तमिळनाडू विधानसभा
Appearance
भारताच्या तामिळनाडू राज्याचे एकसदनी विधानमंडळ | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
प्रकार | विधानसभा | ||
---|---|---|---|
ह्याचा भाग | तमिळनाडू शासन | ||
स्थान | भारत | ||
कार्यक्षेत्र भाग | तमिळनाडू | ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
![]() | |||
| |||
![]() |


तमिळनाडू विधानसभा (तमिळ: தமிழ்நாடு சட்டமன்றம்) हे भारताच्या तमिळनाडू राज्याच्या विधिमंडळाचे एकमेव सभागृह एक आहे. २३५ आमदारसंख्या असलेल्या तमिळनाडू विधानसभेचे कामकाज चेन्नईमधील फोर्ट सेंट जॉर्ज ह्या ऐतिहासिक इमारतीमधून चालते. अण्णा द्रमुक पक्षाचे पी. धनपाल विधानसभेचे सभापती असून मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम हे विधानसभेचे नेते आहेत.
भारताच्या इतर विधिमंडळांप्रमाणे तमिळनाडू विधानसभेचा कालावधी ५ वर्षांचा असतो व आमदारांची निवड निवडणुकीद्वारे होते. सरकार स्थापनेसाठी राजकीय पक्षाला अथवा राजकीय आघाडीकडे ११८ जागांचे बहुमत असणे अनिवार्य आहे. विद्यमान १४वी विधानसभा २०१६ सालच्या निवडणुकीनंतर अस्तित्वात आली. डिसेंबर २०१६ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता ह्यांचा मृत्यू झाल्यामुळे पन्नीरसेल्वम मुख्यमंत्रीपदावर आले.
सद्य विधानसभेची रचना
[संपादन]पक्ष | जागा |
---|---|
अण्णा द्रमुक | १३६ ज्यापैकी १ जागा रिकामी (जयललिता ह्यांच्या निधनामुळे) |
द्रमुक | ८९ |
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | ८ |
इंडियन युनियन मुस्लिम लीग | १ |