Jump to content

झाकिर हुसेन (तबलावादक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(झाकीर हुसेन (तबलावादक) या पानावरून पुनर्निर्देशित)
झाकीर हुसेन (तबलावादक)

झाकीर हुसेन


जन्म ९ मार्च १९५१
मुंबई
कार्यक्षेत्र तबलावादन
राष्ट्रीयत्व भारतीय
भाषा ऊर्दू
प्रमुख चित्रपट हिट ॲंड डस्ट(१९८३) वनप्रश्थम्(मल्याळम्)
पुरस्कार पद्मश्री(१९८८), पद्मभूषण(२००२), ग्रॅमी पुरस्कार (२००९)
वडील उस्ताद अल्लारखाँ
पत्नी ॲंटोनिया
अपत्ये अनिसा कुरेशी, इसाबेल कुरेशी

उस्ताद झाकीर हुसेन ( ९ मार्च १९५१) हे भारतीय तबलावादक, संगीत दिग्दर्शक आणि तालवाद्यवादक आहेत. हुसेन हे तबलावादक उस्ताद अल्लारखाँ ह्यांचे सर्वात मोठे पुत्र आहेत.[]

त्यांना १९८८ साली, भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार आणि २००२ साली, पद्म भूषण पुरस्कार राष्ट्रपती अब्दुल कलाम ह्यांच्या हस्ते मिळाला. त्यांना १९९० साली संगीत नाटक अकादमी पुरस्कारानी सन्मानित केले गेले.[]

सुरुवातीचे आयुष्य आणि शिक्षण

[संपादन]

झाकीर हुसेन ह्यांचा जन्म ९ मार्च १९५१ रोजी मुंबई येथे राहणाऱ्या पंजाबी कुटुंबात झाला. हुसेन ह्यांची आई बावी बेगम आणि वडील सुप्रसिद्ध तबलावादक उस्ताद अल्लाह रखा आहेत. त्यांच्या कुटुंबाचे अडनाव कुरेशी असले तरीही झाकीर ह्यांना हुसेन हे आडनाव देण्यात आले.[] हुसेन ह्यांनी माहीम येथील सेंट माईकल्स हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण घेतले. आणि थोड्या काळासाठी त्यांनी सेंट झेवियर कॉलेज, मुंबई येथेदेखील शिक्षण घेतले.

त्यांच्या वडिलांनी हुसेन ह्यांच्या वयाच्या तिसऱ्या वर्षापासून पखवाज शिकवायला सुरुवात केली. अल्लाह रखा हे पंजाबमधील तबलावादनाच्या परंपरेतील होते.[]

हुसेन ह्यांनी वयाच्या सातव्या वर्षी पहिली मैफिल सादर केली. ते  वयाच्या अकराव्या वर्षापासून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तबलावादन करायला सुरुवात केली. ते १९७० साली सतारवादक पं. रवीशंकर ह्यांना तबल्याची साथ करण्यासाठी अमेरिकेला गेले.[]

कारकीर्द

[संपादन]

झाकीर ह्यांनी लहान वयापासूनच हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील सुप्रसिद्ध वादकांबरोबर साथसंगत करायला सुरुवात केली. त्यांनी पंडित रवीशंकर, उस्ताद विलायत खान, उस्ताद अली अकबर खान, पंडित हरिप्रसाद चौरासिया, पंडित शिवकुमार शर्मा, पंडित व्ही. जे. जोग, पंडित भीमसेन जोशी, पंडित जसराज आणि अशा अनेक गायक आणि वादकांना हुसेन ह्यांनी तबल्याची साथ केली.[]

वैयक्तिक आयुष्य

[संपादन]

हुसेन ह्यांना दोन भाऊ आहेत: उस्ताद तौफिक कुरेशी हे तालवाद्यवादक आहेत आणि उस्ताद फझल कुरेशी हे तबला वादक आहेत.[]

पुरस्कार

[संपादन]
  • पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (पिफमधील) पुरस्कार सोहळ्यात जीवनगौरव पुरस्कार. (२०१७)
  • दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीचा 'अकादमी रत्न' पुरस्कार (जुलै २०१९)

प्रकाशित सीडी[]

[संपादन]
  • ईव्हनींग राग (१९७०)
  • शांती (१९७१)
  • रोलिंग थंडर (१९७२)
  • शक्ती (१९७५)

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Zakir | Zakir Hussain". 2021-06-03 रोजी पाहिले.
  2. ^ a b c "Zakir Hussain: His name spells magic on tabla". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2019-09-30. 2021-06-03 रोजी पाहिले.
  3. ^ "Indian tabla master Zakir Hussain says he never stops learning". web.archive.org. 2008-05-06. रोजी मूळ पानापासून संग्रहित2008-05-06. 2021-06-03 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  4. ^ "Google doodle marks Ustad Alla Rakha's 95th birthday". NDTV Gadgets 360 (इंग्रजी भाषेत). 2021-06-03 रोजी पाहिले.
  5. ^ "Zakir Husain: His name spells magic on tabla". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2019-09-30. 2021-06-03 रोजी पाहिले.
  6. ^ "ZAKIR HUSSAIN SELECTED DISCOGRAPHY | Zakir Hussain". 2021-06-03 रोजी पाहिले.