Jump to content

"डोंबिवली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३९: ओळ ३९:


==लोकजीवन आणि संस्कृती==
==लोकजीवन आणि संस्कृती==
[[File:Dr. Babasaheb Ambedkar statues in Dombivli 04.jpg|thumb|डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, बाजीप्रभु चौक, डोंबिवली पुर्व]]
डोंबिवलीला प्रामुख्याने मराठी भाषिकांचे, मराठी संस्कृतीचे शहर मानले जाते. हिचा महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी म्हणून गौरव होतो. पु.ल. देशपांडे एकदा म्हणाले होते की, डोंबिवलीत अनेक 'कार' आहेत. चित्रकार, संगीतकार, कलाकार, पत्रकार ,वगैरे,तर अनिल अवचट म्हणतात डोंबिवली ही एक बेडरूम कम्युनिटी आहे.कारण लोक कामानिमित्त दिवसभर मुंबईत असतात आणि रात्री फक्त झोपायला घरी येतात.
डोंबिवलीला प्रामुख्याने मराठी भाषिकांचे, मराठी संस्कृतीचे शहर मानले जाते. हिचा महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी म्हणून गौरव होतो. पु.ल. देशपांडे एकदा म्हणाले होते की, डोंबिवलीत अनेक 'कार' आहेत. चित्रकार, संगीतकार, कलाकार, पत्रकार ,वगैरे,तर अनिल अवचट म्हणतात डोंबिवली ही एक बेडरूम कम्युनिटी आहे.कारण लोक कामानिमित्त दिवसभर मुंबईत असतात आणि रात्री फक्त झोपायला घरी येतात.



१७:१५, ३ ऑक्टोबर २०१९ ची आवृत्ती

  ? डोंबिवली

महाराष्ट्र • भारत
—  शहर  —
Map

१९° १३′ ०६.३६″ N, ७३° ०५′ १२.१८″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
अंतर
मुंबई पासून

• ५० किमी
जिल्हा ठाणे
लोकसंख्या १२,४६,३८१ (२०११)
संसदीय मतदारसंघ कल्याण
विधानसभा मतदारसंघ डोंबिवली
कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• +०२५१
• एम.एच.०५

डोंबिवली हे महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यामधील एक मोठे शहर व कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्राचा प्रमुख भाग आहे. मुंबई महानगर क्षेत्रामधील प्रमुख केंद्र असलेल्या डोंबिवलीची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार १२,४६,३८१ इतकी आहे. डोंबिवली हे स्मार्ट सिटीच्या दुस-या टप्प्यात निवडले गेले आहे.

डोंबिवली शहर हे खालील चार गावांनी वेढलेले आहे.-

१. पश्चिम - चोळेगांव २. पूर्व - आयरेगांव ३. दक्षिण - पाथर्ली ४, उत्तर - ठाकुर्ली

इतिहास

इ.स.१०७५ सालच्या राजा हरपाल देव याच्या शिलालेखात डोंबिवलीचा उल्लेख आढळतो. हा शिलालेख तुर्भे बंदराजवळ माहूल या गावात आहे. त्यावरून असे वाटते की, डोंबिवली हे इ. स.१३ व्या शतकापासून अस्तित्वात आहे. डोंबिवली शहराला ६०० वर्षाचा इतिहास आहे. जेव्हा पोर्तुगीज डोंबिवलीमध्ये आले, तेव्हा त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आपले तळ उभारले होते. इ.स.१७३० मध्ये पेशवेकाळात डोंबिवलीचा उल्लेख आढळतो. १९ व्या शतकात डोंबिवलीतील शेतकरी भात पिकवत असत आणि कल्याण ते मुंबई येथे त्याची विक्री करत असत. डोंबिवली शहराला त्याचे नाव तेथील मूळ निवासी 'डोंब' लोकांपासून मिळाले आहे.

फार पूर्वीपासून इथे मराठा आगरी व कोळी भंडारी समाजा ची वस्ती होती

प्रशासन

१ ऑक्टोबर १९८३ साली डोंबिवली नगरपलिका आणि कल्याण नगरपालिका मिळून कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (क.डों.म.पा.) स्थापन करण्यात आली. १९९५ साली लोकप्रतिनिधी (नगरसेवक) राजवट सुरू झाली. डोंबिवलीचे पहिले आमदार म्हणून भाजपचे श्री. रविंद्र चव्हाण यांची २००९ साली आणि राज्यमंत्री म्हणून २०१६ साली निवड झाली. २०१७ ला राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांची रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी निवड झाली. तर डोंबिवली हे कल्याण लोकसभा मतदारसंघात असून डॉ.श्रीकांत शिंदे हे विद्यमान खासदार आहेत.

