मोहन रानडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

मोहन रानडे (इ.स. १९२९:सांगली, महाराष्ट्र - हयात) हे गोवा मुक्तिसंग्रामात सहभागी झालेले मराठी कार्यकर्ते आहेत.

रानड्यांचा जन्म इ.स. १९२९ साली महाराष्ट्रात सांगली येथे झाला. पोर्तुगीज वसाहतवादी राजवटीतून गोवा स्वतंत्र करण्यासाठी छेडलेल्या मुक्तिसंग्रामातील आझाद गोमंतक दलाचे ते प्रमुख नेते होते. सुरूवातीला व्यक्तिगत पातळीवर व नंतर आझाद गोमंतक दल या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी गोव्याच्या मुक्तीसाठी प्रयत्न केले. शिक्षकी पेशा स्वीकारून ते गोव्यात प्रवेशले. त्यानंतर त्यांनी पोर्तुगीजांविरुध्द सशस्त्र बंड उभारले. पुढे बेती येथील पोलिस चौकीवर केलेले हल्ल्यात ते जखमी झाले आणि इ.स. १९५५ मध्ये पोर्तुगीज पोलिसांच्या तावडीत सापडले. पोर्तुगालात त्यांना २६ वर्षांची सजा फर्मावली गेली. गोव्याच्या मुक्तीनंतर भारत सरकार त्यांची सोडवणूक करु शकेल असते, परंतु भारत सरकारने दुर्लक्ष केल्याने त्यांना अनेक वर्ष तुरुंगवास भोगावा लागला[ संदर्भ हवा ]. अखेर १४ वर्षांच्या तुरुंगवासानंतर जानेवारी, इ.स. १९६९मध्ये त्यांची सुटका झाली[१].

रानड्यांनी गोवा मुक्तिसंग्रामातील अनुभवांवर सतीचे वाण (मराठी) व स्ट्रगल अनफिनिश्ड (इंग्लिश), ही पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल गोवा शासनाने गोवा पुरस्कार (इ.स. १९८६), तर भारताच्या केंद्रशासनाने पद्मश्री पुरस्कार (इ.स. २००१) देऊन गौरवले.

संदर्भ[संपादन]

  1. त्रिवेणी रंगराजन, अनुराधा मास्कारेन्यास (२९ डिसेंबर, इ.स. २००४). "डीड्स टू लिव्ह" (इंग्लिश मजकूर). एक्सप्रेस इंडिया. २२ जुलै, इ.स. २०११ रोजी पाहिले.