मे २८
Appearance
(म २े८ या पानावरून पुनर्निर्देशित)
<< | मे २०२५ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
२९ | ३० | ३१ |
मे २८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १४८ वा किंवा लीप वर्षात १४९ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]सोळावे शतक
[संपादन]- १५०३ - पोप अलेक्झांडर सहाव्याच्या फतव्यानुसार स्कॉटलॅंडचा राजा जेम्स चौथा व मार्गारेट ट्युडोरचे लग्न झाले.
- १५८८ - एकशे तीस युद्धनौकांवर ३०,००० सैनिकांसह स्पॅनिश आर्माडा इंग्लंडवर चाल करायला निघाला.
अठरावे शतक
[संपादन]- १७७४ - अमेरिकन क्रांती - पहिल्या कॉन्टिनेन्टल काँग्रेसला सुरुवात.
एकोणविसावे शतक
[संपादन]- १८३० - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष अँड्र्यू जॅक्सनने इंडियन रिमुव्हल ऍक्टवर सही करून स्थानिक अमेरिकन जमातींना स्थलांतर करण्यास भाग पाडले.
- १८९२ - जॉन मुइरने सान फ्रांसिस्कोमध्ये सियेरा क्लबची स्थापना केली.
विसावे शतक
[संपादन]- १९०५ - रशिया-जपान युद्ध-त्सुशिमाची लढाई - जपानी दर्यासारंग टोगो हेहाचिरोने रशियाचे आरमार बुडवले व लढाई संपवली.
- १९१८ - अझरबैजानने स्वतःला स्वतंत्र घोषित केले.
- १९३६ - ऍलन ट्युरिंगने ऑन कम्युटेबल नंबर्स हा शोधनिबंध प्रकाशित केला.
- १९३७ - फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्टने वॉशिंग्टन डी.सी.मध्ये बटन दाबून सान फ्रांसिस्कोमधील गोल्डन गेट ब्रिज वाहतूकीला खुला केला.
- १९३७ - नेव्हिल चेंबरलेन युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानपदी.
- १९४० - दुसरे महायुद्ध - बेल्जियमने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
- १९४० - दुसरे महायुद्ध - नॉर्वे, फ्रांस, पोलंड व युनायटेड किंग्डमच्या सैन्यांनी नार्विक जिंकले.
- १९४२ - दुसरे महायुद्ध - राइनहार्ड हेड्रिचच्या खुनाचा बदला म्हणून नाझींनी चेकोस्लोव्हेकियात १,८०० व्यक्तींना यमसदनास धाडले.
- १९५२ - ग्रीसमध्ये स्त्रियांना मतदानाचा हक्क देण्यात आला.
- १९६४ - पॅलेस्टाईन मुक्ती संघटनेची स्थापना.
- १९७८ - सांगूले लामिझानाने बर्किना फासोच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली.
- १९८२ - फॉकलॅंड युद्ध - गूझ ग्रीनची लढाई.
- १९८७ - पश्चिम जर्मनीच्या मथायस रस्टने आपले छोटे विमान सोवियेत संघाची राजधानी मॉस्कोमधील लाल चौकात उतरवले.
- १९९६ - भारताचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा राजीनामा
- १९९८ - भारताने केलेल्या अणुचाचणीला उत्तर म्हणून पाकिस्तानने पाच अणुबॉम्ब उडवले.
एकविसावे शतक
[संपादन]जन्म
[संपादन]- १५२४ - सलीम दुसरा, ऑट्टोमन सम्राट.
- १६६० - जॉर्ज दुसरा, इंग्लंडचा राजा.
- १७३८ - जोसेफ-इग्नास गिलोटिन, फ्रांसचा डॉक्टर.
- १७५९ - छोटा विल्यम पिट, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १८८३ - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, भारतीय क्रांतिकारक, प्रभावी वक्ते, मराठी साहित्यिक.
- १९०३ - शंतनुराव किर्लोस्कर, मराठी उद्योगपती.
- १९२३ - एन. टी. रामाराव, लोकप्रिय तेलुगू अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री.
- १९२५ - ब्युलेंट एसेव्हिट, तुर्कस्तानचा पंतप्रधान.
मृत्यू
[संपादन]- १९६१ - प. कृ. गोडे, प्राच्यविद्या संशोधक .
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर मे २८ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)