हिमाचल प्रदेश विधानसभा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
२०१७ विधानसभा निवडणुकीनंतर मतदारसंघ निहाय स्थिती

हिमाचल प्रदेश विधानसभा हे भारताच्या हिमाचल प्रदेश राज्याच्या विधिमंडळाचे एकमेव सभागृह एक आहे. ६८ आमदारसंख्या असलेल्या हिमाचल प्रदेश विधानसभेचे कामकाज सिमला शहरामधून चालते. भारतीय जनता पार्टीचे विपिन सिंह परमार हे विधानसभेचे सभापती असून मुख्यमंत्री जयराम ठाकूर विधानसभेचे नेते तर काँग्रेस पक्षाचे मुकेश अग्निहोत्री विरोधी पक्षनेते आहेत.

भारताच्या इतर विधिमंडळांप्रमाणे हिमाचल प्रदेश विधानसभेचा कालावधी ५ वर्षांचा असतो व आमदारांची निवड निवडणुकीद्वारे होते. सरकार स्थापनेसाठी राजकीय पक्षाला अथवा राजकीय आघाडीकडे ३१ जागांचे बहुमत असणे अनिवार्य आहे. विद्यमान १३वी विधानसभा २०१७ सालच्या निवडणुकीनंतर अस्तित्वात आली. ह्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा सदस्य असलेल्या भारतीय जनता पार्टीने ४३ जागांवर विजय मिळवून सरकार स्थापन केले.

सद्य विधानसभेची रचना[संपादन]

सरकार

  •   भारतीय जनता पार्टी (४३)

विरोधी पक्ष

इतर

बाह्य दुवे[संपादन]

साचा:हिमाचल प्रदेश