किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळ
किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळ مطار الملك خالد الدولي | |||
---|---|---|---|
![]() | |||
आहसंवि: RUH – आप्रविको: OERK
| |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | सार्वजनिक | ||
मालक | सौदी सर्वसाधारण नागरी उड्डाण ऑथोरिटी (GACA) | ||
कोण्या शहरास सेवा | रियाध | ||
स्थळ | रियाध, सौदी अरेबिया | ||
हब | सौदिया नॅस एर | ||
समुद्रसपाटीपासून उंची | २,०४९ फू / ६२५ मी | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
मी | फू | ||
15R/33L | 4,205 | Asphalt | |
15L/33R | 4,205 | Asphalt | |
सांख्यिकी (2010) | |||
प्रवासी | 13,919,000 | ||
आर्थिक उलाढाल (2012) | $8.0 billion[१] | ||
Sources: AIP Saudi Arabia[२] |

किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळ (अरबी: مطار الملك خالد الدولي) (आहसंवि: RUH, आप्रविको: OERK) सौदी अरेबियाच्या रियाध शहराजवळील विमानतळ आहे.[३] १९८३मध्ये सुरू झालेल्या या विमानळावर प्रत्येकी आठ गेट्स असलेली चार टर्मिनल, मशीद तसेच ११,६०० मोटारगाड्यांसाठीचा तळ आहेत. चार टर्मिनलांपैकी फक्त तीन सध्या वापरात आहेत. पैकी एक टर्मिनल सौदी राजघराण्यासाठी राखीव आहे. ३१५ किमी२ (७८,००० एकर) इतका विस्तार असलेला हा विमानतळ जगातील सगळ्यात मोठा विमानतळ आहे.
दोन समांतर धावपट्ट्या असलेला हा विमानतळ नासाच्या स्पेस शटलच्या अवतरणासाठीते एक राखीव स्थळ होती.[४]
एर इंडिया मार्फत किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून भारतामधील दिल्ली, मुंबई, कोळिकोड व तिरुवनंतपुरम ह्या शहरांमध्ये थेट प्रवासी विमानसेवा पुरवली जाते. जेट एरवेज येथून मुंबई पर्यंत थेट सेवा पुरवत असे.
संदर्भ[संपादन]
- ^ "King Khalid International airport – Economic and social impact". Ecquants. 7 September 2013 रोजी पाहिले.
- ^ चुका उधृत करा:
<ref>
चुकीचा कोड;AIP
नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही - ^ "रिंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळ आढावा". Archived from the original on 2018-12-25. २०१२-०८-०९ रोजी पाहिले.
- ^ जॉन पाइक. "Space Shuttle Emergency Landing Sites".