गुवाहाटी उच्च न्यायालय
गुवाहाटी उच्च न्यायालय हे भारत देशाच्या २४ उच्च न्यायालयांपैकी एक आहे. १ मार्च १९४८ रोजी स्थापन करण्यात आलेल्या ह्या उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत ईशान्य भारताची आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालॅंड व मिझोराम ही राज्ये येतात. गुवाहाटी उच्च न्यायालयाचे कामकाज गुवाहाटी येथून चालते व इटानगर, कोहिमा व ऐजवाल येथे त्याच्या तीन उपकचेऱ्या आहेत.
१९४८ मध्ये स्थापन झाल्यानंतर सर्व ईशान्य भारतीय राज्यांसाठी हे एकमेव उच्च न्यायालय होते. परंतु मार्च २०१३ मध्ये मेघालय, मणिपूर व त्रिपुरा ह्या राज्यांना प्रत्येकी स्वतंत्र उच्च न्यायलये मिळाली व गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत ४ राज्ये राहिली. मार्च २०१६ पासून अजित सिंह हे गुवाहाटी उच्च न्यायालयाचे सर्वोच्च न्यायाधीश आहेत.