मधुकर गोळवलकर
Appearance
मधुकर गोळवलकर हे मराठी संगीतकार आणि सारंगी वादक होते.
गोळवलकर उत्कृष्ट सारंगीवादक असून पु.ल.देशपांडे यांचे ते जवळचे मित्र होते. पुलं जेव्हा त्यांच्या तरुणपणी गायनाचे कार्यक्रम करीत असत तेव्ह्या त्यांची सारंगीसाथ मधुकर गोळवलकर करावयाचे.[[१]]
कारकीर्द
[संपादन]संगीतकार
[संपादन]मधुकर गोळवलकर आकाशवाणीच्या सेवेत रुजु झाले. संगीतकार म्हणून त्यांनी केलेल्या "स्वतंत्रतेचे स्तोत्र" ही रचना केली. हृदयनाथ मंगेशकर ह्यांनी संगीतबद्ध केलेल्या "सागरा प्राण तळमळला" ह्या स्वातंत्र्यवीर सावरकर रचित कवितेच्या गाण्याच्या ध्वनिमुद्रिकेच्या पाठ्च्या बाजुचे गाणे "जयोस्तुते" म्हणुन हे "स्वतंत्रतेचे स्तोत्र" पुढे खूप लोकप्रिय झाले! पुलंच्या गुळाचा गणपती ह्या चित्रपटाचे वाद्यवृंद संयोजन गोळवलकरांनीच केले होते.
गोळवलकर ह्यांनी संगीत दिलेली काही लोकप्रिय गीते -
- समाधी साधन संजीवन नाम
- अंतरंगी तो प्रभाती
- जयोऽस्तु ते जयोऽस्तु ते श्रीमहन्मंगले