Jump to content

मोल्दोव्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मोल्डोव्हा या पानावरून पुनर्निर्देशित)
मोल्दोव्हा
Republica Moldova
मोल्दोव्हाचे प्रजासत्ताक
मोल्दोव्हाचा ध्वज मोल्दोव्हाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
राष्ट्रगीत: Limba Noastră
आमची भाषा
मोल्दोव्हाचे स्थान
मोल्दोव्हाचे स्थान
मोल्दोव्हाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
चिशिनाउ
अधिकृत भाषा रोमानियन
सरकार संसदीय प्रजासत्ताक
 - पंतप्रधान व्लाद फिलात
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस २७ ऑगस्ट १९९१ 
 - प्रजासत्ताक दिन २९ जुलै १९९४ 
क्षेत्रफळ
 - एकूण ३३,८४६ किमी (१३८वा क्रमांक)
 - पाणी (%) १.४
लोकसंख्या
 -एकूण ३५,५९,५०० (१३२वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता १२२/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ११.९९८ अब्ज अमेरिकन डॉलर (३७३वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न  
मानवी विकास निर्देशांक  . ०.६४९ (मध्यम) (१११ वा) (२०११)
राष्ट्रीय चलन लेउ
आंतरराष्ट्रीय कालविभाग पूर्व युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी + २:००)
आय.एस.ओ. ३१६६-१ MD
आंतरजाल प्रत्यय .md
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ३७३
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


मोल्दोव्हा हा पूर्व युरोपामधील एक भूपरिवेष्ठित देश आहे. मोल्दोव्हाच्या पश्चिमेला रोमेनिया तर पूर्व, उत्तर व दक्षिणेला युक्रेन हे देश आहेत. चिशिनाउ ही मोल्दोव्हाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. लेउ हे मोल्दोवाचे अधिकृत चलन आहे.

मध्य युगादरम्यान ओस्मानी साम्राज्याचा व १९व्या शतकापासून रशियन साम्राज्याचा भाग राहिलेला मोल्दोव्हा पहिल्या महायुद्धानंतर सोव्हिएत संघाचे एक प्रजासत्ताक होते. १९९१ सालच्या सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर मोल्दोव्हाने स्वातंत्र्याची घोषणा केली. सध्या मोल्दोव्हा संयुक्त राष्ट्रे, युरोपाची परिषद, डब्ल्यू.टी.ओ., स्वतंत्र राज्यांचा राष्ट्रसंघ इत्यादी आघाडीच्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे. मोल्दोव्हाला अद्याप युरोपियन संघामध्ये प्रवेश मिळालेला नाही.

१९९२ सालच्या युद्धानंतर मोल्दोव्हाच्या पूर्वे भागातील ट्रान्सनिस्ट्रिया प्रांताने स्वातंत्र्याची घोषणा केली आहे. ट्रान्सनिस्ट्रियाला संयुक्त राष्ट्रसंघ वा इतर कोणत्याही स्वतंत्र देशाने मान्यता दिलेली नाही.


बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: