राग यमन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
यमन
थाट कल्याण
प्रकार हिंदुस्तानी
जाती संपूर्ण
स्वर सा रे ग म प ध नि
आरोह नि रे ग म ध नि सां
अवरोह सां नि ध प म ग रे सा
वादी स्वर गंधार
संवादी स्वर निषाद
पकड
गायन समय रात्रीचा पहिला प्रहर,
(संध्याकाळ)
गायन ऋतू
समप्रकृतिक राग जैमिनी कल्याण,
यमन कल्याण,
यमनी बिलावल
उदाहरण कठिण कठिण कठिण किती,
पुरुष हृदय बाई -
(नाटक-पुण्यप्रभाव)
तीव्र मध्यम
(कोमल स्वर लागत नाही)
इतर वैशिष्ट्ये श्रृंगार रस

राग यमन हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.

या रागाला कल्याण असेही संबोधले जाते. हा राग रात्रीच्या प्रथम समयी म्हणजे मावळतीच्या वेळी गायला जातो. शांत आणि भक्तिपूर्ण अशा सांजेचा भाव हा राग निर्माण करतो. पंडित विष्णू नारायण भातखंडे यांनी सांगितलेल्या दहा थाटांपैकी कल्याण या थाटातील हा राग आहे. यमन हा कल्याण थाटाचे प्रतिनिधित्व करणारा राग मानला जातो. कल्याण रागांची प्रमुख वैशिष्ट्ये या रागात दिसतात.

स्वर - सा रे ग म प ध नि

आरोह -नी रे ग म धनी सां

अवरोह - सांनी ध प म ग रे सा

म - तीव्र मध्यम.

ह्या रागात कुठलाही स्वर कोमल लागत नाही. मध्यम तीव्र लागतो. शुद्ध मध्यमाचा वैशिष्ट्यपूर्ण वापर (ग म ग रे ग रे सा/ ग म ग रे सा) झाल्यास त्याला यमन-कल्याण असे नाव दिले आहे. आरोहामध्ये षड्ज आणि पंचम हे स्वर शक्यतो लावत नाहीत (लांघन अल्पत्व). या रागाचा वादी स्वर गंधार असून संवादी निषाद मानल जातो. रागामध्ये ऋषभ, गंधार, पंचम आणि निषाद ही प्रमुख न्यास स्थाने (विश्रांती स्थाने) मानली जातात. अनेक कलाकारांच्या गायनामध्ये तीव्र मध्यमाला सुद्धा सौंदर्यपूर्ण महत्त्व दिलेले आढळते.

रागात नेहमी ऐकू येणाऱ्या स्वरावली खालीलप्रमाणे.

नि रे ग,नी रे ग म प ->(मग) रे, ग रे सा, ग मे ध नि, ग मे धनी ध प, प म (ग)रे ग रे सा इत्यादी. प -> रे ही संगती रागांग कल्याणचे एक वैशिष्ट्य आहे.

यमन हा अतिशय लोकप्रिय राग असून मैफिलींमध्ये पुष्कळ वेळा गायला/वाजवला जातो. या रागावर आधारित असंख्य चित्रपटगीते तसेच भावगीते आहेत.

यमन रागातील एक बंदिश

यमनचे उपप्रकार[संपादन]

  • जैमिनी कल्याण
  • यमन कल्याण
  • यमनी बिलावल
  • यमुना कल्याणी (कर्नाटकी संगीतातला राग)

यमन रागावर आधारलेली काही हिंदी गीते[संपादन]

(गीताचे शब्द, चित्रपटाचे नाव, संगीत दिग्दर्शक आणि गायक/गायिका या क्रमाने).

