मार्च ६
Appearance
(६ मार्च या पानावरून पुनर्निर्देशित)
<< | मार्च २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
मार्च ६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ६४ वा किंवा लीप वर्षात ६५ वा दिवस असतो.
ठळक घटना
[संपादन]पंधरावे शतक
[संपादन]एकोणिसावे शतक
[संपादन]- १८३६ - टेक्सासचे प्रजासत्ताक - अलामोचा प्रतिकार थांबला. मेक्सिकोच्या १,६०० सैनिकांविरुद्ध १३ दिवस किल्ला लढवणारे १८९ टेक्सासचे सैनिक पराभूत.
- १८४० - बाल्टिमोर कॉलेज ऑफ डेंटल सर्जरी हे पहिले दंतवैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले.
- १८६९ - दिमित्री मेन्डेलीफने मूलभूत घटकपदार्थांची आवर्त सारणी प्रकाशित केली.
विसावे शतक
[संपादन]- १९०१ - जर्मनीच्या कैसर विल्हेम दुसऱ्यावरील प्राणघातक हल्ला निष्फळ.
- १९०२ - रेआल माद्रिद या फुटबॉल क्लबची स्थापना झाली.
- १९४० - रशिया व फिनलंडमध्ये शस्त्रसंधी.
- १९५३ - जोसेफ स्टालिननंतर जॉर्जी मॅक्सिमिलानोविच रशियाच्या अध्यक्षपदी.
- १९५७ - घाना देशाचा स्वातंत्र्य मिळाले.
- १९६४ - कॅशियस क्लेने मुहम्मद अली हे नाव धारण केले.
- १९६४ - कॉन्स्टन्टाईन दुसरा ग्रीसच्या राजेपदी.
- १९७५ - अल्जियर्सचा तह - ईराण व इराकने सीमाप्रश्नी संधी केली.
- १९८७ - एस.एस. हेराल्ड ऑफ फ्री एंटरप्राइझ ही ब्रिटिश फेरीबोट बेल्जियमच्या झीब्रुग बंदरात बुडाली. १९३ ठार.
- १९९२ - मायकेलॲंजेलो हा संगणक विषाणू पसरण्यास सुरुवात झाली.
- १९९४ - मोल्डोव्हाच्या जनतेने निवडणुकीत रोमेनियात सामील होण्यास नकार दिला.
- १९९७ - स्वाध्याय परिवाराचे संस्थापक पांडुरंगशास्त्री आठवले यांची टेंपलटन पुरस्कारासाठी निवड.
एकविसावे शतक
[संपादन]- २००३ - अल्जीरियाचे एक विमान तामारासेट येथे दुर्घटनाग्रस्त होउन १०२ पेक्षा अधिक प्रवासी मृत्युमुखी.
- २०१७ - भारतीय आरमाराची विमानवाहून नौका आयएनएस विराट सेवानिवृत्त.
जन्म
[संपादन]- १७०६ - जॉर्ज पोकॉक, इंग्लिश दर्यासारंग.
- १८९९ - शि.ल. करंदीकर, मराठी लेखक.
- १९०३ - नागाको, जपानी साम्राज्ञी.
- १९०५ - लिल नेगेल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९१५ - सैयदना मोहम्मद बुऱ्हानुद्दीन, बोहरी धर्मगुरू.
- १९२९ - डेव्हिड शेपर्ड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९३३ - किम एल्जी, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९३७ - व्हॅलेन्तिना तेरेश्कोव्हा, रशियन अंतराळयात्री.
- १९४९ - शौकत अझीझ, पाकिस्तानी पंतप्रधान.
- १९५७ - अशोक पटेल, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९६५ - देवकी पंडित, भारतीय शास्त्रीय गायिका.
- १९६९ - झफर इकबाल, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९७२ - शकिल ओ'नील, अमेरिकन बास्केटबॉल खेळाडू.
- १९७७ - नांटी हेवर्ड, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
[संपादन]- १७५४ - हेन्री पेल्हाम, इंग्लंडचा पंतप्रधान.
- १८९२ - अम्बिका चक्रवर्ती, भारतीय क्रांतिकारी.
- १८९९ - व्हिक्टोरिया कैउलानी, हवाईची राजकुमारी.
- १९३२ - जॉन फिलिप सूसा, अमेरिकन संगीतकार.
- १९५० - आल्बेर लेब्रन, फ्रांसचा फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष.
- १९५४ - पॉल, ग्रीसचा राजा.
- १९६८ - नारायण गोविंद तथा ना.गो. चापेकर, मराठी साहित्यिक.
- १९७३ - पर्ल बक, अमेरिकन लेखिका.
- १९८१ - जॉर्ज गियरी, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९८१ - गो.रा. परांजपे, रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे पहिले भारतीय प्राचार्य.
- १९८२ - रामभाऊ म्हाळगी, भारतातील खासदार.
- १९८२ - आयन रँड, रशियन-अमेरिकन लेखक.
- १९८६ - जॉर्जिया ओ'कीफ, अमेरिकन चित्रकार.
- १९९२ - रणजित देसाई, सुप्रसिद्ध मराठी लेखक.
- १९९७ - छेदी जगन, गुयानाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९९७ - मायकेल मॅन्ली, जमैकाचा पंतप्रधान.
- १९९९ - इसा इब्न सलमान अल खलिफा, बहरैनचा अमीर.
- १९९९ - सतीश वागळे, हिंदी आणि मराठी चित्रपट निर्माता.
- २०१८ - शम्मी, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर मार्च ६ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
मार्च ४ - मार्च ५ - मार्च ६ - मार्च ७ - मार्च ८ - (मार्च महिना)