शिलाँग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?शिलॉँग
मेघालय • भारत
—  राजधानी  —

२५° ३४′ २७.८४″ N, ९१° ५२′ ४४.०४″ E

गुणक: 25°34′00″N 91°52′60″E / 25.5667°N 91.8833°E / 25.5667; 91.8833
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• १,५२५ मी
जिल्हा पूर्व खासी हिल्स
लोकसंख्या २,६०,००० (२००१)
कोड
पिन कोड
दूरध्वनी
UN/LOCODE

त्रुटि: "793 001 - 793 100" अयोग्य अंक आहे
• +३६४
• INSHL
संकेतस्थळ: शिलॉँग महानगरपालिका संकेतस्थळ

गुणक: 25°34′00″N 91°52′60″E / 25.5667°N 91.8833°E / 25.5667; 91.8833

शिलॉँग भारताच्या मेघालय राज्यातील एक शहर आहे.

हे शहर मेघालयची राजधानी व पूर्व खासी हिल्स जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. ब्रिटीशांनी भारतामध्ये अनेक हिल् स्टेशनस् वसवली. त्यामधीलच एक म्हणजे मेघालयातील शिलाँग हे होय. भारतातील हवाई दलाचे पूर्वेकडील मुख्यालय येथे आहे. १९७२ पर्यंत संयुक्त आसामची राजधानी शिलाँग येथे होती. १८ व्या शतकामध्ये येथे आलेल्या ख्रिश्चन मिशन-यांनी या भागात ख्रिश्चन धर्माचा प्रसार केला. मुलांच्या शिक्षणासाठी शाळा सुरू केल्या. या भागाला निसर्गाचा संपन्न वारसा लाभलेला आहे. ब्रिटीशांना हे शहर पूर्वेकडील स्कॉटलँड सारखे निसर्गसंपन्न आणि सुंदर वाटले. ब्रिटीश वसाहतवादाचा वारसा असलेली घरांची रचना आणि हॉटेल व कॅफे मधील वाजवले जाणारे संगीत ही या शहराची वेगळी वैशिष्टये आहेत. पर्यटनाच्या दृष्टिने संपन्न असा हा प्रदेश आहे. मेघालयची राजधानी आणि सर्वात मोठे शहर म्हणजे शिलाँग हे डोंगर उतारावर वसलेले आहे. शिलाँग मधील शिलाँग व्यू पॉइंट वरून आपण सर्व शिलाँग शहर पाहू शकतो. आकाशात पसरलेले प्रचंड धुके आणि त्या धुक्यात हरवलेले शिलाँग हे शहर वेगळीच अनुभूती देऊन जाते.[१]

  1. ^ फडतरे, नवनाथ (२६ जुलै २०१९). "मेघालय - ईशान्य भारतातील स्वर्ग". लोकप्रभा - पर्यटन विशेष: २४.