  • अभीना जाओ छोडकर (हम दोनों) जयदेव (आशा-रफ़ी)
  • आज जानेकी ज़िदना करो (गझल) फरीदा खानम (फरीदा खानम)
  • आप के अनुरोध में (अनुरोध) ? (मुकेश)
  • आसूं भरी ये जीवन की राहें (परवरिश) दत्ताराम (मुकेश)
  • इस मोड पें जाते हैं (ऑंधी)
  • ए री आयी पियाबिन (रागरंग) रोशन (लता)
  • एहसान होग तेरा मुझपर (जंगली) लक्ष्मीकांत प्यारेलाल (रफ़ी)
  • किनु संग खेलूॅं होरी (भक्तिगीत-मीराबाई) हृदयनाथ मंगेशकर (लता)
  • कैसे कहूॅं कि मुलाकात नहीं होती (गझल) गुलाम‍अली (गुलामअली/प्रभा अत्रे)
  • कोयलिया मत कर पुकार (दादरा) अख्तरीबाई (अख्तरीबाई)
  • क्यूं मुझे मौौत के पैगाम दिये जाते है (गझल) शोभा गुर्टू (शोभा गुर्टू)
  • गली गली मेरी याद बिछी है, प्यारे रस्ता देख के चल (गझल) मेहदी हसन (मेहदी हसन)
  • गले लगा के (गझल) शोभा गुर्टू (शोभा गुर्टू)
  • घर से निकलते है (पापा कहते हैं)
  • चंदनसा बदन (सरस्वतीचंद्र) कल्याणजी आनंदजी (मुकेश)
  • छुपा लो यूॅं दिल में प्यार मेरा (ममता) रोशन (हेमंतकुमार व लता)
  • जब दीप जले आना (चितचोर) रवींद्र जैन (हेमलता व येशूदास)
  • जानेवाले से मुलाकातना (अमर)
  • जा रे बदरा बैरी जा (बहाना) मदनमोहन (लता)
  • ज़िंदगीभर नहीं भूलेंगी वो बरसात की रात (बरसात की रात) रोशन (लता)
  • जिया ले गयो री मोरा सांवरिया (अनपढ) मदनमोहन (लता)
  • जीवन डोर तुम्हीं संग बॉंधी (?) लक्ष्मीकांत प्यारेलाल (?)
  • तुम आये हो तो शबे इंतजार गुज़री है (गझल) इक्बाल बानू (इक्बाल बानू)
  • तुम आये हो तो शबे इंतजार गुज़री है (गझल) मेहेंदी हसन (मेहेंदी हसन)
  • तेरे हुस्न की क्या तारीफ़ करूॅं (लीडर)
  • दिलवाले क्या देख रहे हो (गझल) गुलाम‍अली (गुलामअली)
  • दो नैना मतवाले तिहारे (माय सिस्टर) ? (सैगल)
  • निगाहें मिलाने को जी चाहता है (दिल ही तो है) रोशन (आशा)
  • पान खायो सैंया हमारे (तीसरी कसम) ?( लता)
  • बडे भोले हो (अर्धांगिनी) वसंत देसाई (लता)
  • भर भर आवत है नैन (दादरा) अख्तरीबाई (अख्तरीबाई)
  • भूली हुईं यादें (संजोग) मदनमोहन (?)
  • मन तू काहेना धीर धरत अब (संत तुलसी दासांची यमनकल्याणमधली एक गत)
  • मन रे तू काहेना धीर धरे (चित्रलेखा) रोशन (रफ़ी)
  • मिला मेरे प्रीतम जियो (गुरबानी भक्तिगीत - अमरदास) सिंग बंधू (?)
  • मैं क्या जानूॅं क्या जानूॅं रे (जिंदगी) पंकज मलिक (सैगल)
  • मौसम है आशिकाना (पाकिज़ा) गुलाम महंमद (लता)
  • म्हारो प्रणाम (भक्तिगीत) (मीराबाई) किशोरी आमोणकर (शोभा गुर्टू)
  • येरी आई पिया बिन (रागरंग) साहिर लुधियानवी (लता)
  • ये शाम कुछ अजीबसी (जुना खामोशी)
  • रंजिश ही सही (गझल) मेहेंदी हसन (मेहेंदी हसन)
  • रे मन सुर में गा (लाल पत्थर)
  • लगता नहीं हैं दिल मेरा (लाल किला)
  • लौ लगानी (भाभी की चूडियॉं) सुधीर फडके (?)
  • वो जब याद आयें (पारसमणी)
  • लगता नहीं है दिल मेरा (लाल किला) एस.एन. त्रिपाठी (रफ़ी)
  • श्री रामचंद्र कृपालुू (भक्तिगीत - तुलसीदास) हृदयनाथ मंगेशकर (लता)
  • सपना बन सजन आये (शोखियॉं) जमाल सेन (लता)
  • सलाम ए हसरत (बाबर) रोशन (सुधा मल्होत्रा)
  • सारंगा तेरी याद में (सारंगा)
  • हर एक बात पे (गालिबची गझल) ? (लता)

