लेओपोल्ड फॉन रांक
लेओपोल्ड फॉन रांक | |
---|---|
![]() | |
जन्म नाव | लेओपोल्ड फॉन रांक |
जन्म |
डिसेंबर २१, इ.स. १७९५ थ्युरिंगेन, जर्मनी |
मृत्यू |
मे २३, इ.स. १८८६ बर्लिन, जर्मनी |
राष्ट्रीयत्व | जर्मनी |
कार्यक्षेत्र | जर्मनी |
भाषा | जर्मन |
साहित्य प्रकार | इतिहास लेखन |
लिओपाॅल्ड व्हाॅन रांके (मराठी लेखनभेद: लेओपोल्ड फॉन रांके; जर्मन: Leopold von Ranke) (डिसेंबर २१, इ.स. १७९५; , थ्युरिंगेन, जर्मनी - मे २३, इ.स. १८८६; बेर्लिन, जर्मनी) हा जर्मन इतिहासकार होता.
जीवन[संपादन]
याचे शिक्षण हाले व बर्लिन येथे झाले. इ.स. १८१८ साली त्याने फ्रांकफुर्ट येथील एका शाळेत शिक्षकाची नोकरी स्विकारली. त्यानंतर इ.स. १८२५ साली रांक प्रशियन शासनाच्या सेवेत दाखल झाला. त्याचवेळी त्याची बर्लिन येथे इतिहासाचा प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. नेबूरचा रोमन इतिहास वाचल्यानंतर उत्सुकता व विश्वासार्ह माहिती मिळवण्यासाठी रांक याने हिरोडोटस, थुसिडाडस, झेनोफीन, डायनोसिस, लिव्ही, सिसिरो या इतिहासकारांचे साहित्य अभ्यासले.
इ.स.च्या १९व्या शतकातील शास्त्रशुद्ध इतिहास संशोधन व इतिहास लेखन याचा लेओपोल्ड फॉन रांक प्रणेता आहे. त्याने इतिहासाला बुद्धिवादी विषय बनवून व्यावसायिक प्रशिक्षण व पुराभिलेख संशोधन कार्यपद्धतीची जोड दिली. शास्त्रोक्त संशोधन करून व पुराव्यांची काटेकोर छानणी करूनच त्यावर इतिहास लेखन करण्याचा नवा पायंडा त्याने पाडला.
साहित्य[संपादन]
लेओपोल्ड फॉन रांक याच्या समग्र साहित्याचे ५४ खंड आहेत. त्यांपैकी हिस्ट्री ऑफ पोपस, हिस्ट्री ऑफ रिफर्मेशन इन जर्मनी, फ्रेंच हिस्ट्री, इंग्लिश हिस्ट्री, प्रशियन हिस्ट्री हे ग्रंथ महत्त्वाचे होत. या ग्रंथांमध्ये त्याने इ.स.च्या १५ व्या शतकापासून ते इ.स.च्या १८ व्या शतकापर्यंतची युरोपातील घटनांची माहिती दिलेली आहे. लॅटिन व ट्युटॉनिक राष्ट्रांचा इतिहास या ग्रंथात त्याने युरोपीय संस्कृती हा रोमन व जर्मन घटकांचा संयुक्त अविष्कार आहे, असे दाखवून दिले.
अन्य साहित्य[संपादन]
- हिस्ट्री ऑफ द रोमानिक अँड जर्मनीक पीपल्स फ्रॅाम १४९४-१५१४,
- सर्बियन रिवोल्युशन
- प्रिन्सेस अँड पीपल्स ऑफ साऊदर्न युरोप इन द सिक्स्टीन्थ अँड सेव्हन्टीन्थ सेंच्युरीज
- द रोमन पोप्स इन द लास्ट फोर सेंच्युरीज १८३४-१८३६
- मेमरीज ऑफ द हाऊस ऑफ ब्रँडेंन्बर्ग अँड हिस्ट्री ऑफ पर्शिया ड्युरींग द सेव्हन्टीन्थ अँड एटिन्थ सेंच्युरीज
- सिवील वार्स अँड मोनार्की इन फ्रान्स
- द जर्मन पावर्स अँड द प्रिन्सेस लीग
- ओरिजीन अँड बिगीनिंग ऑफ द रिवोल्युशनरी वार्स
- वर्ल्ड हिस्ट्री: द रोमन रिपब्लिक अँड इट्स वर्ल्ड रूल
बाह्य दुवे[संपादन]
- "लेओपोल्ड फॉन रांक" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2003-12-06. 2011-09-28 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- "लेओपोल्ड फॉन रांक याचा ग्रंथ हिस्ट्री ऑफ इंग्लंड' - खंड १" (PDF) (इंग्लिश भाषेत). Archived from the original (PDF) on 2011-09-21. 2011-09-27 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- "लेओपोल्ड फॉन रांक याचा ग्रंथ हिस्ट्री ऑफ इंग्लंड' - खंड २" (PDF) (इंग्लिश भाषेत). Archived from the original (PDF) on 2011-07-20. 2011-09-27 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- "लेओपोल्ड फॉन रांक याचा ग्रंथ हिस्ट्री ऑफ इंग्लंड' - खंड ३" (PDF) (इंग्लिश भाषेत). Archived from the original (PDF) on 2011-07-20. 2011-09-27 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- "लेओपोल्ड फॉन रांक याचा ग्रंथ हिस्ट्री ऑफ इंग्लंड' - खंड ४" (PDF) (इंग्लिश भाषेत). Archived from the original (PDF) on 2011-07-20. 2011-09-27 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- "लेओपोल्ड फॉन रांक याचा ग्रंथ हिस्ट्री ऑफ इंग्लंड' - खंड ५" (PDF) (इंग्लिश भाषेत). Archived from the original (PDF) on 2011-07-20. 2011-09-27 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- "लेओपोल्ड फॉन रांक याचा ग्रंथ हिस्ट्री ऑफ इंग्लंड' - खंड ६" (PDF) (इंग्लिश भाषेत). Archived from the original (PDF) on 2011-09-20. 2011-09-27 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |