ग्रॅमी पुरस्कार
ग्रॅमी पुरस्कार (Grammy Award) हा अमेरिका देशामधील नॅशनल ॲकॅडमी ऑफ रेकॉर्डिंग आर्ट्स ॲन्ड सायन्स ह्या संस्थेतर्फे दिला जाणारा एक वार्षिक पुरस्कार आहे. ग्रॅमी पुरस्कार संगीतातील त्या वर्षीच्या सर्वोत्तम योगदानासाठी दिला जातो, व तो जगातील एक आघाडीचा पुरस्कार मानला जातो.
पहिला ग्रॅमी पुरस्कार वितरण सोहळा ४ मे १९५९ रोजी अमेरिकेच्या लॉस एंजेल्स व न्यू यॉर्क ह्या शहरांमध्ये साजरा झाला. तेव्हापासून दरवर्षी ग्रॅमी पुरस्कार आयोजित केले जात आहेत. २००४पासून हा सोहळा लॉस एंजेल्सच्या स्टेपल्स सेंटरमध्ये भरवला जातो.
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत