ऑक्टोबर ४
Appearance
(४ ऑक्टोबर या पानावरून पुनर्निर्देशित)
<< | ऑक्टोबर २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
ऑक्टोबर ४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २७७ वा किंवा लीप वर्षात २७८ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]तेरावे शतक
[संपादन]- १२०९ - पोप इनोसंट तिसऱ्याने ऑट्टो चौथ्याला पवित्र रोमन सम्राटपदी बसवले.
- १२२७ - खलीफा अल-अदीलची हत्या.
सोळावे शतक
[संपादन]- १५११ - अरागॉनचा राजा फर्डिनांड दुसरा, व्हेनिसचे प्रजासत्ताक व पोपच्या राष्ट्रांनी एकत्र होउन फ्रांसविरुद्ध पवित्र आघाडी सुरू केली.
- १५८२ - पोप ग्रेगोरी तेराव्याने ग्रेगोरीयन दिनदर्शिकेची अंमलबजावणी सुरू केली. त्यानुसार यावर्षी इटली, पोलंड, पोर्तुगाल व स्पेनमध्ये ऑक्टोबर ४ नंतरचा दिवस ऑक्टोबर १५ होता..
सतरावे शतक
[संपादन]- १६३६ - विटस्टॉकची लढाई - स्वीडनची सॅक्सनी व पवित्र रोमन साम्राज्यावर मात.
अठरावे शतक
[संपादन]- १७७७ - जर्मनटाउनची लढाई - सर विल्यम होवच्या नेतृत्वाखाली इंग्लंडच्या सैन्याने जॉर्ज वॉशिंग्टनच्या सैन्याला हरवले.
एकोणिसावे शतक
[संपादन]- १८२४ - मेक्सिकोने नवीन संविधान अंगिकारले व संघीय प्रजासत्ताकरूप धारण केले.
- १८३० - बेल्जियमला नेदरलॅंड्सपासून स्वतंत्र अस्तित्त्व.
- १८५३ - क्रिमीयन युद्ध - ऑट्टोमन साम्राज्याने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.
- १८८३ - ओरियेंट एक्सप्रेसची पहिली फेरी.
विसावे शतक
[संपादन]- १९१० - पोर्तुगालने स्वतःला प्रजासत्ताक घोषित केले. राजा मनुएल दुसरा पळून युनायटेड किंग्डमला आश्रयास गेला.
- १९१० - बर्म्युडाने आपला नवीन ध्वज अंगिकारला.
- १९२७ - गुत्झॉन बॉर्ग्लमने माउंट रशमोरचे काम सुरू केले.
- १९४० - ब्रेनर पास येथे एडॉल्फ हिटलर व बेनितो मुसोलिनीची भेट.
- १९४३ - दुसरे महायुद्ध - अमेरिकेने सोलोमन द्वीपे काबीज केली.
- १९५७ - सोवियेत संघाने स्पुतनिक या पहिल्या मानवनिर्मित उपग्रहाचे प्रक्षेपण केले.
- १९५८ - फ्रांसच्या पाचव्या प्रजासत्ताकची स्थापना.
- १९६० - ईस्टर्न एरलाइन्स फ्लाइट ३७५ हे लॉकहीड एल. १८८ प्रकारचे विमान बॉस्टनच्या लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उडताच कोसळले. ६२ ठार, १० बचावले.
- १९६५ - पोप पॉल सहावा अमेरिकेत पाउल ठेवणारा पहिला पोप ठरला.
- १९६६ - बासुटोलॅंडला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य. राष्ट्राचे नवीन नाव लेसोथो.
- १९६७ - ब्रुनेइच्या सुलतान ओमर अली सैफुद्दीन तिसऱ्याने पदत्याग केला. त्याचा मुलगा हसनल बोल्कियाह सुलतानपदी.
- १९८३ - रिचर्ड नोबलने आपली थ्रस्ट २ ही कार नेव्हाडातील ब्लॅक रॉक वाळवंटात ताशी १,०१९ किमी (६३३.४६८ मैल/तास) वेगाने चालवून उच्चांक प्रस्थापित केला.
- १९९२ - मोझांबिकमधील गृहयुद्ध संपुष्टात आले.
- १९९२ - एल ऍलचे बोईंग ७४७-२००एफ प्रकारचे विमान ऍम्स्टरडॅममध्ये निवासी ईमारतीवर कोसळले जमिनीवरील ३८ सह ४३ ठार.
- १९९३ - मॉस्कोमध्ये लश्कराने संसदेवर रणगाड्यांसह चाल केली.
- १९९७ - शार्लट, नॉर्थ कॅरोलिना या शहरात १,७३,००,००० अमेरिकन डॉलरचा दरोडा.
एकविसावे शतक
[संपादन]- २००१ - युक्रेनच्या सैन्याने सोडलेले एस-२०० प्रकारचे क्षेपणास्त्र चुकून सिबिर एरलाइन्सच्या तुपोलेव तू-१५४ प्रकारच्या विमानावर आदळले. विमान काळ्या समुद्रात कोसळून ७८ ठार.
- २००४ - स्पेसशिपवन या अंतराळयानाने अन्सारी एक्स पारितोषिक मिळवले.
जन्म
[संपादन]- १२८९ - लुई दहावा, फ्रांसचा राजा.
- १३७९ - हेन्री तिसरा, कॅस्टिलचा राजा.
- १५५० - चार्ल्स नववा, स्वीडनचा राजा.
- १६२६ - रिचर्ड क्रॉमवेल, इंग्लंडचा शासक.
- १८२२ - रदरफोर्ड बी. हेस, अमेरिकेचा एकोणिसावा राष्ट्राध्यक्ष.
- १८४१ - प्रुदेन्ते होजे दि मोरै बारोस, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.
- १८७७ - रेझर स्मिथ, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९११ - रेज पर्क्स, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९१४ - म. वा. धोंड, मराठी समीक्षक.
- १९२० - जॉर्ज ट्राइब, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९३१ - बेसिल डि'ऑलिव्हेरा, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९३६ - डेव्हिड पिथी, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९३७ - जॅकी कॉलिन्स, इंग्लिश लेखिका.
- १९६४ - डेव्हिड ब्रेन, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
- १९७१ - आमेर हनीफ, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
[संपादन]- १३०५ - कामेयामा, जपानी सम्राट.
- १५९७ - सार्सा डेंगेल, इथियोपियाचा सम्राट.
- १९०४ - कार्ल बेयर, ऑस्ट्रियन रसायनशास्त्रज्ञ
- १९२१ - केशवराव भोसले, मराठी गायक.
- १९४७ - मॅक्स प्लॅंक, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९८२ - सोपानदेव चौधरी, मराठी कवी.
- १९९३ - जॉन कावस, भारतीय-हिंदी चित्रपटअभिनेता.
- २००२ - भाई भगत, भारतीय वृत्तपट निवेदक.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]- स्वातंत्र्य दिन - लेसोथो.
बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर ऑक्टोबर ४ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
ऑक्टोबर २ - ऑक्टोबर ३ - ऑक्टोबर ४ - ऑक्टोबर ५ - ऑक्टोबर ६ - ऑक्टोबर महिना