एन.टी. रामाराव
| लिंग | पुरूष |
|---|---|
| नागरिकत्व | भारत, भारतीय अधिराज्य |
| स्थानिक भाषेतील नाव | నందమూరి తారక రామారావు |
| दिलेले नाव | Nandamuri |
| जन्म तारीख | २८ मे 1923 |
| जन्मस्थान | Nemmikuru |
| मृत्यू तारीख | १८ जानेवारी 1996 |
| मृत्यूस्थान | हैदराबाद |
| मृत्युची पद्धत | नैसर्गिक कारणे |
| मृत्युचे कारण | हृदयाघात |
| चिरविश्रांतीस्थान | NTR Gardens |
| वडील | Nandamuri Lakshmaiah |
| आई | Nandamuri Venkata ramamma |
| वैवाहिक जोडीदार | Lakshmi Parvathi, Basava Tarakam, Basava Tarakam |
| अपत्य | Nandamuri Harikrishna, दग्गुबाती पुरंदेश्वरी, Nandamuri Balakrishna, Nara Bhuvaneshwari |
| मातृभाषा | तेलुगू भाषा |
| बोलण्याची वा लेखनाची भाषा | तेलुगू भाषा, इंग्लिश भाषा, तमिळ भाषा |
| पद | आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, भारताच्या विधानसभेतील सदस्य |
| शिक्षण घेतलेली संस्था | Andhra-Christian College, आंध्र विद्यापीठ |
| चे शिष्य | विश्वनाथ सत्यनारायण |
| राजकीय पक्षाचा सभासद | तेलुगू देशम पक्ष |
| धर्म | हिंदू धर्म |
| Filmography | N T Rama Rao filmography |
| पुरस्कार | कलांमध्ये पद्मश्री, Nandi Award for Best Actor, Filmfare Award for Best Actor – Telugu |
| Related category | Category:Films directed by N. T. Rama Rao |
नंदमुरी तारक रामाराव (२८ मे १९२३:निम्माकुरू, कृष्णा जिल्हा, आंध्र प्रदेश - १८ जानेवारी १९९६:हैदराबाद, आंध्र प्रदेश) हे तेलुगु चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय कलावंत आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री होते. त्यांची गणना तेलुगु चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम अभिनेत्यांमध्ये होते.त्यांनी २०० पेक्षाही अधिक तेलुगु चित्रपटांमध्ये काम केले.
इ.स. १९८२ मध्ये त्यांनी तेलुगु देसम या प्रादेशिक पक्षाची स्थापना केली. त्यानंतर पुढच्याच वर्षी झालेल्या राज्य विधानसभा निवडणुका पक्षाने जिंकून रामारावांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले. १९८४ मधील एका महिन्याचा अपवाद वगळता ते १९८९ पर्यंत राज्याचे मुख्यमंत्री होते. १९८९ च्या विधानसभा निवडणुकीत तेलुगु देसम पक्षाचा पराभव झाला. पण १९९४ साली पक्षाने विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवला आणि रामाराव दुसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले.
त्यांची दुसरी पत्नी लक्ष्मी पार्वतीला पक्षात मिळत असलेल्या वाढत्या महत्त्वामुळे त्यांचे जावई एन्.चंद्रबाबू नायडू यांनी रामारावांविरूद्ध ऑगस्ट १९९५ मध्ये बंड केले. पक्षाच्या बहुसंख्य आमदारांचे समर्थन नायडूंनाच मिळाले आणि रामारावांना मानहानीकारक परिस्थितीत मुख्यमंत्रीपदावरून दूर व्हावे लागले.
१८ जानेवारी १९९६ रोजी त्यांचे हृदयविकाराचा झटक्याने त्यांच्या हैदराबाद येथील राहत्या घरी निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते.[१][२]
संदर्भ
[संपादन]- ↑ Rahman, Sheikh (31 January 1996). "A Legacy Under Siege". Outlook India. 29 March 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 22 October 2019 रोजी पाहिले.
When news of NTR's untimely death due to a massive heart attack in the early hours of January 18 broke ...
- ↑ "National : Lakshmi Parvati immerses NTR's ashes in Cauvery". द हिंदू. 17 May 2004. 21 June 2004 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 4 August 2013 रोजी पाहिले.