लोकजीवन आणि संस्कृती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, बाजीप्रभु चौक, डोंबिवली पुर्व

डोंबिवलीला प्रामुख्याने मराठी भाषिकांचे, मराठी संस्कृतीचे शहर मानले जाते. हिचा महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी म्हणून गौरव होतो. पु.ल. देशपांडे एकदा म्हणाले होते की, डोंबिवलीत अनेक 'कार' आहेत. चित्रकार, संगीतकार, कलाकार, पत्रकार ,वगैरे,तर अनिल अवचट म्हणतात डोंबिवली ही एक बेडरूम कम्युनिटी आहे.कारण लोक कामानिमित्त दिवसभर मुंबईत असतात आणि रात्री फक्त झोपायला घरी येतात.

नववर्ष स्वागत शोभायात्रा

[] डोंबिवलीमध्ये गुढीपाडव्याला होणारा शोभायात्रा हा सांस्कृतिक सोहळा उल्लेखनीय आहे. या उत्सवाची सुरुवात १९९९ मध्ये झाली. ही शोभायात्रा हिंदू नववर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याला आयोजित केली जाते.ही शोभायात्रा भागशाळा मैदानातून सुरु होऊन फडके रोड येथे संपते. डोंबिवलीत दिवाळी, गणेशोत्सव, नवरात्र हे सणदेखील उत्साहात साजरे केले जातात.

डोंबिवलीकरःएक सांस्कृतिक परिवार

संपादक नामदार रवींद्र चव्हाण यांनी २७ मार्च २०१९ रोजी गुडीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर डोंबिवलीकरःएक सांस्कृतिक परिवार या नावाने मासिक सुरुवात केले. २०१९ हे या मासिकाचे दशकपूर्ती वर्ष. डोंबिवलीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे वर्षभर सुरू असणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम होय. गुढी पाडवाच्या दिवशी आदर्श डोंबिवलीकर पुरस्कार सोहळा दरवर्षी साजरा केला जातो. तसेच दर्जेदार कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम असे अनेक उत्तमोत्तम कार्यक्रम चालू झाले. जसा मुंबईकर, पुणेकर तसाच डोंबिवलीत राहणारा 'डोंबिवलीकर'. सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक चळवळीचे केंद्र म्हणून डोंबिवलीची ओळख आहे. अनेक व्यक्ती, संस्था संघटना यांच्या कार्यातून आज डोंबिवलीचे नाव सर्वश्रुत आहे. २७ मार्च २००९ ला गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर 'डोंबिवलीकर' नावाचा 'ब्रॅण्ड' उदयाला आला. कुठल्याही राजकीय व हॉट विषयाला हात न घालता मासिक चालू ठेवायचं हा निर्णय आजही ठाम आहे. डोंबिवलीच्या साहित्य विश्वातील दिग्गज आमचे शन्ना, आबासाहेब पटवारी, ज्येष्ठ पत्रकार श्री. सुधीर जोगळेकर, कै. सुरेंद्र बाजपेई सर अश्या अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत डोंबिवलीकर मासिकाची सुरुवात झाली. नंतर या परिवाराच्या माध्यमातून या परिवाराचे वेगळेपण असं की 'डोंबिवलीकर' हे एक सर्वसमावेशक असं कुटुंब आहे.

डोंबिवलीकर मासिक, डोंबिवली नगरीचं प्रतिबिंब ठरलेली डोंबिवलीकर दिनदर्शिका, दिवाळी अंक, याचबरोबर विविध कलागुणांना वाव देणारे 'डोंबिवलीकर-एक सांस्कृतिक परिवार' असे खुले व्यासपीठ उभारले आहे. विशेष म्हणजे डोंबिवलीकर ही संपूर्णपणे अराजकीय पण सांस्कृतिक चळवळ आहे. राजकारणातील ''र'' इथे उच्चारला जात नाही की लिहीला जात नाही.

आम्ही दरवर्षी गुढीपाडव्याला म्हणजेच 'डोंबिवलीकर'च्या वर्धापनदिनाला डोंबिवली नगरीतील विविध क्षेत्रांतील 50 मान्यवरांना त्यांनी मिळवलेल्या यशासाठी, केलेल्या अतुलनीय कामगिरीसाठी 'आदर्श डोंबिवलीकर' हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करत असतो.

डोंबिवलीसारख्या कलासक्त नगरीतील लोकांचा कलाविषयक दृष्टिकोन लक्षात घेऊनच 'डोंबिवलीकर' परिवारानं पाच वर्षांपूर्वी 'गुलाब प्रदर्शन' आयोजित केलं होतं. तर जनतेचा विशेषत: महिला वर्गाचा उत्साह व सहभाग पाहूनच डोंबिवलीकरनं डोंबिवलीत 'रोझ सोसायटी' ची स्थापना करून नागरिकांना या क्षेत्रातील सर्व घडामोडींची माहिती मिळण्याची व्यवस्था केली.

