Jump to content

भारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारताचे प्रशासकीय विभाग, २८ राज्ये व ८ केंद्रशासित प्रदेश.

भारत हा अठ्ठावीस राज्ये व आठ केंद्रशासित प्रदेशांनी बनला आहे. प्रत्येक राज्यास स्वतःचे सरकार आहे. बहितांश केंद्रशासित प्रदेश हे केंद्र सरकारच्या प्रशासनाखाली आहेत.

राजधानी

[संपादन]

खालील तक्त्यामध्ये,

  • सरकारी कार्यालय आहे ती प्रशासकीय राजधानी आहे
  • विधानसभा अधिवेशन भरते ती दुसरी राजधानी / अधिवेशनीय राजधानी आहे
  • जेथे उच्च न्यायालय स्थित आहे ती न्यायालीन राजधानी आहे
  • वर्ष हे ते शहर त्या राज्य किंवा प्रदेशाची राजधानी झाल्याचे आहे
  • चौकटीत हि म्हणजे विधान सभेचे उन्हाळी व हिवाळी अधिवेशन दाखवते.

भारतातील सर्व राज्य

[संपादन]
क्र. राज्य/प्रदेश प्रशासकीय अधिवेशनीय न्यायालयीन पासून पूर्व राजधानी
आंध्र प्रदेश अमरावती हैदराबाद
(आंध्र प्रदेश विधानसभा)
हैदराबाद
(आंध्र प्रदेश उच्च न्यायालय)
१९५६ कुर्नुल[]
अरुणाचल प्रदेश इटानगर इटानगर
(अरुणाचल प्रदेश विधानसभा)
गुवाहाटी
(गुवाहाटी उच्च न्यायालय)
१९७२
आसाम गुवाहाटी दिसपूर
(आसाम विधानसभा)
गुवाहाटी
(गुवाहाटी उच्च न्यायालय)
१९७२ शिलाँग[] (१८७४-१९७२)
बिहार पाटणा पाटणा
(बिहार विधानसभा)
पाटणा
(पाटणा उच्च न्यायालय)
१९३६
छत्तीसगढ रायपूर रायपूर
(छत्तीसगढ विधानसभा)
बिलासपूर
(छत्तीसगढ उच्च न्यायालय)
२०००
गोवा पणजी[] पोरवोरिम
(गोवा विधानसभा)
मुंबई
(मुंबई उच्च न्यायालय)
१९६१
गुजरात गांधीनगर गांधीनगर
(गुजरात विधानसभा)
अहमदाबाद
(गुजरात उच्च न्यायालय)
१९७० अहमदाबाद (१९६०-१९७०)
हरियाणा चंदिगढ चंदिगढ
(हरियाणा विधानसभा)
चंदिगढ
(पंजाब व हरियाणा उच्च न्यायालय)
१९६६
हिमाचल प्रदेश शिमला शिमला
(हिमाचल प्रदेश विधानसभा)
शिमला
(हिमाचल प्रदेश उच्च न्यायालय)
१९४८
१० तेलंगणा हैदराबाद हैदराबाद
(तेलंगणा विधानसभा)
हैदराबाद
(तेलंगणा उच्च न्यायालय)
२०१४
११ झारखंड रांची रांची
(झारखंड विधानसभा)
रांची
(झारखंड उच्च न्यायालय)
२०००
१२ कर्नाटक बंगळूर बंगळूर
(कर्नाटक विधानसभा)
बंगळूर
(कर्नाटक उच्च न्यायालय)
१९५६ मैसूर
१३ केरळ तिरुवनंतपुरम तिरुवनंतपुरम
(केरळ विधानसभा)
कोची
(केरळ उच्च न्यायालय)
१९५६ कोची[] (१९४९-१९५६)
१४ मध्य प्रदेश भोपाळ भोपाळ
(मध्य प्रदेश विधानसभा)
जबलपूर
(मध्य प्रदेश उच्च न्यायालय)
१९५६ नागपूर[] (१८६१-१९५६)
१५ महाराष्ट्र मुंबई[] मुंबई
(महाराष्ट्र विधानसभा)
मुंबई
(मुंबई उच्च न्यायालय)
१९६०
१६ मणिपूर इंफाळ इंफाळ
(मणिपूर विधानसभा)
गुवाहाटी
(गुवाहाटी उच्च न्यायालय)
१९४७
१७ मेघालय शिलाँग शिलाँग
(मेघालय विधानसभा)
गुवाहाटी
(गुवाहाटी उच्च न्यायालय)
१९७०
१८ मिझोरम ऐझॉल ऐझॉल
(मिझोरम विधानसभा)
गुवाहाटी
(गुवाहाटी उच्च न्यायालय)
१९७२
१९ नागालँड कोहिमा कोहिमा
(नागालँड विधानसभा)
गुवाहाटी
(गुवाहाटी उच्च न्यायालय)
१९६३
२० ओडिशा भुवनेश्वर भुवनेश्वर
(ओडिशा विधानसभा)
कटक
(ओडिशा उच्च न्यायालय)
१९४८ कटक (१९३६-१९४८)
२१ पंजाब चंदिगढ चंदिगढ
(पंजाब विधानसभा)
चंदिगढ
(पंजाब व हरियाणा उच्च न्यायालय)
१९६६ लाहोर[] (१९३६-१९४७)
शिमला (१९४७-१९६६)
२२ राजस्थान जयपूर जयपूर
(राजस्थान विधानसभा)
जोधपूर
(राजस्थान उच्च न्यायालय)
१९४८
२३ सिक्कीम गंगटोक[] गंगटोक
(सिक्किम विधानसभा)
गंगटोक
(सिक्कीम उच्च न्यायालय)
१९७५
२४ तमिळनाडू चेन्नई चेन्नई
(तमिळनाडू विधानसभा)
चेन्नई
(मद्रास उच्च न्यायालय)
१९५६
२५ त्रिपुरा आगरताळा आगरताळा
(त्रिपुरा विधानसभा)
आगरताळा
(त्रिपुरा उच्च न्यायालय )
१९५६
२६ उत्तर प्रदेश लखनौ लखनौ
(उत्तर प्रदेश विधानसभा)
अलाहाबाद
(अलाहाबाद उच्च न्यायालय)
१९३७
२७ उत्तराखंड देहरादून[] देहरादून
(उत्तराखंड विधानसभा)
नैनिताल
(उत्तराखंड उच्च न्यायालाय)
२०००
२८ पश्चिम बंगाल कोलकाता कोलकाता
(पश्चिम बंगाल विधानसभा)
कोलकाता
(कोलकाता उच्च न्यायालय)
१९०५

