जानेवारी ८
Appearance
(८ जानेवारी या पानावरून पुनर्निर्देशित)
<< | जानेवारी २०२४ | >> | |||||
सो | मं | बु | गु | शु | श | र | |
१ | |||||||
२ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | |
९ | १० | ११ | १२ | १३ | १४ | १५ | |
१६ | १७ | १८ | १९ | २० | २१ | २२ | |
२३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ | |
३० | ३१ |
जानेवारी ८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ८ वा किंवा लीप वर्षात ८ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]तेरावे शतक
[संपादन]- १२९७ - फ्रांस्वा ग्रिमाल्डीच्या सैन्याने मोनॅको काबीज केले. ग्रिमाल्डी घराणे येथपासून २१व्या शतकापर्यंत मोनॅकोचे शासक होते.
पंधरावे शतक
[संपादन]सतरावे शतक
[संपादन]अठरावे शतक
[संपादन]एकोणिसावे शतक
[संपादन]- १८३५ - अमेरिकेचे राष्ट्रीय कर्ज पहिल्यांदाच आणि एकदाच शून्य झाले.
- १८८० - सत्यशोधक समाजाच्या संस्काराने लावलेली लग्ने कायदेशीर असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय. ब्राम्हणेतर लोकही लग्नाचे पौरोहित्य करु शकतात हे न्यायालयाने मान्य केले.
- १८८९ - संख्यात्मक सामग्रीचे विश्लेषण करण्यासाठी डॉ. हर्मन होलरिथ यांना अमेरिकेत गणकयंत्राचे पेटंट मिळाले.
विसावे शतक
[संपादन]- १९०४ - पोप दहावा पायस याने चर्चमध्ये आखूड झगे घालून येण्यास बंदी घातली.
- १९०८ - बालवीर चळवळीस प्रारंभ
- १९४० - दुसरे महायुद्ध–ब्रिटनने अन्नधान्यावर नियंत्रण (रेशनिंग) आणले.
- १९४७ - जयपूर येथे राजस्थान विद्यापीठाची स्थापना.
- १९५७ - गोव्याच्या लष्करी न्यायालयात मोहन रानडे यांच्यासह तेवीस जणांना २४ वर्षांची शिक्षा झाली. भारत सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे गोवा स्वतंत्र झाल्यानंतरही अनेक वर्षे ते पोर्तुगालमधील तुरुंगात पडून होते.
- १९७१ - 'स्वतंत्र बांगलादेश जाहीर केल्याच्या गुन्ह्याखाली अटक झालेल्या शेख मुजिबूर रहमान यांची तुरुंगातून मुक्तता.
एकविसावे शतक
[संपादन]- २००४ - आर.एम.एस. क्वीन मेरी २ या जगातील सगळ्यात मोठे प्रवासी जहाजाचे इंग्लंडची राणी एलिझाबेथ दुसरी हिच्याकडून नामकरण.
- २००५ - अणुऊर्जावर चालणारी यु.एस.एस. सान फ्रांसिस्को (एस.एस.एन.०७७१) ही पाणबुडी पाण्याखाली पूर्णवेगात असताना समुद्रातील डोंगराशी धडकली. एक खलाशी ठार. पाणबुडी पृष्ठभागावर येण्यात यशस्वी.
- २००६ - ग्रीसच्या कायथिरा बेटाजवळ रिश्टर मापनपद्धतीनुसार ६.९ तीव्रतेचा भूकंप.
जन्म
[संपादन]- १८५१ - बाळकृष्ण आत्माराम उर्फ भाऊसाहेब गुप्ते, कृषी, आरोग्य आणि भारतीय देशी कारागिरीवर लिहिणारे मराठी लेखक.
- १९०१ - यशवंत श्रीधर परांजपे, युद्ध आणि लष्करविषयक ग्रंथकार
- १९०२ - जॅक इड्डॉन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९०४ - डॉ. मनोहर गोपाळ गुप्ते, समाजसेवक.
- १९०९ - ब्रुस मिचेल, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९०९ - आशापूर्णादेवी- ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणाऱ्या प्रथम लेखिका.
- १९१३ - डेनिस स्मिथ, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- १९२३ - जॉनी वॉर्डल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९२४ - गीता मुखर्जी, स्वातंत्र्य सेनानी, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, लोकसभा सदस्य
- १९२५ - राकेश मोहन, हिंदी नाटककार
- १९२६ - केलुचरण महापात्रा, ओडिसी नर्तक
- १९२९ - सईद जाफरी, हिंदी व इंग्लिश अभिनेता.
- १९३६ - ज्योतिंद्रनाथ दिक्षीत, भारताचे परराष्ट्रसचिव, मुत्सद्दी व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार
- १९३९ - नंदा, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
- १९४२ - जुनिचिरो कोइझुमी, जपानी पंतप्रधान.
- १९४२ - स्टीफन हॉकिंग, गणितज्ञ व इंग्लिश लेखक.
- १९४५ - प्रभा गणोरकर- मराठी लेखिका.
- १९४७ - डेव्हिड बोवी, अमेरिकन संगीतकार.
- १९४९ - लॉरेंस रोव, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९५१ - केनी ॲंथनी, सेंट लुशियाचा पंतप्रधान.
- १९६१ - शोएब मोहम्मद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९६५ - चंपक रमानायके, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
[संपादन]- ४८२ - संत सेव्हेर्नियस.
- ११०० - प्रतिपोप क्लेमेंट तिसरा.
- ११०७ - एडगर, स्कॉटलंडचा राजा.
- ११९८ - पोप सेलेस्टीन तिसरा.
- १३२४ - मार्को पोलो, इटालियन शोधक.
- १६४२ - गॅलेलियो गॅलिली, इटालियन गणितज्ञ , इटालियन भौतिकशास्त्रज्ञ.
- १८८४ - केशव चंद्र सेन, ब्राम्हो समाजचे नेते.
- १९३४-परशुराम गोविंद चिंचाळकर, मराठी लेखक.
- १९४१ - लॉर्ड बेडन-पॉवेल, स्काउट चळवळीचे स्थापक.
- १९६६ - बिमल रॉय, हिंदी चित्रपट दिग्दर्शक
- १९६७ - श्रीपाद कृष्ण बेलवलकर- प्राच्यविद्यापंडित.संस्कृत पंडित.
- १९७३ - स.ज. भागवत, मराठी गांधीवादी.
- १९७३ - ना.भि. परुळेकर, दैनिक सकाळचे स्थापक.
- १९७६ - चाउ एन्लाय, चीनी पंतप्रधान.
- १९८४ - सुषमा मुखोपाध्याय, पहिल्या भारतीय महिला वैमानिक.
- १९९१ - भास्कर धोंडो कर्वे, कर्वे समाज संस्थेचे संस्थापक.
- १९९२ - द.प्र. सहस्रबुद्धे, आनंद मासिकाचे संपादक.
- १९९४ - परमाचार्य श्री. चंद्रशेखर सरस्वती, ६८वे शंकराचार्य.
- १९९५ - मधू लिमये, स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, समाजवादी नेते व राजकारणी.
- १९९६ - फ्रांस्वा मित्तरॉॅं, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष.
- २००३ - राजभाऊ एस. माने, महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]संदर्भ
[संपादन]
बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर जानेवारी ८ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
जानेवारी ६ - जानेवारी ७ - जानेवारी ८ - जानेवारी ९ - जानेवारी १० - (जानेवारी महिना)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |