मध्य प्रदेश विधानसभा
unicameral state legislature of Madhya Pradesh in India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | विधानसभा | ||
---|---|---|---|
ह्याचा भाग | Government of Madhya Pradesh | ||
स्थान | भारत | ||
कार्यक्षेत्र भाग | मध्य प्रदेश | ||
भाग |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
मध्य प्रदेश विधानसभा हे भारताच्या मध्य प्रदेश राज्याच्या विधिमंडळाचे एकमेव सभागृह एक आहे. २३० आमदारसंख्या असलेल्या मध्य प्रदेश विधानसभेचे कामकाज भोपाळ शहरामधून चालते. भारतीय जनता पक्षाचे गिरीश गौतम हे विधानसभेचे सभापती असून मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान विधानसभेचे नेते आहेत.
भारताच्या इतर विधिमंडळांप्रमाणे मध्य प्रदेश विधानसभेचा कालावधी ५ वर्षांचा असतो व आमदारांची निवड निवडणुकीद्वारे होते. सरकार स्थापनेसाठी राजकीय पक्षाला अथवा राजकीय आघाडीकडे ११६ जागांचे बहुमत असणे अनिवार्य आहे. विद्यमान ८वी विधानसभा २०१८ सालच्या निवडणुकीनंतर अस्तित्वात आली. मागील निवडणुकीमध्ये प्रस्थापित केलेले आपले वर्चस्व भाजपने कायम राखले. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने काँग्रेस इतरांच्या मदतीने सत्तेत आली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर काही काँग्रेस सदस्यांनी राजीनामा दिल्याने भाजप पुन्हा सत्तेत आले. या साठी ज्योतिरादित्य शिंदे यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पडली.
सद्य विधानसभेची रचना
[संपादन] भारतीय जनता पक्ष (१२६)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (९६)
बहुजन समाज पक्ष (२)
समाजवादी पक्ष (१)
अपक्ष (४)