Jump to content

"जवाहरलाल नेहरू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
49.35.193.110 (चर्चा)यांची आवृत्ती 1655247 परतवली.
खूणपताका: उलटविले
(चर्चा | योगदान)
ओळ ६९: ओळ ६९:
* जवाहरलाल नेहरू (मूळ इंग्रजी लेखक - एस. गोपाल; मराठी अनुवाद - पुरुषोत्तम आत्माराम चित्रे)
* जवाहरलाल नेहरू (मूळ इंग्रजी लेखक - एस. गोपाल; मराठी अनुवाद - पुरुषोत्तम आत्माराम चित्रे)
* नवभारताचे शिल्पकार - पं. जवाहरलाल नेहरू (लेखक - सदानंद नाईक)
* नवभारताचे शिल्पकार - पं. जवाहरलाल नेहरू (लेखक - सदानंद नाईक)
* नेहरू व बोस (मूळ इंग्रजी लेखक - रुद्रांग्शू मुखर्जी; मराठी अनुवादक - अवधूत डोंगरे]]
* नेहरू : नवभारताचे शिल्पकार (मूळ इंग्रजी लेखक - एम.जे. अकबर; मराठी अनुवाद - [[करुणा गोखले]])
* नेहरू : नवभारताचे शिल्पकार (मूळ इंग्रजी लेखक - एम.जे. अकबर; मराठी अनुवाद - [[करुणा गोखले]])
* नेहरूंची सावली (नेहरूंचे सुरक्षारक्षक के.एफ. रुस्तमजी यांच्या रोजनिशींतून पी.व्ही. राजगोपालन यांनी संपादित केलेल्या इंग्रजी पुस्तकाचा सविता दामले यांनी केलेला मराठी अनुवाद)
* नेहरूंची सावली (नेहरूंचे सुरक्षारक्षक के.एफ. रुस्तमजी यांच्या रोजनिशींतून पी.व्ही. राजगोपालन यांनी संपादित केलेल्या इंग्रजी पुस्तकाचा सविता दामले यांनी केलेला मराठी अनुवाद)

२०:०५, १५ जुलै २०१९ ची आवृत्ती


पंडित
जवाहरलाल नेहरू

भारताचे १ ले पंतप्रधान
कार्यकाळ
ऑगस्ट १५, इ.स. १९४७ – मे २७, इ.स. १९६४
राष्ट्रपती राजेंद्र प्रसादसर्वपल्ली राधाकृष्णन
मागील पद स्थापित
पुढील गुलजारी लाल नंदा

कार्यकाळ
ऑगस्ट १५, इ.स. १९४७ – मे २७, इ.स. १९६४
मागील पद स्थापित
पुढील गुलजारी लाल नंदा

कार्यकाळ
ऑक्टोबर ८, इ.स. १९५८ – नोव्हेंबर १७, इ.स. १९५९
मागील टी.टी. कृष्णमचारी
पुढील मोरारजी देसाई

जन्म नोव्हेंबर १४, इ.स. १८८९
अलाहाबाद, उत्तर प्रदेश, भारत
मृत्यू मे २७, इ.स. १९६४
नवी दिल्ली, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पत्नी कमला नेहरू
अपत्ये इंदिरा गांधी
व्यवसाय बॅरिस्टर, राजकारणी
धर्म हिंदू

जवाहरलाल मोतीलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय नेते होते. ते पंडित नेहरूचाचा नेहरू या नावांनीही ओळखले जातात.

जीवन

वैयक्तिक आयुष्य

श्री जवाहरलाल नेहरू यांचा जन्म अलाहाबाद येथे काश्मिरी पंडितांच्या घरी नोव्हेंबर १४, इ.स. १८८९ रोजी झाला. फेब्रुवारी ७, इ.स. १९१६ रोजी वयाच्या २६ व्या वर्षी त्यांचा विवाह कमला कौल यांच्याशी झाला. इ.स. १९१७ साली त्यांना इंदिरा प्रियदर्शिनी ही कन्या झाली. जवाहरलाल यांचे पिता मोतीलाल नेहरू यांचे फेब्रुवारी ६, इ.स. १९३१ रोजी व पत्‍नी श्रीमती कमला नेहरू यांचे फेब्रुवारी २८, इ.स. १९३६ रोजी निधन झाले.

राजकीय आयुष्य

जवाहरलाल नेहरू यांचे सुरुवातीचे शिक्षण घरीच खाजगी शिकवण्यांद्वारे झाले. वयाच्या १५ व्या वर्षी ते इंग्लंडला आणि त्यानंतर दोन वर्षे ते हॅरो येथे शिक्षणाकरिता गेले. कॅम्ब्रिज विद्यापीठातून त्यांनी सामान्य विज्ञान (नॅचरल सायन्स) या विषयात पदवी घेतली. ते १९१२ साली भारतात परतले आणि सरळ राजकारणात उतरले. विज्ञार्थी दशेत असताना सुद्धा त्यांना पारतंत्र्यातील विविध देशांच्या स्वातंत्र्यसंग्रामात रुची होती. आयर्लंड मधील सिन फेन मुव्हमेंट मध्ये त्यांनी विशेष रस घेतला. त्यामुळे भारतात परतल्यावर ते आपसूखच स्वातंत्र्य चळवळीत खेचले गेले.

१९१२ मध्ये झालेल्या बंकीपूर काँग्रेस अधिवेशनाला ते उपस्थित होते. १९१९ मध्ये ते होमरूल चळवळीचे अलाहाबादचे अध्यक्ष बनले. १९१६ मध्ये ते प्रथमच महात्मा गांधींना भेटले आणि त्यांच्यापासून विलक्षण प्रेरित झाले. १९२० साली त्यांनी उत्तर प्रदेशच्या प्रतापगढ जिल्ह्यात पहिला किसान मोर्चा काढला. १९२०-२२ दरम्यान असहकार आंदोलनामुळे त्यांना दोनदा कारावास भोगावा लागला.

