Jump to content

क्रिमियन युद्ध

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(क्रिमीयन युद्ध या पानावरून पुनर्निर्देशित)

क्राइमियन युद्ध हे फ्रेंच साम्राज्य, ब्रिटिश साम्राज्य, ओस्मानी साम्राज्यसार्दिनियाचे राजतंत्र ह्यांच्या युतीने रशियन साम्राज्याविरुद्ध लढलेले १९व्या शतकामधील एक युद्ध होते. सध्या युक्रेनच्या अंमलाखाली असलेल्या क्राइमिया ह्या द्वीपकल्पावर प्रामुख्याने घडले गेलेले हे युद्ध ढासळत्या ओस्मानी साम्राज्याच्या अधिपत्याखाली असलेल्या अनेक भूभागांवर सत्ता प्रस्थापित करण्याच्या अनेक प्रयत्नांपैकी एक होते.

हे युद्ध रेल्वे, टेलिग्राफ इत्यादी अनेक आधुनिक तंत्रांच्या वापरासाठी तसेच फ्लॉरेन्स नाइटिंगेल ह्या ब्रिटिश नर्सने केलेल्या कामासाठी स्मरणीय ठरले. पूर्व युरोपात सुमारे तीन वर्षे चाललेल्या ह्या युद्धात १८५६ साली रशियाने शरणागती पत्कारली.

बाह्य दुवे

[संपादन]