बबनराव नावडीकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Nuvola apps important.svg मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. पान/विभाग न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास ते लवकरच काढून टाकले जाईल.

कारण: विश्वकोशीय उल्लेखनीयता प्रश्नांकित

कृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा. प्रचालक हे पान कोणत्याही क्षणी काढतील.

विकिपीडिया नवीन लेखकांना प्रोत्साहन देत असतो. पान काढण्याची सूचना लावण्याचे कारण प्रत्येक वेळेस शक्य नसले तरी , शक्य तेव्हढ्या वेळा सदस्यास त्यांच्या चर्चा पानावर सूचीत करावे. असे करण्याने नवे सदस्य दिर्घकाळ पर्यंत विकिपीडिया सोबत रहाण्यास मदत होते. शिवाय गैरसमजातून वाद निर्माण होणे, नाराजीतून उत्पात प्रसंग अशा बाबी कमी होण्यास मदत होते.

बबनराव नावडीकर (मूळ नाव: श्रीधर यशवंत कुलकर्णी) (जन्म : नावडी, १९ ऑगस्ट, १९२२ - २८ मार्च, २००६) हे मराठी गायक, कवि, लेखक व कीर्तनकार होते. त्यांचे वडिल हि कीर्तन करीत असत. गाण्यासाठी बबनराव दहावीत शिकत असताना कराड येथून पळून पुण्यात आले आणि वाराने राहून त्यांनी पुढचे शिक्षण घेतले. नंतर ते पुण्यातील सरस्वती मंदिर शाळेत गायन शिक्षक म्हणून रुजू झाले. त्यांना आदर्श शिक्षक हा पुरस्कारसुद्धा मिळाला. शंकराचार्यांनी त्यांना भावगीतरत्न ही उपाधी बहाल केली. [बालगंधर्व| बालगंधर्वांबरोबर]] त्यांनी काही नाटकांत भूमिकाही केल्या होत्या. बबनराव नावडीकरांनी ३०-४० वर्षे स्वतःच्या आवाजात गीतरामायणाचे कार्यक्रम केले. सुधीर फडके यांच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात आकाशवाणीने बबनरावांना ’उदास का तू आवर वेडे' म्हणायला सांगितले होते. ओरिजिनल गीत रामायण मध्ये उदास का तू , सेतू बांधा रे हि गाणी त्यांनी गायली आहेत पुण्यातील लग्नसमारंभ बबनराव नावडीकरांच्या मंगलाष्टकांशिवाय होत नसे. त्याचा हा मंगलाष्टक गायनाचा वारसा त्यांचे सुपुत्र विजय नावडीकर आणि नातं मुग्धा नावडीकर करत आहेत बबनराव नावडीकर म्हणत त्यांच्या या यशामागे त्यांच्या पत्नी मंगला नावडीकर यांचा सिंहाचा वाटा आहे. 'त्यांनी घर बघितले नसते तर आज मी इथपर्यंत पोचलो नसतो' असे ते म्हणत.

बबनराव नावडीकर हे बालगंधर्वांचे भक्त असल्याने त्यांनी बालगंधर्वांची गायकी तरुण पिढीपुढे नेण्यासाठी अतोनात परिश्रम केले. गंधर्वांचे फोटो आणि माहिती यांचे एक प्रदर्शन नावडीकरांनी गावोगाव नेऊन सुमारे बाराशे ठिकाणी भरवले. 'मी पाहिलेले बालगंधर्व' हे पुस्तक स्वतः बबनराव यांनी लिहिले आहे

बबनरावांचे सुपुत्र प्रा. विजय नावडीकर व दोन नाती मेधा आणि मुग्धा यांनी त्यांच्या गाण्याचा वारसा स्वरमुग्धा या संस्थेमार्फत गाण्याचे कार्यक्रम करून चालूच ठेवला.

'रानात सांग कानात' हा खास बबनराव नावडीकरांनी गायलेल्या गीतांचा कार्यक्रम त्यांच्या स्मृतीदिनी होतो. त्यात बबनराव नावडीकरांची आणि त्यांच्या समकालीन गायकांची गाणी सादर केली जातात.

बबनराव नावडीकर यांनी गायिलेली आणि ध्वनिमुद्रित झालेली भावगीते[संपादन]

 • आम्ही दोघं राजाराणी
 • उदास तू आवर ते नयनांतिल पाणी (गीत रामायणातील गाणे)
 • कुणीआलं कुणी गेलं
 • जा रे चंद्रा क्षणभर जा
 • नको बघूस येड्यावाणी
 • पडले स्वप्‍न पहाटेला
 • बघू नकोस येड्यावाणी गं तुझ्या डोळ्याचं न्यारं पानी
 • राधिके ऐक जरा बाई
 • रानात सांग कानात
 • सांग पोरी सांग सारे
 • सुरत सावळी साडी जांभळी
 • ही नाव रिकामी उभी किनाऱ्याला

बबनराव नावडीकर यांची पुस्तके[संपादन]

 • गीत दासायन (धार्मिक; सहलेखक श्रीधरस्वामी निगडीकर)
 • निरांजनातील वात (कवितासंग्रह)
 • मी पाहिलेले बालगंधर्व (व्यक्तिचित्रण)