डेव्हिड बोवी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

डेव्हिड रॉबर्ट जोन्स तथा डेव्हिड बोवी (८ जानेवारी, इ.स. १९४७:लंडन:इंग्लंड - १० जानेवारी, इ.स. २०१६:मॅनहॅटन, न्यू यॉर्क शहर, अमेरिका) हा इंग्लिश गीतकार, संगीतकार, गायक, चित्रकार आणि अभिनेता होता. पन्नास वर्षांपेक्षा अधिक कारकीर्द असलेला बोवी रॉक संगीतातील महत्त्वाचे व्यक्तिमत्व मानले जातो.

कौटुंबिक माहिती[संपादन]

बोवीचा जन्म दक्षिण लंडनच्या ब्रिक्स्टन भागात झाला. याची आई मार्गारेट मेर पेगी बर्न्स-जोन्स ही वेट्रेस[मराठी शब्द सुचवा] होती तर वडील हेवूड स्टेन्टन जॉन जोन्स हे बार्नार्डोझ या मुलांसाठीच्या धर्मादाय संस्थेत प्रसिद्धी अधिकारी होते.

मृत्यू[संपादन]

बोवीने आपल्या ६९व्या वाढदिवशी ब्लॅकस्टार नावाचा नवीन संगीतसंच प्रकाशित केला. दोन दिवसांनी त्याचा काळजाच्या कर्करोगाने मृत्यू झाला.[१][२]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ Gallagher, Paul (11 January 2016). "David Bowie died from liver cancer he kept secret from all but handful of people, friend says". The Independent.
  2. ^ सॅंडल, पॉल; Faulconbridge, Guy (11 January 2016). "David Bowie dies after 18-month battle with cancer". Reuters. 11 January 2016 रोजी पाहिले.