Jump to content

आनंद (मासिक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आनंद
प्रकार
भाषा मराठी
संपादक वासुदेव गोविंद आपटे
स्थापना ऑगस्ट १९०६
पहिला अंक
देश भारत
मुख्यालय पुणे

आनंद हे मराठी भाषेत प्रकाशित होणारे मुलांचे मासिक आहे. हे मासिक वा.गो. आपटे यांनी १९०६ साली सुरू केले. या मासिकास दादाभाई नौरोजी यांच्यापासून नेताजी सुभाष चंद्र यांच्यापर्यंत अनेक थोरामोठ्यांचे आशीर्वाद लाभले. []

१९१३ साली आपटे यांना या मासिकासाठी आर्थिक झीज सोसावी लागली पण तरीही त्यांनी नेटाने या अंकाचे प्रकाशन चालू ठेवले. आनंदचा स्वतंत्र छापखाना काढून त्याची जबाबदारी त्यांनी श्री.गोपाळराव जोशी यांच्यावर सोपविली. []

विश्वस्तमंडळ

[संपादन]
  • केशव दाजी पुराणिक
  • व्यंकटेश नारायण सहस्रबुद्धे
  • गोपाळराव जोशी (मेहुणे) []

संदर्भ

[संपादन]
  1. 1 2 3 मराठी शब्दरत्नाकर, प्रकाशक - आनंद कार्यालय, पुणे; तिसरी आवृत्ती प्रकाशन वर्ष १९५२