Jump to content

उत्तर प्रदेश विधानसभा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
उत्तर प्रदेश विधानसभा
विधानसभा
ह्याचा भागउत्तर प्रदेश संपादन
देशभारत संपादन
भौगोलिक गुणक२६°५०′३७″N ८०°५६′३९″E संपादन
कार्यक्षेत्र भागउत्तर प्रदेश संपादन
अधिकृत संकेतस्थळhttps://uplegisassembly.gov.in/index_en.html संपादन
Map
उत्तर प्रदेश सरकारची मुद्रा
लखनौमधील विधान भवन

उत्तर प्रदेश विधानसभा हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्याच्या विधिमंडळाच्या दोन सभागृहांपैकी एक आहे (दुसरे: उत्तर प्रदेश विधान परिषद). ४०४ आमदारसंख्या असलेली उत्तर प्रदेश विधानसभा भारतातील सर्वात मोठे विधिमंडळ सभागृह आहे. ह्या विधानसभेचे कामकाज लखनौमधून चालते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे विधानसभेचे नेते आहेत.

भारताच्या इतर विधिमंडळांप्रमाणे उत्तर प्रदेश विधानसभेचा कालावधी ५ वर्षांचा असतो व आमदारांची निवड निवडणुकीद्वारे होते. सरकार स्थापनेसाठी राजकीय पक्षाकडे अथवा राजकीय आघाडीकडे २०३ जागांचे बहुमत असणे अनिवार्य आहे. विद्यमान १७वी विधानसभा २०१७ सालच्या निवडणुकीनंतर अस्तित्वात आली.

सद्य विधानसभेची रचना

[संपादन]
सद्य विधानसभा

सरकार (324)

विरोधी पक्ष (78)

बाह्य दुवे

[संपादन]