कोलकाता उच्च न्यायालय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कलकत्ता उच्च न्यायालय

कलकत्ता उच्च न्यायालय (Calcutta High Court; बंगाली: কলকাতা উচ্চ আদালত) हे भारत देशामधील सर्वात जुने उच्च न्यायालय आहे. पश्चिम बंगालच्या कोलकाता शहरामध्ये स्थित असलेले हे न्यायालय १ जुलै १८६२ रोजी स्थापन केले गेले. पश्चिम बंगाल राज्य व अंदमान आणि निकोबार केंद्रशासित प्रदेश हे कलकत्ता उच्च न्यायालयाच्या अखत्यारीमध्ये आहेत.

कलकत्ता शहराचे नाव २००१ साली बदलून कोलकाता असे ठेवण्यात आले असले तरीही ह्या उच्च न्यायालयाचे नाव कलकत्ता उच्च न्यायालय हेच आहे. डॉ. मंजुला चेल्लुर ह्या कलकत्ता उच्च न्यायालयाच्या विद्यमान सरन्यायाधीश आहेत.

हेही पाहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]