डोंबिवलीकर परिवारानं वेळोवेळी कलाकारांना, त्यांनी मिळवलेल्या यशासाठी त्यांचा जाहीर सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देण्याची प्रथा सुरू केली. या प्रथेला अनुसरून डोंबिवलीकर परिवारानं आतापर्यंत प्रशांत दामले यांच्यासारख्या अनेक कलाकारांचा सत्कार केला आहे.

डोंबिवलीच्या औद्योगिक भागात विविध कारखाने आहेत. यात तैलरंग, औद्योगिक आणि शेतीसाठी लागणारी रसायने यांचा समावेश होतो. या भागात जड धातूची सामग्री बनवणारे कारखाने देखील आहेत. काही प्रमुख औद्योगिक संस्था जसे घरडा केमिकल, विको लॅब, लॉईड स्टील, दीपक फर्टिलायझर यांचे उत्पादन कारखाने या ठिकाणी आहेत.डोंबिवली हे महाराष्ट्रातील दुसरे सर्वाधिक प्रदूषित शहर आहे.

वाहतूक

रेल्वे

डोंबिवली रेल्वे स्थानक हे मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य रेल्वेमधील एक महत्त्वाचे स्थानक आहे. सकाळी आणि संध्याकाळी डोंबिवली स्थानकात भरपूर गर्दी असते. मध्य रेल्वेवरील सर्व जलद आणि धीम्या गतीच्या लोकल डोंबिवली स्थानकात थांबतात.डोंबिवली, कोपर, ठाकुर्ली ही मध्य रेल्वेमधील एकूण तीन स्थानके डोंबिवली शहराच्या हद्दीत आहेत.

बस

के.डी.एम.टी.ची(कल्याण डोंबिवली महानगर परिवहन) बससुविधा डोंबिवलीमध्ये उपलब्ध आहे. डोंबिवली राज्यमहामार्गाने पनवेल, बदलापूर आणि कल्याण या शहरांना जोडलेले आहे. एन.एम.एम.टी.ची (नवी मुंबई महानगर परिवहन) डोंबिवली ते नवी मुंबई अशी बसची सुविधाही आहे.

एन.एम.एम.टी. मार्ग क्रमांक. मार्ग
एन.एम.एम.टी. ४१ वाशी रेल्वे स्थानक ते डोंबिवली आणि परत
एन.एम.एम.टी. ४२ वाशी रेल्वे स्थानक ते डोंबिवली आणि परत
एन.एम.एम.टी. ४४ खारघर (वास्तु विहार) ते डोंबिवली आणि परत

शाळा आणि महाविद्यालये

शाळा

१. ईरा ग्लोबल हायस्कूल

२. के.बी.वीरा स्कूल

३. गुरूकुल हायस्कूल

४. स. है. जोंधळे विद्यालय

५. टिळकनगर विद्यालय

६. डॉन बॉस्को स्कूल

७. पाटकर विद्यालय

८. ब्लॉसम सी.बी.एस.ई.स्कूल

९. महिला समिती विद्यालय

१०. मॉडेल इंग्लिश हायस्कूल

११. लोढा वर्ल्ड स्कूल

१२. विद्यानिकेतन हायस्कूल

१३. स.वा.जोशी विद्यालय

१४. साठ्ये कन्या विद्यालय

१५. सिस्टर निवेदिता हायस्कूल

१६. स्वामी विवेकानंद विद्यालय

१७. अभिनव विद्यालय

१८.ओमकार इंटरनॅशनल हायस्कूल

१९.गार्डियन हायस्कूल

२०.सेंट तेरेसा स्कूल

२१.ट्री हाऊस स्कूल

२२.डॉन बॉस्को हायस्कूल

२३.केंब्रिज इंग्लिश हायस्कूल

२४.रॉयल इंटरनॅशनल स्कूल

२५.सेंट जोसेफ स्कूल

२६.मडवी विद्यालय

२७.सखाराम शेठ विद्यालय

२८.होली एंजल्स स्कूल

२९.महानगरपालिका विद्यालय

३०.सेंट जॉन हायस्कूल

३१.आर.बी.टी. विद्यालय

३२.न्यू एरा हायस्कूल

३३.मंजुनाथ विद्यालय

३४.संत ज्ञानेश्वर विद्यालय

35 शंकेश्वर विद्यालय सागांव महाविद्यालये

१. टिळकनगर महाविद्यालय

२. पेंढारकर कॉलेज

३. प्रगती कॉलेज

४. महिला महाविद्यालय

५. मॉडेल कॉलेज

६. स.वा.जोशी कनिष्ठ महाविद्यालय

संदर्भ