यमन रागावर आधारलेली काही मराठी भक्तिरचना/भावगीते/नाट्यगीते[संपादन]

(गीताचे शब्द, संगीत दिग्दर्शक आणि गायक/गायिका या क्रमाने).

  • अजुनी जाईना कळ दंडाची, चढवू कशी मी चोळी, कुणी ग बाई मारली कोपरखळी? : वसंत पवार, सुहासिनी कोल्हापुरे; कवी - जगदीश खेबुडकर; चित्रपट - काळी बायको)
  • अधिक देखणे तरी (भक्तिरचना, कवी - संत ज्ञानेश्वर, संगीत - राम फाटक, गायक - पं. भीमसेन जोशी)
  • आकाशी झेप घे रे पाखरा ’आराम हराम है’ चित्रपटातील गीत (सुधीर फडके, सुधीर फडके)
  • एकतारिसंगे (सुधीर फडके, सुधीर फडके)
  • कठिण कठिण कठिण किती - पुण्यप्रभाव नाटकातले गीत
  • कलेजवॉं लागे कटार (कट्यार काळजात घुसली या नाटकातले गीत (जितेंद्र अभिषेकी), फय्याज
  • कबिराचे विणतो शेले - देव पावला चित्रपटातले गीत (पु.ल. देशपांडे, माणिक वर्मा)
  • कशि केलिस माझी दैना - स्वरसम्राज्ञी नाटकातले गीत (संगीतकार?, कीर्ती शिलेदार)
  • का रे दुरावा - ’मुंबईच्या जावई’मधले गीत (सुधीर फडके, गायिका?)
  • चंद्र दोन उगवले, जादू काय ही तरी? एक चंद्र अंबरी एक मंचकावरी (चित्रपटगीत; चित्रपट : भाग्यलक्ष्मी, गायक : सुधीर फडके; संगीत : राम कदम ; कवयित्री शांता शेळके)
  • चांदकिरणांनो जा जा जा रे माझ्या माहेरा, फुले प्रकाशाची माझ्या दारी अंथरा (चित्रपटगीत; चित्रपट : वैभव; गायिका : आशा भोसले, संगीत : राम कदम, कवी : ग.दि. माडगूळकर)
  • जिथे सागरा धरणी मिळते - पुत्र व्हावा ऐसा या चित्रपटातील गीत (वसंत प्रभू, सुमन कल्याणपूर)
  • जिवलगा कधी रे येशील तू - चित्रगीत (सुधीर फडके, गायिका?)
  • जिवासवे जन्मे मृत्यू - गीत रामायणातले गीत ([[सुधीर फडके, सुधीर फडके)
  • जीवनातली ही घडी अशीच राहू दे कामापुरता मामा चित्रपटातील गीत : (यशवंत देव, लता मंगेशकर)
  • टकमक पाही सूर्य रजनीमुख (मानापमान नाटकातले गीत
  • तिन्हीसांजा सखे मिळाल्या (हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर)
  • तुझ्या प्रीतीचे दुःख मला - अमर भूपाळी चित्रपटातले गीत (संगीतकार?, लता मंगेशकर)
  • तेजोमय नादब्रह्म (सुधीर फडके), सुरे्श वाडकर व आरती अंकलीकर
  • तोच चंद्रमा नभात (सुधीर फडके), सुधीर फडके
  • देवाघरचे ज्ञात कुणाला - मत्स्यगंधा नाटकातले गीत (जितेंद्र अभिषेकी)
  • धुंदी कळ्यांना - धाकटी बहीण चित्रपटातील गीत (सुधीर फडके), सुधीर फडके
  • नाथ हा माझा - ’स्वयंवरमधील नाट्यगीत : (संगीतकार?, गायक -बाल गंधर्व; हिराबाई बडोदेकर; माणिक वर्मा; कुमार गंधर्व वगैरे.
  • नामाचा गजर गर्जे भीमातीर (राम फाटक), भीमसेन जोशी)
  • पराधीन आहे जगती - गीत रामायणातले गीत (सुधीर फडके), सुधीर फडके)
  • पांडुरंग कांती (कवी -संत ज्ञानेश्वर, गायिका - आशा भोसले, संगीतकार - हृदयनाथ मंगेशकर)
  • पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा (?), शोभा गुर्टू
  • प्रथम तुला वंदितो (गायक : पं. वसंतराव देशपांडे आणि अनुराधा पौडवाल, गीतकार : शांताराम नांदगावकर, संगीत : अनिल-अरुण, चित्रपट : अष्टविनायक [१९७९]
  • प्रभाती सूर नभी रंगती (रमेश अणावकर) आशा भोसले)
  • या कातरवेळी पाहिजेस तू जवळी (?) मालती पांडे)
  • राधाधर मधु मिलिंद - सौभद्र नाटकातले गीत
  • लागे हृदयी हुरहूर - एकच प्याला नाटकातले गीत
  • शुक्रतारा मंद वारा (श्रीनिवास खळे, अरुण दाते व सुधा मल्होत्रा ))
  • समाधी साधन संजीवन नाम (मधुकर गोळवलकर, सुधीर फडके)
  • सुकांत चंद्रानना पातली - संशयकल्लोळमधील नाट्यगीत
  • सुखकर्ता दुखहर्ता (हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर)
  • क्षण आला भाग्याचा - (कुलवधू नाटकातले गीत) (गायिका -ज्योत्स्ना भोळे)

