आय.एन.एस. विराट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आयएनएस विराट या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
आय.एन.एस. विराट

आय.एन.एस. विराट ही भारतीय नौदलातील विमानवाहू युद्धनौका होती. विराट या संस्कृत शब्दाचा अर्थ प्रचंड असा होतो. ती ब्रिटनच्या रॉयल नेव्हीमध्ये १८ नोव्हेंबर १९५९ साली दाखल झाली. रॉयल नेव्हीमध्ये ती एच.एम.एस. हर्मीस या नावाने ओळखली जात असे. नौदल उभारणीसाठी भारताने ब्रिटनकडून ती १९८७ साली विकत घेतली. भारतीय नौदल ताफ्याची ही अग्रणी ध्वजनौका(Flagship) होती.

ही नौका आय.एन.एस. ज्योतीनंतरची भारतीय आरमारातील सगळ्यात मोठी नौका होती.

विराट भारतीय आरमारात १२ मे, इ.स. १९८७ रोजी रुजू झाली व ६ मार्च, इ.स. २०१७ रोजी निवृत्त झाली.