गुळखेडा ८५). मासुर्डी
३६). गोंद्री ८६). मुगळेवाडी
३७). गोटेवाडी ८७). मोगरगा
३८). चलबुर्गा ८८). याकतपुर
३९). चिंचोली काजळे ८९). येल्लोरी
४०). चिंचोली जोगन ९०). येल्लोरीवाडी
४१). चिंचोली सोन ९१). येळवट
४२). जमालपूर ९२). येळी
४३). जयनगर ९३). राजेवाडी
४४). जवळगा पोमादेवी ९४). रामवाडी
४५). जाउवाडी ९५). रामेगांव
४६). जायफळ ९६). रिंगणी
४७). जावळी ९७). लखनगांव
४८). टाका ९८). लामजना
४९). तपसे चिंचोली ९९). लिंबाळा दाऊ
५०). तळणी १००). लोदगा

पर्यटन[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b c d "DISTRICT CENSUS HANDBOOK LATUR" (PDF).
  2. ^ टीम, इनमराठी. "निसर्गाचा दुर्दैवी प्रकोप – लातूर भूकंपाबद्दल तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी!". www.inmarathi.com (इंग्रजी भाषेत). 2022-05-21 रोजी पाहिले.
  3. ^ "किल्लारी भूकंप मराठी बातम्या | Killari Earthquake, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com". https://www.lokmat.com/. 2022-05-21 रोजी पाहिले. External link in |website= (सहाय्य)
  4. ^ "जिल्हाधिकारी लातूर यांचे कार्यालय - (महसूल शाखा) - S3waas" (PDF).
  5. ^ "Village Map Taluka: Ausa District: Latur" (PDF).
  6. ^ "गावांची यादी | लातूर जिल्हा | India". 2022-05-19 रोजी पाहिले.