सप्टेंबर १९२३ मध्ये पंडित नेहरू अखिल भारतीय काँग्रेस परिषदेचे सचिव बनले. १९२६ मध्ये त्यांनी इटली, स्वित्झर्लंड, इंग्लंड, बेल्जियम, जर्मनी आणि रशिया आदी देशांचा दौरा केला. १९२८ मध्ये सायमन कमिशन विरोधात निदर्शने करताना त्यांना लाठी हल्ल्याला सामोरे जावे लागले. त्याच वर्षी झालेल्या सर्वपक्षीय काँग्रेस सभेला ते उपस्थित होते. १९२८ मध्येच त्यांनी स्वतंत्र भारत चळवळ सुरू केली. १९२९ साली पंडित नेहरू भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष झाले. तेथे संपूर्ण स्वातंत्र्य हेच ध्येय निश्चित केले गेले.

१९३० ते १९३५ दरम्यान मिठाचा सत्याग्रह आणि अशाच अन्य सत्याग्रहांमुळे नेहरूंना अनेकदा कारावास भोगावा लागला. १४ फेब्रुवारी, १९३५ रोजी त्यांनी अल्मोडा जेलमध्ये आपले आत्मचरित्र पूर्ण केले. सुटकेनंतर ते स्वित्झर्लंड, इंग्लड, स्पेन आणि चीन येथे जाऊन आले. ७ ऑगस्ट १९४२ रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मुंबई अधिवेशनात त्यांनी भारत छोडो ही क्रांतीकारी घोषणा केली. पुढच्याच दिवशी त्यांना पुन्हा अटक करण्यात आली आणि त्यांना अहमदनगर किल्ल्यात नेण्यात आले. ही त्यांची कैद ही सर्वांत दीर्घकाळी पण शेवटची ठरली. एकंदर पं. नेहरूंनी ९ वेळा कारावास भोगला. १९४५ मध्ये त्यांची सुटका करण्यात आली. १९४६ मध्ये ते दक्षिण पूर्व आशियाला जाऊन आले. त्यानंतर ६ जुलै, १९४६ रोजी त्यांना काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. १९५४ पर्यंत त्यांनी पदभार सांभाळला.

नेहरू आणि गांधी

नेहरूंनी लिहिलेली पुस्तके

  • आत्मकथा (मूळ इंग्रजी, मराठी अनुवाद - ना.ग. गोरे)
  • इंदिरेस पत्रे (मूळ इंग्रजी- Letters from a Father to His Daughter; मराठी अनुवाद - वि. ल. बोडस)
  • भारताचा शोध (मूळ इंग्रजी -Discovery of India, मराठी अनुवाद - साने गुरुजी)

नेहरूंवर लिहिली गेलेली पुस्तके

  • अग्निदिव्य : कमला नेहरू (धनंजय राजे)
  • आधुनिक भारताचे शिल्पकार पंडित जवाहरलाल नेहरू (लेखक - डॉ. डी.डी. पाटील, प्रा. ए.आर. पाटील)
  • आपले नेहरू (बालवाङ्‌मय, लेखक - साने गुरुजी)
  • गोष्टीरूप जवाहरलाल नेहरू (बालवाङ्‌मय, लेखक - श्यामकांत कुलकर्णी)
  • जवाहरलाल नेहरू (मूळ इंग्रजी लेखक - एस. गोपाल; मराठी अनुवाद - पुरुषोत्तम आत्माराम चित्रे)
  • नवभारताचे शिल्पकार - पं. जवाहरलाल नेहरू (लेखक - सदानंद नाईक)
  • नेहरू व बोस (मूळ इंग्रजी लेखक - रुद्रांग्शू मुखर्जी; मराठी अनुवादक - अवधूत डोंगरे]]
  • नेहरू : नवभारताचे शिल्पकार (मूळ इंग्रजी लेखक - एम.जे. अकबर; मराठी अनुवाद - करुणा गोखले)
  • नेहरूंची सावली (नेहरूंचे सुरक्षारक्षक के.एफ. रुस्तमजी यांच्या रोजनिशींतून पी.व्ही. राजगोपालन यांनी संपादित केलेल्या इंग्रजी पुस्तकाचा सविता दामले यांनी केलेला मराठी अनुवाद)
  • पंडित जवाहरलाल नेहरू (लेखक - डॉ. नीला पांढरे)
  • पंडित जवाहरलाल नेहरू (बालवाङ्‌मय, लेखक - राजा मंगळवेढेकर)
  • पंडित जवाहरलाल नेहरू : व्यक्ती आणि कार्य (महाराष्ट्र सरकार)
  • पंडित नेहरू (पु. शं. पतके)

हेही पहा

बाह्य दुवे

मागील
प्रथम
भारतीय पंतप्रधान
ऑगस्ट १५, इ.स. १९४७ - मे २७, इ.स. १९६४
पुढील
गुलजारी लाल नंदा
मागील
प्रथम
भारतीय परराष्ट्रमंत्री
ऑगस्ट १५, इ.स. १९४७ - मे २७, इ.स. १९६४
पुढील
गुलजारी लाल नंदा
मागील
टी.टी. कृष्णमचारी
भारतीय अर्थमंत्री
ऑक्टोबर ८, इ.स. १९५८ - नोव्हेंबर १७, इ.स. १९५९
पुढील
मोरारजी देसाई