आंध्र प्रदेश विधानसभा
lower house of the Andhra Pradesh state legislature of India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | राष्ट्रीय लोकशाही आघाडी | ||
---|---|---|---|
ह्याचा भाग | Andhra Pradesh Legislature | ||
स्थान | भारत | ||
कार्यक्षेत्र भाग | आंध्र प्रदेश | ||
भाग | |||
| |||
आंध्र प्रदेश विधानसभा हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्याच्या विधिमंडळाच्या दोन सभागृहांपैकी एक आहे (दुसरे: आंध्र प्रदेश विधान परिषद). १७५ आमदारसंख्या असलेल्या आंध्र प्रदेश विधानसभेचे कामकाज हैदराबादमधून चालते. तेलुगू देसम पक्षाचे के. शिवप्रसाद राव विधानसभेचे सभापती असून मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू हे विधानसभेचे नेते आहेत.
१९५६ साली आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती झाल्यानंतर आंध्र प्रदेश विधानसभेमध्ये २९४ सदस्य होते. २०१४ साली तेलंगणा राज्य वेगळे करण्यात आले व ११९ जागा तेलंगणा विधानसभेमध्ये सामील केल्या गेल्या ज्यामुळे आंध्र प्रदेश विधानसभा संखया १७५ वर घसरली. भारताच्या इतर विधिमंडळांप्रमाणे आंध्र प्रदेश विधानसभेचा कालावधी ५ वर्षांचा असतो व आमदारांची निवड निवडणुकीद्वारे होते. सरकार स्थापनेसाठी राजकीय पक्षाला अथवा राजकीय आघाडीकडे ८८ जागांचे बहुमत असणे अनिवार्य आहे. विद्यमान आंध्र प्रदेश विधानसभा २०१४ सालच्या निवडणुकीनंतर अस्तित्वात आली.
सद्य विधानसभेची रचना - २०१९ निवडणूक
[संपादन]सत्ताधारी पक्ष (१५१)
- वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष (१५१)
विरोधी पक्ष (२३)
- तेलुगू देसम पक्ष (२३)
तटस्थ (१)
- जनसेना पक्ष (१)
बाह्य दुवे
[संपादन]- अधिकृत संकेतस्थळ Archived 2016-11-19 at the Wayback Machine.