यमन रागातील शास्त्रीय संगीताधारित बंदिशी आणि गझला - एकूण सुमारे ४०[संपादन]

  • आओ आओ आओ बलमा (रशीदखॉं)
  • आज जाने की ज़िदना करो (फरीदा खानम)
  • कह सखि कैसे करिये (पारंपरिक-मालिनी राजूरकर)
  • काहे सखी कैसे की करिये (विलंबित), श्याम बजाये आज मुरलिया (यमन कल्याण - भीमसेन जोशी)
  • किनु संग खेलूॅं होरी (लता)
  • कैसे कह दूॅं (प्रभा अत्रे)
  • कोयलिया मत करे पुकार (अख्तरीबाई)
  • क्यूॅं मुझे मौत के पैगाम (शोभा गुर्टू)
  • गली गली मेरी याद बिछी है, प्यारे रस्ता देख के चल (मेहदी हसन)
  • गले लगाओं के (शोभा गुर्टू)
  • जा रे बदरा बैरी जा, रे जा रे (लता मंगेशकर)
  • तुम आये हो तो शबे इंन्तज़ार गुज़री हैं (इकबाल बानू) (मेहदी हसन)
  • बन रे बलैय्या (कुमार गंधर्व)
  • मन तू गा रे हरिनाम, द्रुत- लागी लागी रे हरिसंग (प्रभा अत्रे)
  • मिला मेरे प्रीतम जियो (सिंग बंधू)
  • मैं बैरागी तुमरे दरस की प्यासी, द्रुत- सुन सुन प्रिय (श्वेता झवेरी)
  • म्हारो प्रणाम (किशोरी आमोणकर) (शोभा गुर्टू)
  • रंजिश ही सही (मेहेंदी हसन)
  • वो मन लगन लागी तुमिसंग कृपानिधान (किशोरी आमोणकर)
  • वो मुझ से हुए बदकरार अल्ला अल्ला (गुलाम अलींची गझल)
  • श्रीरामचन्द्रकृपालू (तुलसीदास), वसंतराव देशपांडे. हा दोहा इतरांनीही गायला आहे
  • सोहे लाल रंग/सोहेला लालन रंग मन में (विलंबित), द्रुत- रे पिहरवा तोहे घरवा जानेना दूंगी (कैवल्यकुमार गुरव)