केंद्रशासित प्रदेश

[संपादन]
क्र. राज्य/प्रदेश प्रशासकीय अधिवेशनीय न्यायालीन पासून पूर्व राजधानी
अंदमान आणि निकोबार पोर्ट ब्लेर कोलकाता
(कोलकाता उच्च न्यायालय)
१९५६
चंदिगढ चंदिगढ[१०] चंदिगढ
(पंजाब व हरियाणा उच्च न्यायालय)
१९६६
दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव दमण मुंबई
(मुंबई उच्च न्यायालय)
२०२०
, ४ जम्मू आणि काश्मीर श्रीनगर (उ)
जम्मू (हि)
श्रीनगर (उ)
जम्मू (हि)
(जम्मू आणि काश्मीर विधानसभा)
श्रीनगर (उ)
जम्मू (हि)
(जम्मू आणि काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालय)
२०१९
लक्षद्वीप कवरत्ती कोची
(केरळ उच्च न्यायालय)
१९५६
दिल्ली नवी दिल्ली नवी दिल्ली
(दिल्ली विधानसभा)
नवी दिल्ली
(दिल्ली उच्च न्यायालय)
१९५६
पुडुचेरी पुडुचेरी पुडुचेरी
(पुडुचेरी विधानसभा)
चेन्नई
(मद्रास उच्च न्यायालय)
१९५४
लडाख लेह (उ)
कारगिल (हि)
श्रीनगर (उ)
जम्मू (हि)
(जम्मू आणि काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालय)
२०१९

टिप्पणी

[संपादन]
  1. ^ आंध्र प्रदेश हे राज्य आंध्र राष्ट्रम व इतर तेलुगू बोलणारे प्रदेश मिळून बनले आहे. आंध्र राष्ट्रमची राजधानी कुर्नुल होती.
  2. ^ आसामपासून मेघालय वेगळा झाल्यानंतर १९७१ साली शिलॉॅंग हे शहर दोन्ही राज्यांची राजधानी होती.
  3. ^ इ.स. १८४३ सालापासून पणजी हे गोव्याची राजधानी आहे ज्यावेळी ते पोर्तुगालकडे होता.
  4. ^ कोची हे त्रावणकोर-कोचीनची राजधानी होती, जी १९५६ साली नवीन स्थापित केरळ राज्याचा भाग झाली.
  5. ^ १८६१ पासून १९५० पर्यंत नागपूर ही सेंट्रल प्रॉव्हिन्सेस व बेरारची राजधानी होती. १९५० साली ही मध्य प्रदेश राज्याची राजधानी झाली, १९५६ साली बेरारविदर्भ हे बॉम्बे राज्याचे भाग झाले. नागपूर आता राजधानी शहर न राहल्याने १९६० साली ती महाराष्ट्राची दुसरी राजधानी झाली.
  6. ^ इ.स. १९५० साला पर्यंत मुंबई हे बॉम्बे प्रांताची राजधानी होती. नंतर मुंबई बॉम्बे राज्याची राजधानी झाली. हे बॉम्बे राज्य नंतर इ.स. १९६० सालात गुजरात व महाराष्ट्रात विभाजित झाले.
  7. ^ १९३६ सालापासून १९४७ पर्यंत लाहोर ही पंजाबची राजधानी होती. आता हे शहर पाकिस्तान मध्ये आहे.
  8. ^ इ.स. १८९० सालापासून गंगटोक ही सिक्कीमची राजधानी आहे. इ.स. १९७५ सालामध्ये सिक्कीम भारतात सामील झाले.
  9. ^ देहरादून ही उत्तराखंडची वर्तमान राजधानी आहे. गैरसैण प्रस्तावित राजधानी आहे.
  10. ^ चंदिगढ ही पंजाब व हरियाणा राज्यांची राजधानी आहे व एक केंद्रशासीत प्रदेश आहे.

संदर्भ

[संपादन]
  • तॉमस. मल्याळम मनोरमा वर्षपुस्तक २००३ पाने:६४९-७१४. Unknown parameter |आयडी= ignored (सहाय्य)
  • "भारतीय उच्चन्यायलय जागा व हुजूरमामला". ईस्टर्न बुक कंपनी. Unknown parameter |अ‍ॅक्सेसमहिनादिनांक= ignored (सहाय्य); Unknown parameter |अ‍ॅक्सेसवर्ष= ignored (सहाय्य)
  • "आसाम विधान परिषदेचा एक संक्षिप्त ऐतिहासिक आढावा". आसाम विधान परिषद. Unknown parameter |अ‍ॅक्सेसमहिनादिनांक= ignored (सहाय्य); Unknown parameter |अ‍ॅक्सेसवर्ष= ignored (सहाय्य)