हरिप्रसाद चौरसिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हरिप्रसाद चौरसिया
Hariprasad Chaurasia in Concert.jpg


जन्म १ जुलै, इ.स. १९३८
अलाहाबाद, उत्तरप्रदेश
कार्यक्षेत्र बासरीवादन
राष्ट्रीयत्व भारतीय
भाषा हिंदी
पुरस्कार संगीत नाटक अकादमी पुरस्कार (इ.स. १९८४), पद्मभूषण (इ.स. १९९२), पद्मविभूषण (इ.स. २०००)
पत्नी अनुराधा
अपत्ये राजीव
अधिकृत संकेतस्थळ http://hariprasadchaurasia.com/

पंडित हरिप्रसाद चौरसिया (जुलै १, इ.स. १९३८; अलाहाबाद, उत्तर प्रदेश; भारत - हयात) हे भारतीय बासरीवादक, संगीतकार आहेत. हिंदुस्तानी संगीतशैलीच्या ढंगाने केलेल्या बासरीवादनासाठी ते ख्यातनाम आहेत. भारतीय केंद्रशासनाने इ.स. १९९२ साली पद्मभूषण पुरस्कार, तर इ.स. २००० साली पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवले.

जीवन[संपादन]

चौरसियांचा जन्म १ जुलै, इ.स. १९३८ रोजी उत्तर प्रदेशातील अलाहाबाद शहरात झाला. त्यांचे वडील व्यवसायाने कुस्तीपटू होते आणि हरिप्रसाद यांनीही कुस्तीतच नावलौकिक मिळवावा अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु संगीताची आवड असलेल्या हरिप्रसादांनी वडिलांच्या नकळत संगीताचा अभ्यास आरंभला. मित्राच्या घरी संगीतशिक्षणाचा सराव करणारे हरिप्रसाद काही काळ तालमीसाठी वडिलांसोबत आखाड्यात जात राहिले. बासरीवादनासाठी उपयुक्त ठरणाऱ्या आपल्या दमसासाचे श्रेय ते लहानपणी केलेल्या कुस्तीच्या तालमीला देतात [ संदर्भ हवा ].

सांगीतिक कारकीर्द[संपादन]

वयाच्या पंधराव्या वर्षापासून चौरसियांनी त्यांच्या घराजवळ राहणाऱ्या पंडित राजारामांकडून हिंदुस्तानी गायकीचे धडे घ्यायला सुरुवात केली. नंतर त्यांनी वाराणसीच्या पंडित भोलानाथ प्रसन्न यांच्याकडे बासरी शिकण्यास आरंभ केला.

पुस्तके[संपादन]

  • बासरीचा बादशहा (चरित्र; मूळ हिंदी लेखक सुरजितसिंग; मराठी अनुवाद प्रशांत तळणीकर)

पुरस्कार[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

  • "अधिकृत संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)