ऑगस्ट १९
Appearance
(१९ ऑगस्ट या पानावरून पुनर्निर्देशित)
<< | ऑगस्ट २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
ऑगस्ट १९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २३१ वा किंवा लीप वर्षात २३२ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]सतरावे शतक
[संपादन]- १६६६ - दुसरे ॲंग्लो-डच युद्ध-होम्सची होळी - रियर ॲडमिरल रॉबर्ट होम्सने नेदरलॅंड्सच्या टेर्शेलिंग बेटावर हल्ला चढवून १५० व्यापारी जहाजे जाळली.
- १६९२ - सेलम विच ट्रायल्स - चेटूकविद्येचा वापर करीत असल्याच्या आरोपावरून सेलम, मॅसेच्युसेट्स येथे एक स्त्री एक धर्मगुरू सहित पाच व्यक्तींना मृत्युदंड.
एकोणिसावे शतक
[संपादन]- १८३९ - जाक दग्वेरेने आपल्या फ्रेंच विज्ञान अकादमीला छायाचित्र तयार करून दाखवले.
विसावे शतक
[संपादन]- १९१९ - अफगाणिस्तानला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- १९३४ - जर्मन जनतेने ८९.९% मतांनी फ्युह्रर हे पद निर्माण करण्याचे ठरवले.
- १९४४ - दुसरे महायुद्ध - दोस्त सैन्याच्या साथीने पॅरिसमधील जनता जर्मनीविरुद्ध उलटली.
- १९४५ - हो चि मिन्ह व्हियेतनाममध्ये सत्तेवर.
- १९५३ - सी.आय.ए.ने इराणमध्ये मोहम्मद मोसादेघचे सरकार उलथवून शाह मोहम्मद रझा पहलवीला सत्तेवर बसवले.
- १९५५ - हरिकेन डायेनने अमेरिकेच्या ईशान्य भागात २०० बळी घेतले.
- १९८० - सौदी अरेबियातील रियाध शहराच्या किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावर सौदिया फ्लाइट १६३ हे लॉकहीड एल-१०११ ट्रायस्टार प्रकारचे विमानचे आपत्कालीन परिस्थीतीत उतरले. नंतर लागलेल्या आगीत ३०१ ठार.
- १९८१ - अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी सिद्राच्या अखातात लिब्याची दोन सुखॉई एस.यु. २२ प्रकारची विमाने पाडली.
- १९८७ - युनायटेड किंग्डमच्या हंगरफोर्ड शहरात मायकेल रायनने सोळा व्यक्तींना गोळ्या घालून नंतर स्वतःचा जीव घेतला.
- १९९१ - सोवियेत संघाच्या राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्हला फोरोस येथे सुट्टीवर असताना नजरकैदेत घातले गेले.
एकविसावे शतक
[संपादन]- २००२ - ग्रॉझ्नीजवळ चेच्न्याच्या सैन्याने रशियाचे एम.आय. २६ प्रकारचे हेलिकॉप्टर पाडले. ११८ सैनिक ठार.
- २००३ - इराकमधील संयुक्त राष्ट्रांच्या दूतावासावर आत्मघातकी हल्ला. राजदूत सर्जियो व्हियैरा डि मेलोसह २२ ठार.
- २००३ - जेरुसलेममध्ये हमासने केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात ७ मुलांसह २३ ठार.
जन्म
[संपादन]- १८७८ - मनुएल क्वेझोन, फिलिपाईन्सचा राष्ट्राध्यक्ष.
- १८८३ - होजे मेंडेस काबेसादास, पोर्तुगालचा राष्ट्राध्यक्ष आणि पोर्तुगालचा पंतप्रधान.
- १९०३ - गंगाधर देवराव खानोलकर, मराठी लेखक.
- १९२१ - जीन रॉडेनबेरी, स्टार ट्रेक कथानाकाचे निर्माते.
- १९२२ - बबनराव नावडीकर, मराठी गायक.
- १९४६ - बिल क्लिंटन, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.
- १९८७ - आयलीना डिक्रुझ, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
मृत्यू
[संपादन]- १४ - ऑगस्टस सीझर, रोमन सम्राट.
- १४९३ - फ्रेडरिक तिसरा, पवित्र रोमन सम्राट.
- १६६२ - ब्लेस पास्कल, फ्रेंच गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञानी.
- १९४७ - ऍल्सिदे दि गॅस्पेरी, इटलीचा पंतप्रधान.
- १९५४ - ऑगस्टस सीझर, रोमन सम्राट.
- १९७६ - केन वॉड्सवर्थ, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- १९७७ - ग्राउचो मार्क्स, अमेरिकन अभिनेता.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]- जागतिक छायाचित्रण दिवस
बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर ऑगस्ट १९ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
ऑगस्ट १७ - ऑगस्ट १८ - ऑगस्ट १९ - ऑगस्ट २० - ऑगस्ट २१ - ऑगस्ट महिना