झारखंड विधानसभा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

झारखंड विधानसभा हे भारताच्या झारखंड राज्याच्या विधिमंडळाचे एकमेव सभागृह एक आहे. ८१ आमदारसंख्या असलेल्या झारखंड विधानसभेचे कामकाज रांचीमधून चालते. भारतीय जनता पक्षचे दिनेश ओराव हे विधानसभेचे सभापती असून मुख्यमंत्री रघुवर दास हे विधानसभेचे नेते आहेत.

भारताच्या इतर विधिमंडळांप्रमाणे झारखंड विधानसभेचा कालावधी ५ वर्षांचा असतो व आमदारांची निवड निवडणुकीद्वारे होते. सरकार स्थापनेसाठी राजकीय पक्षाला अथवा राजकीय आघाडीकडे ४१ जागांचे बहुमत असणे अनिवार्य आहे. विद्यमान विधानसभा २०१४ सालच्या निवडणुकीनंतर अस्तित्वात आली.

विद्यमान विधानसभा[संपादन]

पक्ष चिन्ह जागा +/-
भारतीय जनता पक्ष 43 19
झारखंड मुक्ति मोर्चा Indian Election Symbol Bow And Arrow.svg 19 1
झारखंड विकास मोर्चा (प्रजातांत्रिक) Comb 2 3
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 6 7
ऑल झारखंड स्टुडंट्स युनियन Banana 5 1
बहुजन समाज पक्ष
Elephant Bahujan Samaj Party.svg
1 1
भारतीय कम्युनिस्ट पक्ष (एम.एल.) लिबरेशन
South Asian Communist Banner.svg
1 0
झारखंड पक्ष 1 0
मार्क्सवादी समन्वय समिती 1 0
जय भारत समता पक्ष 1 0
नवजीवन संघर्ष मोर्चा 1 1
स्रोत: [१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Jharkhand State Assembly Elections 2014". Archived from the original on 2015-05-08. 2017-01-24 रोजी पाहिले.

हेही पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]