लडाख
| कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| ?ལ་དྭགས་ लडाख. भारत | |
| — केंद्रशासित प्रदेश — | |
|
| |
| गुणक: 34°08′N 77°33′E / 34.14°N 77.55°E | |
| प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
| क्षेत्रफळ | ४५,११० चौ. किमी[β] |
| मोठे शहर | लेह |
| लोकसंख्या • घनता |
२,७०,१२६ (2001) • ६/किमी२[१] |
| भाषा | लडाखी, तिबेटी, शीणा, बलती, पुरिकी, उर्दू |
| स्थापित | ५ ऑगस्ट २०१९ |
| बाल मृत्यु गुणोत्तर | १९%[२] (1981) |
| संकेतस्थळ: leh.nic.in | |
| |
गुणक: 34°08′N 77°33′E / 34.14°N 77.55°E[[वर्ग:]] लडाख हा जगातला लोकवस्ती असलेला दुसऱ्या क्रमांकाचा थंड प्रदेश आहे. लडाखला लद्दाख, हिमभूमीचा प्रदेश, जगाचे छपर, MARYUL अशा इतर काही नावानी ओळखले जाते. येथे हिवाळ्यात -४००सेंटिग्रेड तापमान असते. भारतीय संसदेने मंजूर केलेल्या ठरावानुसार ३१ अॉक्टोबर २०१९ पासून लडाख हा केंद्रशासित प्रदेश असणार आहे. त्याअाधी तो जम्मू-काश्मीर राज्याचा एक विभाग होता. लडाखचे मुख्यालय लेह या गावी आहे. लेहचा विमानतळ हा जगातील समुद्रसपाटीपासून सर्वात उंच ठिकाणी असलेला विमानतळ आहे. या विमानतळाचे नाव कुशोक बकुला रिंपोचे असे आहे. इथे विमान उतरवण्यासाठी फार कौशल्य लागते.
कुशोक बकुला रिंपोचे हे लडाखमधले १९वे रिंपोचे आहेत आणि लडाख भारतीय संघराज्यात सामील होण्याचे श्रेय त्यांनाच जाते. भारताचे मंगोलियातले राजदूत म्हणून त्यांनी फार महत्त्वाची कामगिरी बजावली होती.. लडाखमध्ये खर्दुग ला, तंग्लंग ला, चांग ला अशा अत्युच्च खिंडी आहेत.खर्दुग ला हा जगातला सर्वात अधिक उंचीवरचा वाहतूक मार्ग आहे
दुसरे म्हणजे येथे बांधण्यात आलेला 'बेली बिज' हा जगातील सर्वात अधिक उंचीवर, म्हणजे समुद्रसपाटीपासून ५,६०२ मीटर (१८,३७९ फूट) इतक्या उंचीवर बांधण्यात आलेला आहे, पूल आहे. हा याची लांबी ३० मीटर आहे. हा पूल भारतीय लष्कराने १९८२ साली उभारला. हा द्रास आणि सुरू नदी दरम्यान बांधण्यात आलेला पूल आहे.
लडाख मध्ये सध्या दोन जिल्हे आहेत.लेह व कारगिल. लेह हे लडाख चे मुख्यालय आहे.लेह हा भारतातील सर्वात मोठा क्शेत्रफळ असणारा जिल्हा आहे.[१]
लडाखसंबंधी माहिती देणारी पुस्तके[संपादन]
- क्रौंचाचा देश लडाख (सागर जाधव)
- न सांगण्याजोगी गोष्ट : लडाखचा रणयज्ञ, १९६२च्या पराभवाची शोकांतिका (शशिकांत पित्रे)
- नाते लडाखशी (अरुंधती दीक्षित)
- बर्फाच्छादित दुर्गम प्रदेशाची सफर लेहा-लडाख (सुधीर फडके)
- लडाख : एक turning point (ऋता सबनीस)
- लडाख... प्रवास अजून सुरू आहे (आत्माराम परब आणि नरेंद्र प्रभू)
- सियाचिन : धगधगते हिमकुंड (नितीन अनंत गोखले)
- सियाचेन - नाते लडाखशी
- सफर हिमाचल लडाखची (वासंती घैसास)
लडाखवरील माहितीपट[संपादन]
- ‘रायडिंग सोलो टू द टॉप ऑफ द वर्ल्ड’ (निर्माते - गौरव जानी आणि पी.टी. गिरिधर राव) : या माहितीपटाला भारत सरकारच्या राष्ट्रीय पुरस्कारासह, विविध चित्रपट महोत्सवांमध्ये ११ पुरस्कार मिळाले.
- ‘मोटरसायकल चँग पा’ (निर्माता - गौरव जानी) : संपूर्ण ऋतुचक्राचा अनुभव घेण्यासाठी आणि सोबत भटक्यांची जीवनशैली पाहण्यासाठी मुंबई ते ल़डाख दरम्यान एक वर्ष केलेल्या प्रवासावर आधारित चित्रपट.
चित्रदालन[संपादन]
संदर्भ[संपादन]
- ^ लोकमत,नागपूर-ई-पेपर- दिनांक २९/०१/२०१७, पान क्रमांक ८ , रंगबिरंगी क्रॉसवर्ल्ड- जगातील सर्वात उंच पूल. लोकमत मीडिया प्रायव्हेट लि. नागपूर. दिनांक २९/०१/२०१७ रोजी पाहिले.